कृष्णं ..
©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी
कृष्णगंध
हवासा,
दरवळ
चोहिकडे..
रानातं
राधा,
शोधे
जेथेतेथे...
भोवती
निळा
प्रकाश
अनोखा...
ती
भान
विसरून
जाई...
येई
बासरीचा
नाद
उत्कट...
राधा
दंगं
होई
भाववेडी..
थांबली
बासरी,
चराचर
थांबले..
कोटरात
शांतता,
पानंपानं
थिजले..
ती
बैचेनं
तो
अदृश्यं...
कान्हा
गेला
जग
स्तब्धं...
तिची
पापणी
भिजे
अविरतं..
राधा
आर्त
कृष्णं
नसे..
प्रतिबींबं
जळातं
दर्शन
झाले
राधा
नाही
कृष्णं
कृष्णं..
Comments
Post a Comment