अस्मिता वहिनी.. - सौ.स्वरूपा कुलकर्णी आज सहज लग्नातले फोटो चाळतांना हा फोटो दिसला. पाहताच लग्नातले दिवस आठवले. मुळात या फोटोत डावीकडून दुसरी ती माझी चुलत मोठी जाऊ- अस्मिता वहिनी.तिला जाऊन आता ५ वर्षं झाली.तिच्या आठवणीने भुतकाळात गेले.अस्मिता वहिनी म्हणजे माझ्या सासरची सर्वांची लाडकी सून.अतिशय हुशार,कर्तबगार,प्रेमळ अशी सदा हसरी नी बडबडी वहिनी.ती डोंबिवलीत रहायची. माझं नविन लग्न झालं तशी लग्नातही तिचा वावर सुखावहं होताच पण लग्न झाल्यावर पहिल्या गृहप्रवेशापासून ते आमच्या जागरण गोंधळांपर्यंत वहिनीची लगबग व उत्साहाने सगळ्या कामात पुढे असण्याचा स्वभाव वाखाणन्यासारखाच होता. माझ्या गृहप्रवेशाला तिने केलेली गृहसजावट आजही लक्षात आहे. वहिनीने खास डोंबीवलीहून जर्बेरा, गुलाब, शेवंतीची फुले आणली होती. माप ओलांडतांना मी घेतलेला उखाणा सर्वांना आवडला.तेंव्हा अतिशय आनंदाने सर्वांनी माझ्यावर व सुबोधवर पुष्पवर्षाव केला.आत प्रवेश करताच आपण कोणीतरी सेलिब्रीटी आहोत अशी वागणूक मला मिळाली.नंतरचे ४-५ दिवस घरात तिचा चैतन्यामयी संचार होता. ती तिच्या मनमोक...
Posts
Showing posts from June, 2024
- Get link
- X
- Other Apps
कृष्णं .. ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी कृष्णगंध हवासा, दरवळ चोहिकडे.. रानातं राधा, शोधे जेथेतेथे... भोवती निळा प्रकाश अनोखा... ती भान विसरून जाई... येई बासरीचा नाद उत्कट... राधा दंगं होई भाववेडी.. थांबली बासरी, चराचर थांबले.. कोटरात शांतता, पानंपानं थिजले.. ती बैचेनं तो अदृश्यं... कान्हा गेला जग स्तब्धं... तिची पापणी भिजे अविरतं.. राधा आर्त कृष्णं नसे.. प्रतिबींबं जळातं दर्शन झाले राधा नाही कृष्णं कृष्णं..
- Get link
- X
- Other Apps
*नववधू आम्रतरू* सौ.स्वरूपा कुलकर्णी हिरवा हिरवा शालू जणू अंगभर ल्यायली, हिरव्या आम्रतरूची ही नवरी कशी सजली जर्द हळदी पिवळे ऊन माखले सर्वांगाते, रूप तरूण साजिरे नखशिखांत खूलते पाना पानांवर सजली मेहंदी बारीक नक्षीची, पर्णसंभार डूले वाऱ्यासवे जणू नवरी लाजली अंगभर हिरवा शालू साजरे रूप आम्रपल्लवांचे, आकाशाशी लागले लग्न भर पावसात तीचे चमचमली पाने हिरवी पावसाने चिंब नाहती, नवरी अंगभर शहारते लागली टाळी रानावरती सनई चौघडे वाजती मेघ बरसती चोहिकडे, क्षणात लागले लग्न निळ्या अवकाशाशी तिचे नववधूला भेटायाला वारा घाली मधुनच पिंगा, आकाशीचा रविराजा देई आशिष नववधुला वर्षाराणी घेऊन येई आहेरांच्या लक्ष सरी, नववधू लाजून चूर होई जडले नाते आकाशाशी गार वारा असा शहारा नवदांपत्य खुलून जाई पावसाळी ऋतू ओला नववधू चिंब होई
- Get link
- X
- Other Apps
#पावसाळा ©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी मनी दाटते काही थेंब वेडे बघतांना घालती मण्यांची माळ हिरव्यागर्द पानांना.... निळा भरला मेघ करतो भूई ओली तिच्या कुशीत अंकुरते नवनिर्माणाची असोशी... तो मिट्ट काळोख येतो घेऊन वीजेची नक्षी आभाळ व्यापते सारे पक्षी घरट्यात बावरती... घनगर्द काळोखातं धरा निःशब्द गीत गाते तिच्या तनमनात वाऱ्याचे बोल हलके... नदीच्या कडेकडेने तांबूस जाग आली कळी जागली हलकेच अतृप्त निशा ओसरली... तो हलकेच हटला तेथे किर्र दाट काळोख दिशा उजळून जाती प्रतिबींब दिसे पात्रात... आसमंत झाले स्वच्छ दिशा झाल्या मोकळ्या गारवा घाली सादं पावसाळा सुरू झाला...