जागतिक पुरूष दिन
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
खरं पाहता असाही दिवस साजरा करावा असे बर्याच जणांना रूचणारं नाही,कारण येणारा प्रत्येक दिवस हा या पुरूषी संस्कृतीत त्यांचाच तर असतो असं म्हणनारे सापडतील.पण खरं सांगू आपण चुकतोय, पुरूषांना गृहीत धरतोय.ते आहेत म्हणून स्त्रीयांची आण बाण शान आहे.असं पहा पुरूषांनी स्वताकदीवर इतिहासात,वर्तमानातही अनेक पराक्रम गाजवले,लढाया जिंकल्या. यात स्त्रीयांचही महत्वाचं योगदान आहे ते टाळता येणारच नाहीच,परंतु खरा संघर्ष रणांगणात पुरूषांनीच केला.आपल्या बाहुबळावर ते संघर्ष करत होते व आजही तोंड देतात.तशा संघर्षाच्या जागा बदलल्या.दैनंदीन आयुष्यातही ते तणाव,कामाचा बोजवारा,आर्थिक समस्या, आणखी कितीतरी जबाबदार्यांना तोंड देतात.बर्याचदा बायकोला नकळत त्रास एकट्याने सहन करणातात.
स्त्री ही जात्याच नाजूक,संवेदनशील,शरीराने पुरूषाच्या तुलनेत सुंदर,सुडौल असते. ती नाजूक कामांसाठीच निवडली जाते.ते स्वाभाविकच आहे.घरात बाहेरची कामं पुरूषालाच करावी लागतात.आज स्त्रीही त्यात आघाडीवर आहे ,पण हे मान्यच करावं लागेल की वजन उचलण्याची कामे ज्या सहजतेने पुरूष करेल तेव्हडी सहजता स्त्रीकडे येऊ शकत नाही.ते नैसर्गिकरित्या ठरलेले आहे.
पुरूष बाहेर स्वतंत्र असला तरी घरात तो बंधनातच असतो.स्त्री ही त्याची बनुन संसार करते पण पुरूष तिला स्वतःच्या घरात सामावून घेतो. तिला आपलंसं करून घराचं गृहस्वामीनीचं पद तिला बहाल करतो.तो पण कितीतरी गोष्टीत तडजोड करतो ,मन मारून जगतो.स्त्री रडू शकते पण पुरूष रडू शकत नाही.तो मन कठोर करून परिस्थीतीवर तोडगा काढतो.स्त्री व पुरूष ही संसार रथाची दोन चाकं एकमेकांच्या साथीने सहज संसार पार करू शकतात.
स्त्रीच्या आयुष्यात बापाचे स्थान त्यानंतर नवर्याचे स्थान कायम महत्वाचे असते.मुलीचा बाबा व बायकोचा नवरा हे तिचे खरे सुरितक्षिततेचे २ आयाम असतात.तिने ते कधी दूर करू नयेत.पुरूषाच्या खांद्यावर असणारी आई,बायको,मुलगी,मुलगा यांची जबाबदारी तसेच ज्येष्ठांची काळजी हे सगळं तोच जाणोजाणे.
खरंच या जगाची उत्पत्ती करणारा भगवंतही "पुरूष"च संबोधला जातो हे आपण जाणतोच. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळावे ही म्हण अगदी खरीये.त्याचे दुःख व त्रास तोच जाणे.कदाचित ते स्त्री समजू शकत नाही.म्हणूनच पुरूषाच्या पुरूषार्थाला करोडो सलाम.माझ्याही आयुष्यात वळणावळणावर मला भेटलेल्या व त्यांच्या अस्तित्वाने माझे आयुष्य कृतार्थ करणार्या (बाबा,नवरा,सासरे,मित्र ,नातेवाईक ) समस्त पुरूषवर्गाला वंदन.🙏🏻
Comments
Post a Comment