Posts

Showing posts from October, 2024
 स्वागत दिपावलीचे.. ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी       मंडळी, काय म्हणता?  झाली का दिवाळीची तयारी? आवराआवरी झाली का? आणि हो फराळाची तयारी झाली का? नक्कीच झाली असणार! हो ना?     संपूर्ण वर्षभरातील सर्वांचा सर्वात आवडता व मोठा सण म्हणजे दिवाळी. मग उत्सवात काही कमी नको म्हणून जोरदार तयारी होते. काहींची कपड्यांची शॉपिंग, मग ऑनलाईन नाहितर ऑफलाईन.. त्यात प्रत्यक्ष खरेदीचा आनंद लुटणारी मंडळी रसिकच म्हणा, सहसा ती गंडवली जात नाहीत😃, जुना आकाशकंदिल धूळ झटकून नव्यासारखा होस्तर फडके मारून साफ झालेला असतो😄, किंवा जुना फारच खराब झालाय म्हणून नव्याचे आगमन, त्यावर घरच्यांमध्ये बरीच चर्चा😀, दिवाळी आहे म्हणून नविन वस्तुंचे घरात आगमन 😍, यावर्षी साडी नको म्हणता म्हणता २-३ साड्यांची खरेदी 😄, मुलांमध्ये नविन गॅजेटसाठी बाबांना मस्का लावून गळ घालणे 😄, मुली व गृहिणींचे रांगोळ्यांचे विविध डिझाईन्स मनात घोळवून ठेवणे, काही घरात नविन कार खरेदी किंवा मोठ्या वस्तूंची खरेदी, नविन प्रॉपर्टीची खरेदी अशा अनेकानेक गोष्टी म्हणजे दिवाळी!     किती किती लक्ष दिवे स्वतः...
 #कोजागिरी -सौ. स्वरूपा कुलकर्णी       आकाशीच्या चंद्र चांदण्यांचा खेळ रोज रंगतो. रोजची रात्र विविध गमती जमतींनी भरलेली असतेच. पौर्णिमेला चंद्र पूर्ण तर अमावास्येला गायब अशा लपाछपीचा खेळ होतच असतो. चांदण्या आपल्या नित्य चमचमणाऱ्या झग्यात लुकलुकत असतात. संध्याराणीच्या परसात रजनी येते नी दोघी एकमेकींना इतक्या कडकडून बिलगतात की संध्या रजनीतच एकरूप होते.अशी ही रजनी रोज आपल्या आकाशाच्या प्रांगणात रममाण होते.      पण मंडळी, कोजागिरीची रात्र मात्र वर्षभरातील सर्व रात्रींहुन निराळी. कारण ह्या रात्री रजनी आपल्या पूर्ण श्रृंगारात प्रियकराच्या स्मरणात मुग्ध होत असते. तो प्रियकर म्हणजे अर्थातच चंद्रदेव.. आकाशातल्या भव्य पोकळीत रजनीच्या संगे आपल्या पूर्ण कलांनी विकसित झालेला चंद्र असंख्य ताऱ्यांशी रासक्रीडा करत असतो.    कोजगिरी किंवा शरद पौर्णिमा म्हंटलं की कृष्णाने राधा- गोपिकांशी खेळलेला महारास आपण कोणीच विसरू शकत नाही. कृष्णं म्हणजे तो १६ कलांनी विकसित चंद्र तर चांदण्या म्हणजे राधा व गोपिका. हा महारास रात्रभर रंगतो.चंद्रकिरणांचे अमृतपान सगळेच करतात व...
 पाऊस ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी वाटा चिंब हिरव्याओल्या डोंगर-दरी हिरवी सारी, ऋतु श्रृंगारतो दश दिशा धरा ल्यायली शालू वेडी... वाटा नागमोडी नदीच्या वारा वाहे, जळ हाले, मधुनंच पिवळी फुले हळदीचे रान झाले.. निळा मयुर नाचतो पावसाच्या सरी येतांना, पावसाने नाद भरतो सरी धूंदं गातांना... तहान भागते सारी धरतीची पाडसांची, होडी मधुनच गीत गाते मधूर प्रेमाची सौख्याची.. मेघ तृप्त पाहूनी धरा तृप्त ही सारी पायवाटा दूर नेती प्रियेसह सांजवेळी... पक्षी चोचित भरती दाणे कोवळे पिकातले गीत पावसाळी येई ओठी तुझ्या माझ्या प्रितीतले..
 पावसातले प्रेम ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी तू पावसाळी गीत गाशी मी धुंद तव आठवांशी घट्ट लपेटून तूला घेते प्रेमगीत मज ओठी... स्पर्श तुझा चिंब ओला मनी मानसी चिंब ओली कधी भेटशील सजणा मी प्रिया तुझी स्पर्शवेडी.. होई सांजं धुंद मस्तं मी व्याकूळ तुला शोधी तू गेला निघून दूरदेशी माझी राहिली जुनी गाणी तूझ्या स्पर्शास आतुरं मी भाबडी रे हरिणी तुला शोधते पावसांत कधी लपेटून घेशी.. माझा राजा तू भोळा मी राणी तुझ्या स्वप्नांची किती अंतं पहाशी आता आसावला जीव भेटीसाठी.. मी बावरे क्षणोक्षणी तु अजुनका नं येई विसरू नको प्रियेला मी आर्त विरहवेडी..
 ऋतु पावसाळी ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी रिमझिम पावसाच्या झिम्माड सरी येती, आसावली रे धरा चिंब भिजते सारखी रंग बदलती ढगांचे रंग काळानिळा होई, मधुुनच विजा चमकून खाली येती वारा कुंदं मंदं धुंदं पक्षी कोटरात गेली, मातीच्या सुगंधाने दिशा दरवळल्या दाही येतो पाऊस घेऊन नवी आशा नवी उर्मी, माझ्या शेतात अंकुरती बीजं सोनेरी पोपटी उद्या पिकेल शेतात बीज नवे सोनियाचे, मी वेचिन क्षण सुखाचे आनंदाचे भरलेले
 हे मात्र खरय कोऱ्हाळकर आणि शिक्षण क्षेत्र  पहिल्या पासून बघितले तर  श्रीमान मोहनिरज दादा नंतर श्रीमान वासंतकाका ,श्रीमान भालचंद्र काका यांनी KJS कॉलेज ला 7 येकर जमीन देऊन कॉलेजची स्थापना केली , अनेक मुले कोऱ्हाळकर ट्रस्ट अंतर्गत मोफत शिक्षण घेत आहेत , नंतर श्रीमान R G कोऱ्हाळकर यांनी श्रीमान गोकुळचांदजी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द गाजवली आणि शाळेला एक प्रकारचे नावलौकिक मिळऊन दिले ,शिस्त कशाला म्हणतात हे शाळेला दाखऊन दिले  त्या नंतर श्रीमान दिगु काका उर्फ D G कुलकर्णी कोऱ्हाळकर यांनी शाळेची भरभराट करत , शिक्षण आणि शाळेतील सर आणि विद्यार्थी नाते दृढ केले , शाळेचा विकास केला , त्या नंतर मकरंद कोऱ्हाळकर हे मुख्याध्यापक झाले यांनी शाळेची उंची ही खेळातील विकासा कडे नेत शाळेला अनेक बक्षिसे मिळऊन दिले ,अनेक स्पर्धा मध्ये विद्यार्थी ना सहभागी करून शाळेची गती अभादित ठेवली , त्या अगोदर 1972 सालि ज्या वेळी स्त्रिया नोकरी करता बाहेर पडायला लागल्या त्याची सुरुवात श्रीमती मालती विष्णू कोऱ्हाळकर यांनी ज्ञानप्रबोधिनी शी शू विकास शाळेत सेवा देऊन अनेक विद्यार्थी वर संस्...
 पुस्तक परीक्षण  सौ. नम्रता संजय कोरडे. "मन मोगरा मोगरा "हे पुस्तक सौ.स्वरूपा कुलकर्णी ह्या नवोदित लेखिकेचे पहिले पुस्तक आहे, वाचता वाचता जसे पुढे पुढे वाचत जातो, जणू आपण रिकामी परडी घेऊन बागेत शिरतो आणि आणि एक एक फुल तोडून परडीत टाकत जातो त्याप्रमाणे एकानंतर एक लेख वाचत जाताना भासते. संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे सुगंधी मोगऱ्याची परडी भरून असल्याची जाणीव होते. हे मी स्वतः वाचताना अनुभवले. लेखिकेने लेखनामधील वैविध्य जपले आहे. ह्या पुस्तकाला अध्यात्मिकतेची सुंदर किनार आहे. भक्ती चा हळुवार स्पर्श आहे. राम,कृष्ण, सरस्वती, सद्गुरू ह्यांचे विविधतेने नटलेले वर्णन वाचताना मन भक्तीरसात बुडते. सात्विकतेने सुंदर रेखीव नक्षीकाम केल्यासारखे लेखन आहे. भावनांचा सूर अतिशय नाजूक रेशीम धाग्यांनी गुणगुणला गेला आहे. लेखनातील निर्मळ आणि शुद्ध उस्फुर्त विचार त्या पुस्तकातील प्रत्येक लेखाला सौंदर्य बहाल करते आहेअसे वाटते.लेखिकेच्या मनातील भावना तीचा स्वभाव ह्याचे दर्शन लेखनातून घडते. निसर्गातील पानांफुलांच्या वेगवेगळ्या छटा रेखाटताना निसर्गप्रेमी लेखिकेचे भाव जाणवतात.तसेच पहिली परी,ऋणानुबंध...
 विठू तुझे चरणी माझा राहो निर्मळ भक्तिभाव तुजविण न दिसो काही राहो आजन्म एकरूप मी तू ची न व्हावी बाधा संत संग देई सदा तुजवीण आस नाही भेटी दे लवलाही विठ्ठल विठ्ठल गजर राहो मनी ध्यानी स्वप्नी एकतारी जैसे बोले तैसे राहू एकनामी  नको प्रपंचाची चिंता नको आस मायेची तूझ्याच पायी राहूदे माझी मती ही सारखी जगाचा कैवारी तू नाथा होवू दास तुझे चक्रपाणी उन्मनी होत आहे आता न दिसे तुजवीण काही जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसे हरी उभा दशदिशांतही पुजायाला तूला देवा आता उरलो न मी झालो हरी
 नमस्कार,  प्रिय शब्दसखी सौ. स्वरूपा सुबोध कुलकर्णी  "ती अशी घडली "  साधारण चार वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवात माझ्या शेजारी एक उंच, गोरीपान, सडपातळ, सुंदर, हसतमुख व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते,गोऱ्यापान देहावर गडद रंगाची साडी खूप शोभून दिसत होती. चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिच्या शालिनतेची साक्ष देत होता. सगळ्यांशी गोड आणि शांतपणे बोलण्याने तिचे पावित्र्य आणि निर्मळ मन डोकावताना दिसत होते. तिथे आमची ओळख झाली. हीच ती स्वरूपा कुलकर्णी.       अतिशय संस्कारक्षम आणि अध्यात्माचा गाढा पगडा असलेल्या दीक्षित कुटुंबात कुमारी स्वरूपाचा जन्म झाला. आणि" पहिली बेटी धनाची पेटी "ह्या उक्तीप्रमाणे घरात लक्ष्मीची पाऊले उमटली. आजोबांच्या शिकवणुकीतून स्वरूपा वाढायला लागली.      तिचा जन्मछत्रपती संभाजीनगरचा,माहूरची "रेणुकामाता" ही त्यांच्या घरची कुलदेवता .म्हणून रेणुका प्रदीप दीक्षित.तिच्या अगोदर तिच्या आईला एक लहान मुल होऊन ते पंधरा दिवसातंच वारलं...न्युमोनियामुळे,  आणि  त्यानंतर स्वरूपाचा जन्म झाला.त्या...
 वाढदिवस - सौ. स्वरूपा कुलकर्णी      आज तिथीनुसार माझा वाढदिवस. आज चाळीसाव्या वर्षात पदार्पणहोत आहे. आज विचार करतांना सहज मागे वळून पहीले, खरंच किती सुख- दुःखाचे सोहळे अनुभवले. म्हंटलं तर आजवरचे आयुष्य सहज सुंदर होते. काही अपवादात्मक कटू प्रसंग सोडले तर माझ्या वृत्तीत सद्गुरूकृपेने समाधानी आयुष्य लाभले. रामाशी व कृष्णाशी सख्य करता आले हे या आयुष्यातले पारमार्थिक फळ! तीच माझी जीवनभरची सार्थकता!        जगणं समृद्धं करणारे अनेक सुरेख प्रसंग लाभले. माझे बालपण, प्रेमळ, सात्विक आई- बाबा, आजोबा, त्यांचे संस्कार, माझे शालेय आयुष्य,अनेक  बक्षिसं , प्रमाणपत्रं, मैत्रिणी, सर्वात महत्वाचे शिक्षक, कॉलेजजीवन, तिथले प्राध्यापक, पहिला जॉब, तोपण मुंबईतला, नंतरचे कडू गोड अनुभव, लग्नं, नवरा, सासर, घर वितक घेणे,पहिलं अपत्य मुलगी, ओवीच्या येण्याने लाभलेली कृतार्थता, नंतर तिन वर्षांनी आर्याचा जन्म, त्यांचं बालपण, शाळा , माझे लिखाण, बक्षिसं, प्रमाणपत्रं, लोकसंग्रह, आध्यात्मिक प्रगती( अनुभवी व ज्येष्ठांमुळे लाभलेली), किती गोष्टी सांगाव्यात..एकुणच जगण्याचं मर्म आता उ...
 विघ्नविनाशक मंगलमुर्ती मोरया🙏 ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी           वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ।     निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।      संपूर्ण विश्वाचा निर्माता, विद्येचा अधिपती, बुद्धीची देवता, सर्व विघ्नांचे निवारण करणारा विघ्नेश, सर्व कलांची निर्मिती करणारा कलाधीश  अशा मंगलमुर्ती गणेशाचे शुभागमन होत आहे. त्याच्या कृपेने समाजात चाललेल्या अपप्रवृत्ती नष्ट होवोत, सर्वत्र सुख, समाधान व शांती नांदो ही मोरया चरणी प्रार्थना🙏        हे संपूर्ण विश्व ज्या प्रणवातुन उत्पन्न झाले त्याचे साकाररूप म्हणजे श्री गणेश. हा गणेश समस्त ब्रह्मांड व्यापून उरलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनीही फार सुंदर शब्दात त्याचे यथोचित वर्णन केले आहे.       ओम् नमोजी आद्या।       वेदप्रतिपाद्या।        जय जय स्वसंवेद्या।       आत्मरूपा।।      ज्ञानेश्वरांनी हे आद्य तत्व, वेद जिथून निर्माण होतात ते स्थान, स्वसंवेद्य  तत्वाला गणेश म्हणून...
 #अक्षरधनकाव्यस्पर्धा कवितेचा विषय- श्रावण शिर्षक- श्रावणधारा घन निळे श्रावणातले भाव गहिरे सांजओेले कुठून येते ही अवचितं झुळूक मृदगंधी हलके... पश्चिमेत मेघांची दाटीवाटी रंगली मधुनच केशर-पिवळी रवी हरपला सांजडोही निशा हलकेच चाहूल देई... रंग गंधांचा मेळ सुगंधी हवेत अवघा दाटून जाई गार वारा मधुनच आता सांज कलंडते ठायी ठायी..... आस्मानीचा द्याया निरोप वीजबाई लखलखली न्यारी दिशा धुंद त्या; वाराही मंद आसुसलेली ही धरा सारी... कडकडती वीजा मेघही सज्ज वर्षाव अमृताचा होई प्रचंडं  चातक आतुर तृषा भागवी सारी सृष्टी भिजली निवली.. अविरत गाती श्रावणधारा गीत धरतीचे मांगल्याचे नववधू ही जणू नहाते मुक्त बावरी आनंदाने..... कवयित्रीचे नाव- सौ. स्वरूपा कुलकर्णी ठिकाण- राहाता, जि.अहमदनगर