Posts

Showing posts from May, 2025
 घर सौ. स्वरूपा कुलकर्णी      गेल्या काही महिन्यांपासून आमच्या फ्लॅटचं रिनोव्हेशन अर्थात नुतनीकरण करण्याचा विचार चालू होता. आम्ही नवरा बायको रोज त्याबाबत चर्चा करायचो. खरं म्हणजे नुतनीकरण करतांना खर्चाचा विचार करत होतोच पण त्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी रहावं लागणार हा विचार तितकाच महत्वाचा वाटत होता. २ वर्षांपुर्वीच मिस्टरांनी त्यांच्या काकाचे जुने घर विकत घेतले तेही अगदी हौस म्हणून. कारण काय तर त्यांची लहानपणची जुनी आठवण होती व घर अगदी स्वस्तात मिळाले म्हणूनही. मग फ्लॅटचे रिनोव्हेशन करायचे तर पूर्ण होईपर्यंत कुठेतरी रहावेच लागणार म्हणून राहात्यातल्या या गावातील घरालाच प्रथम पसंती होती. हे घर म्हणजे ३ मोठ्या खोल्या, पाठिमागे भरपूर मोकळी जागा आणि टुमदार असा जुन्या पद्धतीचा बंगला.  लहानपण सोडलं तर नेहमीच फ्लॅटमध्ये आयुष्य गेलेल्या मला हे जरा नविनच व कुतूहलाचं होतं. तसं गावातल्या मैत्रिणी भरपूर आहेतच पण समोर व बाजूला फारशी ओळख नसल्याने जरा वेगळं वाटलं. घराला जुन्या पद्धतीच्या लाकडी,  लोखंडी डिजाईनच्या खिडक्या. ह्या घराचेही पुर्वीच रिनोव्हेशन केलेले असल्याने स्वच्...
 #मातृदिन Repost       -सौ.स्वरूपा कुलकर्णी प्रिय आई,        पत्र लिहीण्यास कारण की, तुझा माझा पत्र संवाद होण्याची ही पहिलीच वेळ. लग्न व्हायच्या आधी तुला सोडून रहाण्याचा प्रसंग क्वचितच आला. लग्न झाल्यानंतर मात्र तुझ्या फोनची कायम वाट पाहिली आणि आजही पहाते. लहानपणापासून मला देव धर्म याविषयी कायम सांगणारी तू माझ्या मनात कायमच श्रद्धेचा अखंड नंदादीप आहेस. यासोबतच तुझा प्रेमळ स्वभाव सतत हवाहवासा वाटतो. आजही वाटतं तुझं साधं, सोज्वळ, सुंदर भोळं रूप देवघरात देवाशेजारी ठेवावं व त्या परमेश्वराला म्हणावं तुझ्यापेक्षाही प्रेमळ आणि माझी अहोरात्र काळजी करणारं एक माणूस आहे बरका माझ्या जगात.    नेहमी कपाळी मोठ्ठं कुंकू लावणारी, सदा वेणीच घालणारी, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र घालणारी माझी ईश्वराचेच दुसरं रूप घेऊन आलेली आई, खरच तुझ्या मुलीचे तू वैभव आहेस. कारण स्वतः पलिकडे माझ्यावर प्रेम करणारी तू, तुझ्या सोशिक स्वभावामुळे माझी आदर्श झालीस जणू माझी संपत्ती झालीस.    फोनवर बोलतांनाही आधी जावयाची, मुलाबाळांची चौकशी करणारी तू त्यांच्यासाठी नवस सुद्धा क...