Posts

Showing posts from December, 2025
 #प्रवास  #आठवणी  #उटी लेख क्र ३    -सौ. स्वरूपा कुलकर्णी      म्हैसूरला सुबोधच्या कस्टमर्सकडे अत्यंत जोरदार आतिथ्य स्विकारून उटीकडे प्रयाण केले. उटी हे उदगमंडलम् या नावानेही ओळखले जाते. हे तमिळनाडू राज्यातील थंड हवेचे हिल स्टेशन आहे.येथिल बोटॅनिकल गार्डन, बोटींग, चहा व कॉफीचे मळे अत्यंत सुंदर अनुभव देतात. प्रथमतः आम्ही हॉटेलवर रूम बूक केली. त्या रूममधिल मोठ्या खिडक्यातुन उटीचे नैसर्गिक सौंदर्य दृष्टीस पडत होते.हवा उबदार होती फार थंड नव्हती. तिथे थोडा हिरमोड झाला कारण उटी म्हंटल्यावर थंडी खूप असेल या भावनेने बऱ्याच तयारीत आम्ही आलो होतो.त्यानंतर सगळ्या दक्षिण भारतात मिळणारा इडली,रस्सम्, वडा सांबार खाल्ला.खरंतर एव्हड्या प्रवासात सगळीकडे आलटून पालटून तेच पदार्थ खाल्ले पण खरं सांगू आम्ही दोघेही अजिबात कंटाळलो नाही.कारण आम्ही दोघेही इडली-डोसा लव्हर! मग काय एकुणच चंगळ होती.कुठेही कंटाळलो नाही.      निलगिरीच्या हिरव्या पर्वतरांगांतून चहा कॉफीचे मळे फारच सुखद दर्शन देत होते.तिथे मला " साजन" पिक्चर मधिल माधूरी व संजय दत्तच्या गाण्यांची आठवण...
 #प्रवास #म्हैसूर  #आठवणी       लेख क्र २      - सौ. स्वरूपा कुलकर्णी        बॅंगलोरचा प्रवास संपवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो आणि कारने आम्ही म्हैसूरकडे प्रयाण केले. म्हैसूरमध्ये सर्वात प्रथम पाहिले ते म्हैसूर पैलेस! मी माझ्या आयुष्यात इतका भव्य दिव्य राजवाडा प्रथमच पहात होते. वास्तूची भव्यता, देखणा परिसर,सुंदर रंगसंगतींचे घुमट सगळंच सुंदर. राजवाडा बाहेरूनच इतका विशाल व सुंदर आहे की पहाणारा प्रेमातच पडतो. आतुन पहातांना भारतातील विविध धर्मांची छाप त्या कलाकृतींवर दिसून येत होती. विविध कलाकृती, सुंदर दरवाजे, आतिल भव्यता, झुंबर तर केवळ अप्रतिम असे..सगळं डोळ्यात साठवत तिथले खांब पहात व एकुणच वास्तुतील वैभव पाहून मन तृप्त झाले. तिथे बाहेर इतर नवख्या जोडींप्रमाणेच आम्हीही तिथल्या कॅमेरामनकडून फोटो काढून घेतला व एक अनोखी आठवण त्या फोटोत कैद झाली.        नंतर म्हैसूरचे अतिशय प्रसिद्ध वृंदावन गार्डन पहाण्याचा योग आला. अप्रतिम लाईट फाऊंटेन अर्थात रंगीत कारंज्यासाठी प्रसिद्ध असलेले हे गार्डन पहातांना व नवऱ्याच...
 #प्रवास #बंगळूरू #आठवणी    लेख क्र १ -सौ.स्वरूपा कुलकर्णी      २०१३ मध्ये आमचं लग्नं झाल्यावर आम्ही फिरायला म्हणून बंँगलोर(आताचं बंगळूरू) उटी,म्हैसूर अशा पर्यटकांना प्रिय असणाऱ्या स्थळांना भेट द्यायला गेलो.मुळातच मला प्रवास आवडतो,नविन ठिकाणचे अनुभव,तिथली माणसं,तिथले व्हाईब्स सगळं सगळं मनात साठवायला प्रचंड आवडतं.पुन्हा नंतर त्या आठवणी आल्या की मन परत ताजंतवानं होऊन जातं. जणू टाईम मशीनसारखं परत त्या काळात जाऊन तो अनुभव समोर येतो.       तर आम्ही ट्रॅव्हल्सने पुण्याला व पुण्याहून विमानाने बँगलोरला पोहोचलो.विमानात दुसऱ्यांदा बसण्याचा योग होता.विमान प्रवास सहज व आरामदायक पार पडला.तो रोमांचक होता.पुणे ते बॅंगलोर पटकन आलो असं वाटत राहिलं..मग बँगलोरच्या अतिशय आधुनिक नी लांबलचक एअर पोर्टवर पोहोचलो. तिथे पोहचल्यावर खूप भारी वाटलं.तिथला क्राऊड खरंच मस्तं होता. तिथून एका हॉटेलवर रूम घेऊन फ्रेश झालो. तिथे सुबोधच्या(नवरा) जुने कस्टमर असलेल्या श्री.सत्यनारायण सरांच्या मुलीचे शाही लग्नाचे निमंत्रण स्विकारलेले असल्याने तिकडेही २ दिवस जाणे झाले.कर्नाटकी प...
 मोक्षदायीनी एकादशी ।।श्री राम।।   ।।श्री कृष्ण।। - सौ. स्वरूपा कुलकर्णी    आज गीताजयंती.तसेच मोक्षदा एकादशी. अतिशय पवित्र दिवस. भगवंताने आजच्या दिवशी गीता सांगितली  म्हणून हा दिवस खास आहेच पण एकादशी असल्यामुळे उपवासही घडतो म्हणून अजुन खास आहे. आजचा दिवस तसेच इतरही एकादशींना जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास हा तन व मन दोन्ही शुद्ध करतो.हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.आज  सकाळी उठून मुलींचं आवरलं नी त्या शाळेत गेल्या. मग स्वतःचं आवरून देवपूजेला बसले. आज एकादशी म्हणून देवाला उद्वार्चन केले. सुगंधी शिकाकाईने व गरम पाण्याने स्नान घातले. सुगंधी उदबत्तीने वातावरण आधीच प्रसन्न झाले होते. तोंडाने श्री राम जय राम जय जय राम चा जप करत देवाला दुधाने स्नान घातले. परत स्वच्छ पाण्याने स्नान घातले. वस्त्राने पुसून देव जागेवर ठेवले , फोटोंचीही पुजा झाली. माझ्या देवघरात कुलदेवत खंडोबा व वणीची देवी आहेत. तसेच, गणेश व इतरही देव आहेत. पण सर्वात जिव्हाळ्याचं नातं आहे ते रामाशी. गोंदवलेकर महाराज सांगतात तसं मी रामाशी सर्व नाती जोडली आहेत. वडिल, पती, बाळ, मित्र, आई, द...