नविन वर्षाचा संकल्प ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी सर्वप्रथम २०२२ ह्या वर्षाचे मनःपुर्वक आभार मानते.कारण ह्या वर्षाने मला काय दिले हे जेंव्हा वळून पहाते तेंव्हा दिसते ती बक्षिसांची,प्रमाणपत्रांची बरसात...हो खरंय हे वर्ष माझ्या 'लेखिका' म्हणूनच्या प्रवासात लाखमोलाचे ठरले...ह्यासाठी माझे पुर्वीचे संकल्प होते हे निश्चितच पण त्याचबरोबर ही ईश्वर नावाची अनामिक शक्ती माझ्यासोबत असल्याची जाणीव मला खूप खूप सकारात्मक उर्जा देऊन गेली. मी घडले.!!..खरोखर मातीच्या गोळ्याला दिलेला परमेश्वरी कुंभाराचा हस्तस्पर्श!तो चिरस्मरणीय व प्रेरणादायी ठरला...व आता अखंड ते चैतन्य सोबत करणार ही अलौकीक जाणिव देऊन गेला...२०२२ अध्यात्मात प्रगतीकारक व प्रपंचातही नवनविन खरेदी व आनंदाची पर्वणीच देणारा ठरला.. आता उत्सुकता आहे येणाऱ्या नविन वर्षाची...संकल्प आहेत- आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुसंधीचं सोनं करणार.. माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होणार व त्यासाठी- नविन पुस्तकांचे वाचन करणार.. नविन माणसे जोडून जुनी माणसांनाही भेटत रहाणार... चालण्याचा व्यायाम ठेवणार.. मला ...
Posts
Showing posts from 2022
- Get link
- X
- Other Apps
जीवन सुंदर आहे कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी सुंदर सुमने सुंदर बहार सृष्टी प्रभूची निर्मळ फार तू चहुकडे पहा एकवार आनंद पसरला चराचरात मी अन् तू पाहू जग सारे सौंदर्य रसिकांचे मनामनांचे किती भूंगे फुलावरी त्या किती हासती चंद्र अन् तारे किती जन्म घेती सुंदर बाळे क्षणाक्षणांना जीवन लाभे ही अलौकीक रचना प्रभूची आनंदाने भरले जग हे मायेच्या ह्या विशाल पंखी जीवन लाभे हर जीवासी, किती चांदण्या किती ग्रहतारे नक्षत्रांची ओळ क्षितीजाशी येते.... जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे गाती पक्षी गाती वारे मीही गाते हे गीत साजिरे....
- Get link
- X
- Other Apps
'घन ओथंबून येती' कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी घनगर्द त्या राईमधुनी पायवाट ती हिरवी हिरवी, मी निघाले एकटीच त्या उंचच उंच डोंगरावरी... मध्ये मध्ये किरणांची सोबत मधूनच वाहतो झरा अवखळ, पायी माझ्या मध्येच झोंबती पाती हिरवी काळीसावळी..... माझी चाल झाली झप झप गाठाया निघाले ते ध्येयशिखर, उत्साह अदम्य श्वासामधला वेगळा सुखाचा प्रवास माझा.... अवचित आला अंधार क्षणभर मागे पुढे रातकिडे कर्र कर्र, मी मात्र वाट पहात राही कधी दिसेल तो कळस सुंदर.... मध्ये लागले मोकळे रान ते दिसले अवकाश धुसर निळे हे, पण अवचित त्यात आले घन निळे सावळे डोक्यावर... घन ओथंबून येती मी शहारले क्षणभर, फिरूनी माझी वाट चालते दिसले सोनेरी शिखर अचानक... मी नाहले नखशिखांत सारी घन कोसळे अविरत मजवरी, जणू वर्षाव जलधारांचा ध्येयपुर्तीचा उत्सव सारा...
- Get link
- X
- Other Apps
।।श्री गीताजयंती।। ।। जय श्री कृष्ण।। जगातील सर्वच धर्मग्रंथात गीतेचे स्थान अद्वितीय आहे. खरे पाहता गीतेला भारतीय धर्म,दर्शन आणि संस्कृती यांचे प्रतिक व प्रतिनिधी स्वरूप म्हणता येईल. तरी पण गीतेत विद्यमान असलेले सत्य केवळ भारतीयांसाठीच मर्यादित नसून ते कोणत्याही देशातील, काळातील, जातीतील,वर्णातील,आश्रमातील व संप्रदायातील माणसांसाठी सारखेच उपयुक्त आहे. कारण गीता ही सार्वभौम,सार्वजनीन अशा सत्य सिद्धांताचेे प्रतिपादन करते. आपल्या सनातन धर्माचे मूळ म्हणजे वेद. इतर सर्व धर्मग्रंथ या वेदात प्रतिपादन केलेल्या धर्माला समजून सांगण्यासाठीच रचण्यात आले.विषयवस्तूच्या दृष्टीकोनातून वेदांचे २प्रमूख विभाग मानण्यात येतात.कर्मकांड व ज्ञानकांड.कर्मकांडात यज्ञादी कर्मांचा व ज्ञानकांडात ब्रम्हविद्येचा व आत्मज्ञानाचा समावेश होतो.ज्ञानकांडातच उपनिषदांचा अंतर्भाव होतो.उपनिषद हा वेदांचा अंतिम उपदेश असल्याकारणाने त्याला "वेदांत" ही संज्ञा मिळाली आहे. गीतेत शेवटी 'इति श्री मद्भगवद्गीतासू उपनिषत्सू' असे म्हटले आहे. त्यामुळे ते एक उपनिषद अर्था...
- Get link
- X
- Other Apps
विषय- जगायचे राहूनच गेले.... ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी सुन म्हणून सासरी आले नवऱ्याशी मी एकरूप झाले हसत हसत संसार करत नकळत त्यातच गुरफटून गेले.... हळूच आली पिल्लांची चाहूल झाले आई मी रमले त्यातच किती कधी मी वाटले गेले नवरा पिल्ले नी सासूसासरे... अशीच वेळ ती निघून गेली पळपळ वाटला साऱ्यांसाठी संसाराची वाहता ओझी मी नाहीच उरले स्वतःसाठी... पिले हळूच मोठी झाली उडून गेली चाऱ्यासाठी मी अन् तो फक्त उरलो डोळ्यात पाणी हर एकांती.... कसे किती जगले स्वतःसाठी न लागला हिशोब मजला कधी मी होते अबोल केव्हा केव्हा अरे,जगायचेच राहीले किती किती... आयुष्याची ही संधी एकदा न येते फिरूनी परत कधिही मी विसरले संसारात नेहमी न उरला वाटा स्वतःसाठी.....
- Get link
- X
- Other Apps
#स्वरूपा माझ्या आई-बाबांनी माझं इतकं सुंदर नाव कसं काय ठेवलं असा विचार मनात आला..कारण अध्यात्मात व संसारातही स्वरूपा ह्या नावाचा खूप छान अर्थ आहे.त्यातला अध्यात्मिक अर्थ मला जास्त सुखावतो. स्वरूप अर्थात माझे खरे रूप... मी कोण? या प्रश्नाचे उत्तर या स्वरूपात सापडते.. खरंच गम्मत आहे...नावात काय आहे? असे कोणी म्हणेल पण नावातच सगळं आहे हे आपलं अध्यात्म सांगतं.. जर खरा मी गवसलाच नाही तर जगण्याचा हा प्रवास व्यर्थ शीणच ठरतो,हो की नाही? मला जोपर्यंत खऱ्या मीची ओळखच पटत नाही तोपर्यंत हा संसार व अध्यात्मही व्यर्थ ठरते... मी अध्यात्म खूप समजते असे नाही पण आजवरचा अभ्यास सांगतो की जर मी या जगात येऊन स्वतःचीच ओळख करून घेऊ शकत नासेल तर माझा हा जीवन प्रवास किती पोकळ व अर्धवट ठरतो..जोपर्यंत मला उमगत नाही की मी कोण तोपर्यंत परमेश्वर कोण ही ओळख मला कशी पटेल?.. जसे सर्व साधुसंत आपल्याला कोSहम् ह्याचे उत्तर मी तो परमात्म्याचाच अंश आहे हे समजावून सांगतात त्याची पहिली पायरी आहे स्वरूप ओळखणे...ही अध्यात्मातली खूप मोठी गहन गुह्य चावीच आहे.. तो मी कोण हे गवसलं की पुढिल काम झालं...एकदा मी जणू ह्या जगाचा कें...
- Get link
- X
- Other Apps
रंग माझा वेगळा... -सौ.स्वरूपा कुलकर्णी रंग गहिरे सावळे ते त्या कृष्णरंगी डोहातले , मी उभी काठावरी त्या तो वाजवी वेणू तन्मयतेने... मी राधा कृष्णसख्याची तो गिरीधर मुरलीवाला, कळेना सांज कधी झाली मज झाली सावळबाधा... तो उभा नयनांसमोर न तृप्ती लोचनांस तरीही, का भुलावे वेड्या राधेने रंग सांडूनी भक्तीप्रेमाचे... प्रेमात दोघे रंगले ओतप्रेत आज कृष्ण म्हणे राधेला, रंगात रंगुनिया सखे गं रंग माझा वेगळा... सर्वांचा तरी तू वेगळा कसा रे? आमुचा तरी अनासक्त रे, नाही तुजला मायापाश कसले गुंफिले तवपदी प्रितीचे रेशमीबंध..
- Get link
- X
- Other Apps
नमामी दुर्गे दशप्रहरण धारिणी, नेसलीस तू रक्तवर्ण वसने, शुभाशिष दे भवानी वर दे, आलो शरण तूला चंडिके मी वहातो रक्तवर्ण कुसूमे आई तवपदी नम्रभावे, विनंती ही मज सांभाळी रक्तवसना मृगनयने तू रणचंडिका महामाया दुर्गा भगवती शतकमलाक्षी, संध्येसम तव काया भवानी मी करितो प्रार्थना नत तव चरणी तू उग्र रूप धरिसी महिषासूर वधाया हे रक्त सांडले त्रिशूळ तुझे उपसता मी जाहलो कंपित रूप तुझे भयकारी तू उदार जननी तारक परि भक्तांसी उदयोस्तू भगवती जननीअंबिके दे प्रसाद मजला मनःशांतीचा विनवितो सकलारंभे तव चरणी महादेवी आनंदे
- Get link
- X
- Other Apps
कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी "दत्त जयंती सोहळा" दत्तराज माऊली हो माझी योगिराज माऊली। करी कृपेची साऊली माय माझी माऊली।।धृ.।। सांभाळी जनी निरंतर प्रेम तयाचे अपार अनंत। मी लेकरू उपाशी तान्हे मागे गुरूकृपेचा पायस...।।१।। नको देवू जन्म पुनःपुनः लाव नौका पैलतिरी दयाघना। नसे कोणी समर्थ रक्षाया तुजवीण गुरूराया....।।२।। जग हे फसवे निरंतर मी भूलतो व्यर्थ अज्ञ बालक। तू माय वाचवी मायाजाळी मी ऋणी तुझा गुरूमाई...।।३।। धाव वेगे घे जवळी बाळा नाही शांतता तुजवीण माता। घे पाडसा जवळी आई नको तुजवीण दुसरे काही....।।४।।
- Get link
- X
- Other Apps
चाहूल प्रेमाची... सौ.स्वरूपा कुलकर्णी चाहूल गुलाबी थंडीची , लागली हलकी हलकी, मी रंगवू लागलो, स्वप्ने अलवार काही न बोलताही मी तुला, किती कळतात त्या खूणा, हा प्रेमसाधनेचा , ऋतू मनोहारी खरा तू अवचित येते, मी बावरून जातो, भेटीतील क्षण टिपतो, राहतो परत रिता एकटा का काही समजत नाही, कसा दिवाना मी होतो, तू हलके स्मित करता, मी होतो बैचेन खुळा साद तुझी येता हलकेच, मी होतो अधिर बावरा, न सांगताही तुला , कळले भाव ते कसे? ये ,ये ना जीवनी माझ्या, संगिनी होऊन सखे गं, तो क्षण येवो मांगल्याचा, न मागणे देवा अजुन काही
- Get link
- X
- Other Apps
कधी कधी वाटतं.... सौ.स्वरूपा कुलकर्णी कधी कधी वाटतं नको नको हे झुरणं तुझ्यावाचून जगणं हा दुःसह त्रास सोसणं... मी का जगू तुजवीण नाही कशाचीच आस नाही मन रमत कशात बस्स उरले रिते क्षण.... कसा साहू हा ऋतू मी शहारतो आठवांनी तूझी माझी प्रिती भोळी आसवांची रात्र मोठी.... मन उदास उदास नाही उरले कुठले रंग आता उरलो एकाकी पहातो वाट मरणाची... नको उगवणारा दिस नको रात्रीचा विरह ही वेदना दारूण उरले सल घनघोर... तुजवीण मी पोरका वहातो अश्रृंचा नित्य झरा मी तळमळतो सखे गं घे मिठीत घे अखेरचा....
महासत्ता
- Get link
- X
- Other Apps
जगातील (World) सर्वात बलाढ्य देशांची (Powerful Nations) यादी बनवायची असेल तर केवळ आर्थिक आणि लष्करी शक्तीचे प्रमाण पाहिले जात नाही. यामध्ये अनेक घटकांचा सहभाग असू शकतो. नेतृत्व, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, जागतिक स्तरावरील मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध यासारख्या घटकांचा समावेश करून या देशाला जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यात पहिल्या पाचमध्ये अमेरिकेसह चीन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जग युद्धाच्या (World) छायेत असल्यामुळे आज जगातील सर्वात शक्तिशाली देश (Powerful Countries) कोणता हे जाणून घेणं महत्वाचं आहे. येथे शक्तिशाली असण्याचा आधार काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. जगभरातील वर्तमानपत्रांच्या मथळ्यात राहणे पुरेसे आहे की आर्थिक शक्ती (Economic power) किंवा लष्करी शक्ती किंवा दोन्ही गरजेचं आहे. यूएस न्यूजने सर्वात शक्तिशाली देशांच्या क्रमवारीत परराष्ट्र धोरण आणि लष्करी बजेट यासारख्या अनेक घटकांचा समावेश केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील देशांवरील त्यांचा प्रभाव हाही मोठा घटक मानला गेला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्...
- Get link
- X
- Other Apps
एलियन्स -सौ.स्वरूपा कुलकर्णी आपल्या भोवताली असलेल्या संपूर्ण विश्वात किंवा ब्रह्मांडामध्ये पृथ्वीशिवाय इतरही कुठं जीवन आहे का? असेल तर कसं असेल? हे प्रश्न आतापर्यंत शास्त्रज्ञांसाठी अत्यंत गंभीर ठरले आहेत. 1960 च्या दशकात तरुण वैज्ञानिक फ्रैंक ड्रेक यांनी म्हटलं की, एका सूर्यमालेतून दुसऱ्या सूर्यमालेत संदेश पाठवण्यासाठी महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या रेडिओ तंत्राचा वापर करता येऊ शकतो. एलियन्सही तसं करत असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना शोधण्यासाठी आपल्याला केवळ त्यांचं सिग्नल शोधायचं आहे. सेथ शोस्टॅक सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटलिजन्स (सेटी) मध्ये ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आहेत. गेल्या चार दशकांपासून ते एलियन्सचे असेच सिग्नल ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. "फ्रँक यांनी वेस्ट व्हर्जिनियाच्या वेधशाळेत सध्या असलेल्या अँटिनाची दिशा जवळच्या तारांकडे केली. एलियन्स सिग्नल पाठवत असतील तर ते त्यांना कॅच करू शकतात, असा त्यांचा प्रयत्न होता. ते दोन तारांवर लक्ष ठेवून होते. मजेशीर बाब म्हणजे, एका तारेतून त्यांना काहीही संदेश किंवा सिग्नल मिळाले नाहीत. मात्र दुसऱ्या तारेतून त्यांना काही...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र राज्य सौ.स्वरूपा कुलकर्णी "बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!” महाराष्ट्र राज्य हे मुख्यतः मराठी लोकांचं राज्य आहे.त्यात विविध जातीधर्माची व अमराठी मंडळीही गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपण ज्या भागात राहातो म्हणजे ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतिची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग कधी बनुन जातो ते कळत सुध्दा नाही. उदा. आपण कोणत्याही राज्यात राहात असु तर तिथले सण, तिथले व्यवसाय, परिसर, सण समारंभ आपल्याला जवळचे वाटायला लागतात आणि जरी आपण त्या धर्माचे नसलो तरी तिथल्या संस्कृतीशी आपण इतके घट्ट बांधल्या जातो की आपल्या घरावर देखील त्या वातावरणाचा अमंल राहातोच राहातो. भारतात भरपुर राज्य अस्तित्वात आहे, साधारणतः आपल्या संस्कृतिशी मेळ खात असलेल्या राज्यांमधे राहाणे आपण पसंत करतो कारण त्या राज्यात कुठेही फिरलो तरी ते ठिकाण, तेथील माणसं आपल्याला जवळची, कुटूंबाचाच एक भाग असल्यासारखी वाटतात आणि मनुष्य हा नेहमी मानवी स्वभावाप्रमाणे सुरक्षीत वातावरणा...
- Get link
- X
- Other Apps
कारागिराचे यश -सौ.स्वरूपा कुलकर्णी राजापूर नावाच्या गावात एक केशव नावाचा लाकूडकाम करणारा कारागिर रहात होता.त्याच्या हातात दैवी कला होती.त्याने बनवलेल्या वस्तूंना खूप मागणी होती.पिढ्यान् पिढ्या त्याचे पुर्वज हीच कला पूढे नेत आले होते.केशवला एक मुलगी होती.तिचं नाव राधा!..ती लहानपणापासून केशवला लाकडाचे उत्तम शिल्प बनवतांना पहात आली होती.तीला नेहमीच तिच्या बाबांचा अभिमान वाटत असे.हळूहळू राधा मोठी झाली.तिलाही लाकडावरती कोरीवकाम करणे तसेच वस्तू बनवणे शिकावेसे वाटू लागले. एक दिवस ती केशवला म्हणाली, "बाबा, मलाही ही कला शिकवा नं..किती सफाईने तुम्ही इतक्या सुंदर वस्तू बनवता". त्यावर केशव म्हणाला,"राधा,आत्ता नाही.तू आधी उच्च शिक्षण घे.मगच या गोष्टीचा विचार करू." राधा नाखूशीने तयार झाली.पुढे ती मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी शहरात गेली.४ वर्षाच्या कोर्ससाठी ती होस्टेलवर रहाणार होती.पहिल्या वर्षी सुट्ट्यांमध्ये ती गावी आली.बाबा व तिथले कारागिर चर्चा करत बसले होते.तीने सहज चर्चा ऐकली. केशव- " अरे असं खचून कसं चालेल.हेही दिवस जातील....
- Get link
- X
- Other Apps
स्वप्नातली परी -सौ.स्वरूपा कुलकर्णी ती सुंदर परी भेटली अवचित माझ्या घरी आली, अवघडलेली किंचीत भोळी मला भेटण्या उभी लाजरी किती मुलायम तिची काया सुंदर लोभस चेहरा कोवळा, साडीचा पदर घेऊन हाती हळूच लाजली पाहून मजसी एरवी बोलका माझा स्वभाव तो परंतू झाला अबोल शांत हा, कसे वदावे गुपित मनीचे ती संकोचून पाहे मजला आता अचानक झालो वाघ मी गेलो सामोरी तिच्या इतुका घेतले हात माझ्या हाती जवळ ओढिले नकळत तिजला चुंबन घ्याया अधिरे मन हे परंतू नव्हते कोणीच तेथे क्षणात भंगले गोड स्वप्न हे जाहलो आम्ही क्षणात वेगळे हाय!कशी ती जवळी घेतली माझी मलाच लाज वाटली, दुलई माझी अजुनी भासते स्वप्नात पाहिलेली गोड परी ती!!
- Get link
- X
- Other Apps
ही गुलाबी हवा सौ.स्वरूपा कुलकर्णी ही गुलाबी हवा मला सांगते गूज नवे नवे, तुझिया माझिया प्रितीचे भावदर्पण अलवार ते गारवारा तो भरारा वेढला पानाफुलांभोवती, मी सहज गुंफले हात तुझ्या हातात ते स्वर्ग दोन बोट उरला जाहला श्वास वेगवान तो, मी अनावर जाहलो तुला पाहूनी जवळी हे स्पर्श तुझ्या थंड बोटांचा विझवी तप्त अग्नी तो, जो माझिया ह्रदयात पेटला सुप्त अनावर प्रखर तो मी पाहतो तुला साथी जन्मोजन्मीचा, न राहू शकेल तुजवीण मी प्रेमी युगायुगांचा भेट ही गुलाबी साजिरी मन ही दाटले भावनांनी ते, किती जीवा सुखावतो ऋतू हा प्रेमीयुगूलांचा
अनोळखी प्रिती
- Get link
- X
- Other Apps
अनोळखी प्रिती -सौ.स्वरूपा कुलकर्णी अनोळखी या वाटेवरती फुले उमलली सहज सुगंधी, सहवासाचे ऋतू कोवळे अलगत आले तारूण्यात हे मी संकोचून पहिल्यांदा प्रश्न विचारी जगावेगळे, तोही हसूनच बोलत राही उत्तर देई अवखळ मज ते कशी मी गुंतले त्याच्याभोवती नकळे भान सुटले अवघे, भूत भविष्य सारे विसरून समीप आलो प्रेमऋतुते.. कसे कधी न काही कळले एव्हडे अंतर क्षणात सरले, तुम्ही तुम्ही करता करता तू तूझी मी बनले सख्या रे सावध होते इतुके साल मी विसरले माझे सुर वेगळे आता आळवते सूर मखमली तुझी नी माझी प्रित नवीनवी...
- Get link
- X
- Other Apps
खेळ सौ.स्वरूपा कुलकर्णी सूर पारंब्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, लगोरी, मंगळागौरीचे खेळ, झब्बू, बदाम सात, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, गलोल, भातुकली – एक एक आठवायला बसलं की असे कितीतरी खेळ आठवतात. काही खेळ साधे, रंजन करणारे, तर काही स्पर्धात्मक , चढा-ओढीचे, जिंकण्याची इर्षा निर्माण करणारे. या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा, मराठी माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे. हे खेळ जिथे खेळले जायचे तिथल्या समाजाचा, परिसराचा इतिहास त्या त्या खेळात आपण पाहू शकतो. हे खेळ त्या त्या गावच्या संस्कृतीचे आणि तिथल्या रूढी-परंपरांचे प्रतिकं आहेत. सूर पारंब्या जिथे वडाची झाडे होती तिथे खेळला जात होता, गोट्या तर मुले घरोघरी खेळत होती. अख्ख्या महाराष्ट्रात मंगळागौरीचे खेळ बायका श्रावण महिन्यात खेळत असत. पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसे तेव्हा हे खेळ खेळणं बायकांनी एकत्र येण्यामागचं निमित्त होतं. अख्खी रात्र खेळ खेळण्यात जागवली जायची. काही खेळ तर प्राण्यांशी संबधित आहेत. जसे सांगली जिल्ह्यातील समडोली गावात कबूतर पालन हा एक पारंपारिक खेळ आहे. भातुकलीचा खेळ तर प्रत्...
- Get link
- X
- Other Apps
मुलांचे विश्व सौ.स्वरूपा कुलकर्णी बच्चे मन के सच्चे...। हे गीत आपल्या सर्वांच्या आवडीचं..किती सुंदर ओळी आहेत ह्या..लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत.सगळं खरं सांगतात.बऱ्याचदा मोठ्यांचीही खरं बोलून फजिती करतात.त्यांचं सुंदर विश्व जर समजावून घेतलं तर खऱ्या अर्थाने रोजच बालदिन साजरा होईल. लहान मुल जन्माला यायच्या आधी आईच्या पोटात असतं.नऊ महिन्यांच्या त्या जडणघडणीच्या काळात ते दिवसागणीक बदलत असतं.त्याचं निश्चित रंग,रूप,आकार हे ठरायचं असतं.त्याला आई-वडिलांकडून मिळालेले जनुके त्याचे पुढचे व्यक्तिमत्व कसे असेल हे ठरवत असतात.Inheritence हा शब्द आपण वापरतो.ही निसर्गाची प्रजनन क्रिया पार पाडल्यानंतर आई बाळाला जन्म देते.किती निरागस डोळ्यांचं, निष्पाप पिल्लू ती माता या जगात आणते.नैसर्गिक असो अथवा सीझर पद्धतीने ते बाळ अनेक संघर्ष करतच जन्मलेलं असतं.या जगात आल्यानंतर त्याला त्याचं नाव, गाव, ओळख असं काही बोलता सांगता येत नाही.पण ते आपल्या जन्मदात्रीला -आईला ओळखतं.तीने सहन केलेले ते दिवस जणू बाळही विसरलेलं नसतं....
- Get link
- X
- Other Apps
‘आज शिवाजीराजे असते तर....!! - सौ.स्वरूपा कुलकर्णी सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते, तेव्हा भूतकाळातील कर्तव्यकठोर थोर व्यक्तींची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. सध्या आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातली अंदाधुंदी पाहिली की मनात सहज विचार येतो, ‘आज शिवाजीराजे असते तर……!’ शिवाजीराजांना राजकारणातील डावपेच उपजतच लाभले होते. शिवाजीराजांनी महाराष्ट्रातील सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून, उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशहा व कुतुबशहा, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज व पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण केले. आज शिवाजीराजे असते तर पाकिस्तान, चीन अफगानिस्तान या शत्रूंची वारंवार डोके वर काढण्याची हिम्मत झाली नसती. शिवाजीराजांनी शुन्यातून राज्य निर्माण केले. पण त्यांना त्याबद्दल कधीच लालसा नव्हती. हे प्रजेचे राज्य आहे, ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य घडवले होते. राजे राजे हित दक्ष होते. राजांना अन्याची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी ...
- Get link
- X
- Other Apps
मोबाईल नसते तर... सौ.स्वरूपा कुलकर्णी आजचे आधुनिक युग मोबाईल व संगणकाचे युग आहे. आजचे जग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे. मनुष्याने लावलेल्या शोधांमध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आजकाल दिवसाची सुरुवात मोबाईलनेच होते. व्यवसाय नातेवाईक व मित्र मंडळी शी संपर्क करण्यासाठी मोबाईल चा वापर केला जातो. तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर मोबाईल नसता तर...? आज जर मोबाईल नसता तर आजचे हे युग आधुनिक युग म्हटले गेले नसते. कारण आजच्या आधुनिक युगाला परिवर्तित करण्यासाठी मोबाईल ची भूमिका महत्त्वाची आहे. विकासाच्या मार्गावर आज सर्वच वस्तू डिजिटल झाल्या आहेत. मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती आणणे शक्य झाले नसते. कारण मोबाईलच्या च मदतीने पैश्यांची देवाण घेवाण होते. मोबाईल नसता तर नातेवाईक, मित्र तसेच व्यावसायिक लोकांना संपर्क करणे शक्य झाले नसते. आजकाल प्रत्येक वस्तू स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. जगभराची माहिती घरबसल्या मोबाईल मुळे मिळवणे शक्य होते. परंतु जर मोबाईल नसता तर जगात काय काय नवीन घडत आहे हे लक्षात आले नसते. ऑनलाईन शॉपिं...
- Get link
- X
- Other Apps
शीर्षक - " हसा मुलांनो हसा " रचना- सौ.स्वरूपा कुलकर्णी " हसा मुलांनो हसा " निळे सावळे माड अलिकडे आकाशाचे रंग पलिकडे, चला मुलांनो हीच वेळ ती नाचू गाऊ गीत नवे नवे रंग बावरे पक्षी गाती हसरी फुले, मोर नाचती छुनछुन छुन छुन पाऊल पडते हसरे बालक नाचू लागते संध्येच्या या सदनी बागडू फुलपाखरांना पाहूनी खिदळू सोनसाखळीची गोष्टही सांगू उंच उंच ते पक्षी पाहू किती किती उंच हा डोंगर लांबच नदी छोटे ओढे मस्त झोपू कुरणावर त्या नको अभ्यास नको काही अशी ही दुनिया मस्त मजेची चला सफर करू आनंदाची हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा...😃
- Get link
- X
- Other Apps
एक पैशाची कथा सौ.स्वरूपा कुलकर्णी मध्यरात्र उलटून गेली.गडाचे दरवाजे बंद झाले.किल्लेदार जनार्दस्वामी गडाच्या टेहळणीसाठी गडावर पहाणी करू लागले.त्यांना सर्वत्र सामसूम अढळली.फक्त एका खोलीत मिणमिण प्रकाश दिसला.स्वामी तिकडे वळले.ते तिथे येताच.. " सापडली, चूक सापडली" स्वामींचा शिष्य आनंदात नाचू लागला. स्वामी खोलीत आले.तो वरमला.आपले गुरूजी समोर पाहून शांत झाला. स्वामी म्हणाले," बाळा, एव्हड्या मध्यरात्री हिशेबाची चोपडी घेऊन तू काय करतोयस?" बाळ म्हणाला,"महाराज,तुम्हीच शिकवलंय चूक सापडेपर्यंत प्रयत्न करायचा. ही चूक सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतो.हिशेबात एक पैशाची चूक राहीली होती.ती सापडली.म्हणून जागा होतो." जनार्दनस्वामींनी शिष्याला पोटाशी कवटाळले.त्या पोरसवदा लेकराला आशिर्वाद देत म्हणाले," नाथा, धन्य तुझी कामातील प्रामाणिकपणा व गुरूनिष्ठा...एक दिवस तू खूप मोठा होशिल व गुरूंचही नाव मोठं करशील". मंडळी, ते पोरसवदा लेकरू म्हणजेच संतश्रेष्ठ एकनाथ महाराज!..नाथांनी लहान...
- Get link
- X
- Other Apps
प्रवासवर्णन -सौ.स्वरूपा कुलकर्णी मला लहानपणापासूनच प्रवास करायची खूप आवड आहे.प्रवासात केलेली गम्मत जम्मत तसेच अनुभवाला येणारी मनोरंजक घटना मनात घर करून जाते.जग किती सुंदर आहे ते उघड्या डोळ्यांनी पहावं असं माझं मत आहे.सुंदर सुंदर माणसं त्यांचे संवादकौशल्य, वेगळ्या राज्यातील वेगळ्या भाषा, ती ऐकून वाटणारी मजा लहान मुलासारखी एखाद्या परडीत जमा केलेल्या फुलासारखी जमा करावीत.तीच परडी आयुष्यभर जपावी.त्या फुलांचा सुगंध दीर्घ काळ पर्यंत टिकतो.नाश पावत नाही. मी कॉलेजला असतांना हैद्राबाद,तिरूपती असा प्रवास करण्याची सुसंधी चालून आली.मी तर आनंदाने फुलून गेले होते.ती सहल आयोजित केली होती माझ्या आजोबांनी(आईच्या वडिलांनी),त्यांचा औरंगाबादमध्ये ज्येष्ठ मंडळींचा हास्य क्लब होता.ही सहल चौधरी यात्रा कंपनीकडे सोपवली होती.मी , माझी मावशी, आज्जी-आजोबा व इतर ज्येष्ठ व काही तरूण मंडळी या सहलीसाठी एकत्र जमली.आमचा प्रवास औरंगाबाद-हैद्राबाद-तिरूपती असा असणार होता.ट्रॅव्हल्सची बस असल्याने व सोबतची मंडळी अतिशय उत्साही असल्याने गाणी म्हणत,भेंड्या खेळत आमचा प्रवास सुरू झ...
- Get link
- X
- Other Apps
जादूचा चष्मा सौ.स्वरूपा कुलकर्णी श्रीरामपूर नावाचं एक गाव होतं.त्या गावात एक तुकाराम नावाचा शेतकरी राहायचा.त्याला २ मुले व पत्नी असे कुटूंबं होतं.तो अतिशय मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून गावात प्रसिद्ध होता.त्याची गावाबाहेर ५ एकर शेती होती.तो दिवसभर मेहनत करून नांगरणी,खूरपणी, बी पेरणी अशी कष्टाची कामे करत असे. एक दिवस नांगरणी करत असतांना त्याच्या नांगराच्या फाळाला एक कठिण वस्तू लागली.तुकाराम आश्चर्यचकित झाला. मनात म्हणाला ,' अरेच्चा,एव्हड्या दिवसांत तर कधी माझा नांगर कधिही थांबला नाही.आज इथेच का रूतला?' त्याने नांगर जेथे रूतला तेथे खूप वेळ कुदळ मारून जागा उकरली.त्याला तिथे एक जुनी बंद पेटी सापडली.तुकारामचे डोळे चमकले. 'अरे , पुर्वजांचे काही गुप्तधन तर यात नाही?' त्याने उत्सुकतेने पेटी उघडली.पण 'हाय रे दैव' त्याचा भ्रमनिरास झाला.कारण त्या पेटीत एक जुना चष्मा होता.त्या वाईट वाटले.नशीबाला दोष देत त्याने तो चष्मा आपल्या कनवटीला बांधला व पुढिल कामाला लागला.थोड्या वेळाने त्याचा मुलगा सुरज तेथे आला.त्याने तुकारामसाठी जेवणाचा डबा आणला होता. त...
- Get link
- X
- Other Apps
कुटूंब सौ.स्वरूपा कुलकर्णी कुटूंब ही समाजव्यावस्थेची पहिली पायरी आहे. अनेक कुटूंबाचा समुह म्हणजेच गाव.ही पहिली पायरी व्यक्तीच्या मानसिक,शारिरीक,भौतिक गरजांसाठी अत्यंत महत्वाची आहे.कुटूंबाद्वारेच संस्कृतीचे रक्षण व पोषण होते.समाजहीत जपल् जाते.जबाबदार कुटूंबं ही राष्ट्राची खरी संपत्ती होय.कुटूंबातील प्रमुख व्यक्ती ही कुटूंबाचं मार्गदर्शन करते. भारतीय कुटूंबव्यावस्था ही एक आदर्श कुटूंबव्यावस्था आहे.आजी-आजोबा ही बुजूर्ग मंडळी, तसेच आई-बाबा ही पालक मंडळी, त्यांची अपत्ये ही तिसरी पिढी.पुर्वी भारतात कुटूंब ही मोठी होती.अनेक नातेवाईक एकत्र रहायचे.सख्खी-चुलत, नातवंड-पतवंडं एकत्र रहायची.त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असे.आता कालमानानुसार कुटूंबं छोटी झाली.नोकरी-व्यवसायामूळे लोकं परदेशात गेली.बदलत्या जीवनशैलीनुसार जगणं ही स्पर्धा झाली.नात्यातील वीण ढिली झाली.पुर्वीचा आदर नात्यात न राहिल्याने कुटूंबं लहान होत गेली. आज आपण पहातो की कित्येक घरे घटस्फोटाने किंवा अकस्मात मृत्यूमुळे ढासळत गेली.नाती सांभाळण्यापेक्षा ती तुटण्यातच काळ बांधिल झाला.ह...
- Get link
- X
- Other Apps
"आई, मी येतिये गं पाडव्याला.." इति मी. "हो हो ,आम्ही वाटंच पहातोय..सगळे या.." तिकडून आई फोनवर बोलत होती.. माहेरी जायला मिळणार म्हणून माझा आनंद नुसता ओसंडून वहात होता..बच्चेकंपनी तर नाचूच लागली..एकूणच काय सगळं वातावरण खूश्श!! दिवाळीतले हे संवाद सर्वत्र ऐकायला मिळतातच..कारण ही पर्वणी दर वर्षात एकदाच येणारी पण वर्षभर आठवणीत रहाणारी.. दिवाळीचा आनंद माहेरी जायला मिळणार म्हणून वाढलेला असतो😀तसं पाहिलं तर दिवाळी चा आनंद १ महिना आधिच दिवाळी येणार म्हणून जाणवत असतो..कसा नि किती ते सांगता मात्र येत नाही..सुख सुख म्हणतात ते काय असतं ते दिवाळीतच कळते...एक स्त्री म्हणून नविन साडी घेण्यातलं सुख..पिल्लांना नविन कपडे आणन्यातलं सुख..नवऱ्याला दिवाळी गिफ्ट मागण्यातलं सुख..दिवाळी येणार म्हणून सगळं घर आवरण्यातलं व नंतर निवांत चहा घेण्यातलं सुख.. फराळाच्या नवनविन रेसिपी बनवून सगळ्यांची वाहवा मिळवण्यातलं सुख...ही यादी न संपणारी...😍.. लक्ष्मीपुजनाला उजळणाऱ्या लक्ष लक्ष दिव्यांना पाहून हसणारी दिवाळी मनात चांदणं गोंदणं करते ..जणू सुखांच्या राशी लक्ष्मी भरभरून देत असते.आ...
- Get link
- X
- Other Apps
माझा देश सौ.स्वरूपा कुलकर्णी जननी जन्मभुमिश्च स्वर्गादपी गिरीयसी। ह्याचा अर्थ माझी मातृभूमी स्वर्गाहूनही मला जास्त प्रिय आहे.प्रभू रामचंद्रांच्या तोंडी हे वाक्य रामायणात आलं होतं.हे किती थोर विचार आहेत हे सांगायलाच नको.कारण मातृभूमीचा सुपूत्र म्हणून जेंव्हा जगभर गौरव होतो तेंव्हाच कळतं की अभिमानाने वक्ष किती फुलून येतो.माझा देश- भारत देश हे सांगतांना कितीतरी अब्द अब्द मनात दाटून येतं.माझे अस्तित्व ज्या भूमीने निर्माण केले तिला वंदन केल्याशिवाय होत नाही.वंदे मातरम् हे गीत ऐकतांना अंगावर शहारे येतात.ए.आर.रहमानने ते किती ह्रदयातुन गायलंय! शत्रूचा फडशा पाडत असतांना अंगावर आलेली गोळी झेलून वीर जवान जेंव्हा त्याही स्थितीत 'वंदे मातरम्' म्हणतो तेंव्हा मातृभूमीसाठी चाललेल्या यज्ञात एक आहूती अर्पण होते.स्वातंत्र्ययज्ञात ७५ वर्षांपुर्वीही असेच अनेक वीर योद्धे लढता लढता मृत्युमुखी पडले.पण त्यांच्या अपार कष्टातून स्वातंत्र्याचा सुर्य उगवलाच.ही भूमी शत्रूंच्या जाळ्यातून मुक्त झाली.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत भूमी स्वतंत्र झाली.परत एकदा मुक्तीचे वारे वाहू लागले.प्रत्येक भारतीय नाग...
- Get link
- X
- Other Apps
चित्रपट -सौ.स्वरूपा कुलकर्णी चित्रपट हे एक दृकश्राव्य माध्यम आहे.यातून एकाचवेळी डोळे व कान तृप्त होतात.माणसाच्या भावभावनांना मिळालेला सुंदर प्लॅटफॉर्म म्हणजे चित्रपट.पुर्वी लोक चित्रपट पडद्यावर पहायचे..पण जसा काळ बदलला चित्रपट सिनेमागृहात बघितली जाऊ लागली.त्यातही बदल होऊन ती डिजीटल युगाकडे सरकली.आज OTT प्लॅटफॉर्मवर घरबसल्या मोबाईलवर नवनविन चित्रपट पहायला मिळतात.ही खरी डिजीटल क्रांतीच आहे.चित्रपटांचा हा मनोवेधक प्रवास अतिशय रंजक आहे.आज आपण टिव्हीमुळे जुने चित्रपट पाहू शकतो. चित्रपट हे एक तंत्र आहे.या तंत्राच्या माध्यमातून अतिशय सुंदर,तरल,भयावह,सजिव चित्रकथा सादर केल्या जातात.त्याला संगिताची अप्रतिम जोड देऊन चित्रपट अधिक भारदस्त बनतो.त्यातून माणसाच्या जीवनाला जवळून स्पर्श होतो.चित्रपटांमुळे सहज सुंदर कलाविष्कार सादर केले जातात.लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात.काही चित्रपट लहानांसाठी असतात तर काही फक्त मोठ्यांसाठी.चित्रपटात काही विषय मोठ्याप्रमाणावर चोखाळलेले आहेत.प्रेम, स्त्री, नाती,ईश्वर, भक्ती...
- Get link
- X
- Other Apps
सण सौ. स्वरूपा कुलकर्णी भारतात कोणताही सण मग तो दिवाळी असो की दसरा, मकर संक्रांत असो की होळी तसेच ईद असो की ख्रिसमस सगळ्या सणांचा उद्देश हा परस्परांतील सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढावी हा असतो.या सणांमुळे समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी खूप मदत होते.मानवी मन हे मुळातच उत्सवप्रिय असतं त्यामुळे असे सण उत्सव समाजात आनंद,उत्साह आणतात.त्यातुन नवनवीन कलांना प्रोत्साहन मिळते.ईश्वराप्रती आदरभाव वाढीस लागतो. सण ही संकल्पनाच मुळात घरातील,गावातील व पर्यायाने राष्ट्रातील संस्कृती संवर्धनासाठी उपयोगाची ठरतात.सणवारातील रूढी व परंपरा नात्यातील गोडवा अखंडपणे जोडून ठेवतात. हिंदूंच्या काही प्रमुख सणांची माहीती घेऊया.हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा नविन वर्षाचा पहिला सण असतो.त्यादिवशी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. त्यामागे पुराणातील कथा प्रसिद्ध आहेत.प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले तो दिवस गुढिपाडव्याचा दिवस मानला जातो.वर्षभरात हिंदूंमध्ये अनेक सण उत्सव साजरे होतात.दसरा हा सण प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणून साजरा केला...
- Get link
- X
- Other Apps
पुस्तक मानवी इतिहासातील अतिशय महत्वाचा शोध म्हणजे पुस्तक छपाईचा शोध! माणसाने त्याला माहित असलेल्या ज्ञानविज्ञानाच्या आधारे अनेक शोध लावले.परंतू पुस्तक छपाईने एक वेगळीच क्रांती साधली.मानवाच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा या पुस्तकाने घेतलाय.माणसाला ज्ञात असलेल्या गोष्टी त्याने पुस्तकात छापायला सुरूवात केली.त्यातून प्रत्येकाला ते ज्ञान संक्रमित करता येऊ शकले.यातून विचारांची देवाणघेवाण शक्य झाली.जगणं रंजक बनलं.पुस्तकांनी मुलांचे शालेय जीवन बहुरंगी बनले.ती त्यांची ज्ञानशिदोरी बनली.लेखकांची प्रतिभा पुस्तकातून बहरू लागली.नवनवीन सर्जक कला त्यातून उभारी घेऊ लागल्या.कविंच्या कविता फेर धरू लागल्या.विज्ञानातील शोध सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले.जग एकमेकांशी 'जोडले' गेले.पुस्तके विचारमंथनाचे काम करू लागली.चिंतनशील माणसाला पुस्तकांचा फार मोठा लाभ झाला आणि होतोय.सांस्कृतिक देवघेवीत पुस्तकांचा वाटा मोठाय.पुस्तकातील अपरिमीत माहितीचा खजिना मानवी आयुष्यातिल प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकतात.एकूणच माणसाचे आयुष्य सुकर झाले.तसेच अधिक कार्यक्षम झाले. पुस्तके जितकी आपली मै...
- Get link
- X
- Other Apps
नाते जुळले मनाशी मनाचे कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी धागे विणले नवनात्यांचे, माहेर सोडून सासरी आले, जन्म नवा हा मजला भासतो, शतजन्मीची भावफूले रेशीमगाठही हळूच सांगते, तुझे नी माझे बंध प्रितीचे, मनात तुझिया मी राहते, माझिया मनी तूझाच वावर रंग प्रितीचे मनी मानसी, फुलते झूरते असे साजिरे, गंध मोगरा अमृत शिंपी, तुझे नी माझे जग हे सुखाचे मी व तू न राही आता अंतर, करू साजरा आनंद जन्मभर, आता न जाणीवा वेगळ्या उरल्या, नाते जुळले मनाशी मनाचे
- Get link
- X
- Other Apps
चंद्र आहे साक्षीला कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी धूंद सुगंधी निशा ही भरजरी लेवूनी साज शृंगार यौवनाचा तू उभा जवळी माझीया चंद्र आहे साक्षिला.. मी उभी मूग्ध बावरी अबोल संकोचूनी तुझिया समिप रे झाले अबोल क्षण एकांतातले हे चंद्र आहे साक्षिला... वारा निशःब्द जाहला अधिकच हळूवार वाढवी ओढ आपुल्यातली तू -मी शांत तरीही प्रेम उमलते हे चंद्र आहे साक्षिला.. वाढे गोड अनामिक हुरहूर क्षणांना जवळ ओढिलेस बहुपाशांत मजला मी उभी बावरून ह्रदयाशी तुझिया चंद्र आहे साक्षिला.. जाणवे धडधड तुझिया छातिची, मी भारावले मुग्ध केव्हडी लाजूनी तू प्रितीत सख्या मीही तूझी चंद्रिका रे चंद्र आहे साक्षिला..
- Get link
- X
- Other Apps
‘गर्भ’ या संस्कृत शब्दावरून ‘गरबा’ हा शब्द आला आहे. गर्भदीप म्हणजेच मातीच्या भांडय़ांचा दिवा जो मध्यभागी ठेवला जातो, त्यालाच गरबो किंवा गरबा असं म्हणतात. या मातीच्या मडक्याला छिद्र असतात व हे मडके मनुष्याच्या शरीराचे प्रतीक मानले जाते तर त्यात तेवत असलेला दिवा शुद्ध आत्म्याचे प्रतीक आहे. आत्मरूपी ज्योत तशीच तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना नवरात्रीत आदिशक्ती दुर्गामातेकडे केली जाते. नवरात्रीमध्ये असुरांवर विजय मिळवणाऱ्या, शक्तीचे, तेजाचे प्रतीक असणाऱ्या दुर्गा किंवा अंबेमातेला वंदन केले जाते. आश्विन महिन्यात येणारी नवरात्र बंगालमध्येही मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते, मात्र नवरात्रीत खेळला जाणारा गरबा गुजरातमध्येच मुख्यत्वे पाहायला मिळतो. गरबा किंवा गरबोच्या पारंपरिक स्वरूपामध्ये केवळ स्त्रिया मध्यभागी गडवी (गरबा-दीप) ठेवून त्याभोवती गोलाकार आकारात फेर धरून गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत नृत्य करीत. तर ‘गरबी’ या प्रकारात केवळ पुरुष भरपूर ऊर्जा व जोशपूर्ण नृत्य करतात. तर हातात दांडिया घेऊन खेळले जाते, त्याला ‘दांडिया किंवा दांडिया रास’ असे म्हटले जाते. गरब्याची गाणी प्...
- Get link
- X
- Other Apps
आजच्या स्त्रीला जिजाऊ होण्याची गरज आहे का? लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवरायांच्या माता अर्थात भारताच्या राष्ट्रमाता जिजाऊ या प्रेरणेचा जिवंत आणि सार्वकालिक स्रोत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला आणि दोघांनी मिळून स्वातंत्र्याला जन्म दिला.. त्यांच्यामुळे स्वातंत्र्याची धगधगती मशाल नव्हे तर यज्ञकुंड अवघ्या हिंदुस्तानात पेटले. राष्ट्रमाता जिजाऊंनी त्याकाळच्या शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या विरुद्ध स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटवण्यासाठी स्वतःच्या मुलाला नव्हे… नव्हे संपूर्ण हिंदुस्तानला प्रेरणा दिली. आज आपल्याला वाटते कि छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावेत. तर मला असे वाटते की यासाठी पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येणे गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिवनेरीवर जन्म दिला. शिवरायांच्या कर्तृत्वाला फुलवण्यासाठी स्वातंत्र्याचे संस्कार त्यांच्यावर केले. सतराव्या शतकात सर्वत्र गुलामगिरीची अमंगळ दुर्गंधी येत असताना स्वातंत्र्याचा सुगंध निर्माण करण्यासाठी छत्रपती श...
- Get link
- X
- Other Apps
#_जागर_आदिशक्तीचा विषय क्र. ४- नवरात्रीचे उपवास श्रद्धा अंधश्रद्धा लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी उपवास या शब्दाचा अर्थ देवाजवळ रहाणे होय.मनाने अनुसंधान करणे व शरीरही त्यालायक बनवणे हे अपेक्षित असते.नवरात्रीच्या ९ दिवसात बऱ्याच ठिकाणी ९ दिवस उपवास केला जातो.तो कुलाचार रितीनुसार पहायला मिळतो.त्यामागे अनेक शास्त्रिय कारणे आहेत.हा उपवास शरीराला अधिक उर्जावान बनवतो.शरीराची ताकद वाढवण्यात उपवासाचा खूप मोठा वाटा असतो.हा केवळ शरीराला रोजच्या अन्नापासून दूर ठेवून वजन कमी करण्यासाठी केला जाणारा प्रकार नसून याला खूप मोठे अध्यात्मिक महत्व आहे.देवीची कृपा लाभावी असा उद्देश आहेच तसेच शरीरही उर्जावान बनवण्याचा हितसंकल्पही आहे.जर शरीर धड तर सगळं ठीक.नाहीतर आपण आजारांच्या विळख्यात सापडतो.देवीच्या आराधनेत मनाप्रमाणे शरीराचीही तयारी उत्तम हवी असा यामागचा दृष्टीकोन आहे. नवरात्रीचा पारंपारिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो. खालील प्रमाणे बऱ्याच ठिकाणी हा उपवास केला जातो. ...
- Get link
- X
- Other Apps
#_जागर_आदिशक्तीचा विषय क्र ६- नवरात्रकाळातील विशिष्ट पद्धती किंवा प्रथा लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी मी माहेरची दिक्षीत व सासरची कोऱ्हाळकर- कुलकर्णी.माझं माहेर संभाजीनगर व सासर राहाता तालुका,जिल्हा अहमदनगर.माझं सासरचं कुलदैवत सप्तश्रृंगी देवी.आमचं मुळ गाव कोऱ्हाळा.राहात्यापासून अगदी जवळ.तिथे पुर्वी आमची शेती व वाडा होता.आज तिथे देवीचं मंदिर आहे.मंदिर खूप जुनं व साधंच आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात महालक्ष्मी,महासरस्वती व महाकालीच्या मुर्त्या आहेत.नवरात्रीत इथे उत्सव करतात.देवीच्या मंदिराला सजवले जाते.नवरात्रीत ९ दिवस देवीची पूजा आरती यथासांग केली जाते.आम्ही सगळे एक दिवस देवीच्या दर्शनाला जातो. आम्ही कोऱ्हाळकर ९ दिवस देवीचा उपवास करतो.९ दिवस घरात पलित्याने आरती होते.देवीसमोर अखंड दिवा ठेवला जातो.देवीची सकाळ संध्याकाळ आरती होते. रामदास स्वामी रचित "अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो" ही पारंपारीक आरती म्हंटली जाते.या ९ दिवसात कुंकूमार्चन, श्री सुक्त पठण,सप्तशती पठ...
स्त्री शक्ती व समाज
- Get link
- X
- Other Apps
परमेश्वराने जग निर्माण केलं ते मुळमायेपासून.म्हणजे पुरूष व प्रकृती हेच प्रथम पुरूष व स्त्री.त्यांच्या संयोगातून हे ब्रह्मांड निर्माण झालं.निसर्गत:च ते दोघेही मानव योनीतही परस्पर पुरकच राहिले.जग कितीही बदलले तरी ही परमेश्वराची जोडी अखंडपणे कार्य करते आहे.हा पुरूष प्रकृतीचा खेळच जगात अनेक घडामोडी करत असतो.मानव योनीत नर व मादी हा इतर प्राणीवर्गासारखा भेद नसून तो पुरूष व स्त्री असा आहे.म्हणजेच मानवाला जन्मतःच मन व बुद्धी मिळालेली असल्यामुळे ते दोघेही इतर प्राण्यांपेक्षा निश्चितच वेगळे व असामान्य आहेत. प्राचीनकाळी मानवाने निसर्गशक्तीलाच दैवत मानले. शेतीचा शोध हा मानवीजीवनातील सर्वांत क्रांतिकारक शोध. शेतीमुळे माणसाचे भटके जीवन स्थिर झाले आणि धरणीच्या ठिकाणी असलेल्या सुजलाम सुफलाम या गुणांची ओळख झाली. तेव्हापासून मातृदेवतेच्या पूजेचे महत्त्व वाढले. स्त्रीकडेही बीजधारणेचा गुण असल्यामुळे तिलाही आदिशक्ती मानून तिच्या मूर्ती बनवून तिला मखरात बसवून तिची पूजा केली जाऊ लागली. कालांतराने पुरुषसत्ताक व्यवस्था वाढत गेली आणि एकीकडे स्त्रीची पूजा, तर दुसरीकडे तिचा छ...
- Get link
- X
- Other Apps
#_जागर_आदिशक्तिचा लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी विषय क्र.१- स्त्री जन्म एक आव्हान ' स्त्री जन्मा तुझी कहाणी, ह्रदयी पान्हा नयनी पाणी....' ह्या गीतात स्त्रीची मनोव्यथाच व्यक्त झालीये..किती खरीये ती...आजच्या आधुनिक काळातही ही व्यथा लागू पडते हेच दुर्दैव.. मला असं वाटतं भारतासारख्या सुसंस्कृत विचारधारा व संस्कृती असणाऱ्या देशातही स्त्री ही कधी देवी म्हणून पुजली जाते तर कधी 'पायीची वहाण पायी बरी' म्हणून दुर्लक्षली जाते.रामायण काळ असो की आजचा पुढारलेला काळ असो स्त्रीची विटंबना ठरलेलीच..कायम पुरूषांच्या पुरूषी अहंकाराला ती बळी पडते.. रामायणात आपण पहातो देवी सीतेसारखी अत्यंत पतिव्रता स्त्री पण तिही रावणाकडे राहिली म्हणून अग्निपरिक्षा देत रहाते..त्या अग्निपरिक्षा देऊन देऊन कंटाळून गेलेली ती अखेर धरणी दुभंगून त्यात सामावून जाते..तिचा झालेला हा मानसिक छळ तसेच तिची ही घनघोर विटंबना ह्रदय कासाविस करून जाते..तिची कोणतीच चूक नसतांनाही अग्निपरिक्षा तिने दिली व स्वतः राजा रामही यात हस्तक्षेप करत नाही हे ...
खेळ मनाचा
- Get link
- X
- Other Apps
सौ.स्वरूपा कुलकर्णी किती छान असतो ना हा खेळ मनाचा, एकांतात मुक्ततपणे तूझ्या आठवणीत रमण्याचा, तू सोबत नसता तुला क्षणक्षण आठवण्याचा, मनातल्या घोड्यांना स्वैर उधळू देण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, राहून राहून तुझी याद करत राहण्याचा, शेवटच्या भेटीतील तूला स्ममरण्याचा, दिशाहीन मनाला मुक्त उधळू देण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, पंजाबी ड्रेसमधल्या तूला फोटोत पहाण्याचा, सोडलेल्या बटा तुझ्या मनानेच सावरण्याचा, चेहऱ्यावरील गोड हसू पुन्ह पुन्हा पहाण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, रंग बावरी स्वव्पे तारूण्नात पहाण्याचा, दुर राहाणाऱ्या तुला बसस्टॉपवर पहाण्याचा, माझ्या सिटाशेजारीच येऊन बसण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, आपली कधीही न झालेली तू दूर होतांना बघण्याचा, विनाकारण तूला आत मनात साठवायचा, नको नको म्हणतांनाही परत चुका करण्याचा
- Get link
- X
- Other Apps
विषय-पितृपक्ष समज गैरसमज ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी आपली संस्कृती श्रद्धेला,कृतज्ञतेला खूप महत्वाचे स्थान देते.कारण, मानवाचे जगणे हे सार्थ ठरवण्यात ही श्रद्धा व कृतज्ञता खूप महत्वाचा वाटा उचलते.मनुष्य प्राणी हा नुसता प्राणी नसून मानव्य जपणारा,संस्कृती जपणारा जीव आहे,हे त्याचे वेगळेपण आहे.माणसाला जगतांना त्याच्या अनेक पिढ्या जी मोलाची भर या जगात घालत असतात ती शब्दांनी व्यक्त करता येणे केवळ अशक्य.मानवी उत्कांती म्हणजेच पिढ्यान पिढ्या घडत आलेले सकारात्मक बदल.मग ते रहाणीमान असो की जीवनशैली.बदल हे सकारात्मक घडले की समाज सुखी होण्याकडे प्रवास करतो.हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी व अभ्यासाद्वारे समजू शकतो.ही भौतिक जगण्याची लढाई सुकर होते ती पुर्वजांनी केलेल्या अनेक अभ्यासांमुळे,वैज्ञानिक शोधांमुळे त्यांच्या अध्यात्मिक संशोधनामुळे.आपण अनुभवत असलेले हे सकारात्मक बदल अनेक पुर्वजांच्या कठोर मेहनत,शिस्त,परिश्रम,त्यांच्यातिल अभ्यासू वृत्ती,गुणवत्ता याचा परिपाक आहे.हे समजून घेतांना खरंच आपण या पितृऋणातून कधीतरी मोकळे होऊ का? खचितच नाही हे उत्तर येईल.हे नैसर्गिक सत्य आहे.म्हणूनच आपला उदात्...
- Get link
- X
- Other Apps
विषय- "काकस्पर्श" कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी "काकस्पर्श" पिंडास स्पर्श होता, आत्मा क्षणात शांत होतो, जणू मृत पुर्वजांना तूच समाधान देतो पितरांची अवगुंठलेली गती तुझ्याने मिळते जरी काळा रंग तुझा स्पर्शाने मुक्ती मिळते रे काव काव करिशी, एकाक्ष तुजं म्हणती रे तूजविण मानवाला, ना सद्गती या जगती राहती पिढ्यान पिढ्या मर्त्यलोकी या मानवाच्या, तुजविण कावळ्या रे तडफडती पिंडात ह्या धन्य तुझी दृष्टी रे काक शोधसी योग्य पिंडास, तुझ्या स्पर्शाने केली मुक्ती सदैव मानवास
- Get link
- X
- Other Apps
❤️लेखणीतून उलगडत गेलेली स्वरूपा प्रिय स्वरूपा, तुला वाढदिवसाच्या वाचनालयातील भरपूर अजरामर पुस्तकांइतक्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!🌹 आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तू मला कशी उलगडत गेलीस ह्याचा सखोल विचार मनात आला.साधारण दोन वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवात माझ्या शेजारी एक उंच, गोरीपान, सडपातळ, सुंदर, हसतमुख व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते,गोऱ्यापान देहावर गडद रंगाची साडी खूप शोभून दिसत होती. चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिच्या शालिनतेची साक्ष देत होता. सगळ्यांशी गोड आणि शांतपणे बोलण्याने तिचे पावित्र्य आणि निर्मळ मन डोकावताना दिसत होते. तिथे आमची ओळख झाली. हीच ती स्वरूपा कुलकर्णी. इथूनच तुझ्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडायला सुरवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर "शब्दसोहळा" च्या स्वलिखित महिलांच्या लेख वाचनाचा कार्यक्रम गुगल मीट द्वारे घेण्यात आला,त्यात मी सहभागी होते. तिथे तुझा स्मार्ट फोनचे महत्व सांगणारा लेख ऐकला. खरं सांगायचं तर ह्या स्मार्टफोनमुळे आणि त्यावर केलेल्या लिखाणामुळे तूझी व माझी मैत्र...
- Get link
- X
- Other Apps
रजनी ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी पश्चिमेचा आला गार वारा, घेऊनी खगांचा थवा सावळा, रंग होती गडद खास ते, अवकाशीच्या पटावरचे संध्येच्या हाती हात देऊनी, आली रजनी सुखद शांत ती, माळूनी गजरा नक्षत्रांचा, चंद्र रेखूनी भालावरती तीने चंदेरी घालूनी पैंजण, हाती गोंदले चांदण सुंदर, स्वैर अलगद टाकूनी पाऊल, जणू मिटले स्वर्गधरेचे अंतर ती शोडष नवयुवती सुंदर, मधुचंद्रही लाजे क्षणभर, पाहूनी लावण्य तिचे अलौकीक, वायू पोहोचवी सुगंध दरवळ ती अस्मानी परी लाजरी, करूनी श्रृंगार नववधूपरी, सहज हालवी बटा हलके, डहूळले पाणी डोहावरचे सुगंधी रात्रीत त्या घडते, स्वप्न अनोखे युगुलांचे ते, प्रेम करूनी अती दंगले, रजनीच्या भव्य महाली ते कृष्ण रंगी रजनीचा पसारा, चोहिकडे दरवळ तो रातराणीचा, मुक्त केश कलापा वरती, दिसे चांदणी चमचमणारी दिशा सभोवती घालूनी पिंगा, चंद्र दुधी समुद्रास खेळवी, जमुनी सारे ग्रहगोल देखणे, करिती क्रिडा स्वैर सुखाने अलगद दस्तक प्राची देई, अरूणाचा निरोप घेऊनी, झरझर तिच्या चेहऱ्यावरती, फुले गुलाबी लाली साजिरी अशा रितीने होते पहाट, रजनी लाजूनी पळते दूर, हलकेच पाऊल पडले मग ते, उषाराणीची चाहूल लागते
- Get link
- X
- Other Apps
निर्माल्य ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी आबांची पुजा केंव्हाच झाली.पहाटेच उठून सगळं उरकून आधी देवपूजा करण्याचा त्यांचा परिपाठ अनेक वर्षांचा.आनंदी या घरात सून म्हणून आली नी घरात सर्वांशी एकरूप झाली.आनंदीला सुरूवातीपासूनच आबांच्या या देवपूजेचं भारी कौतूक व कुतूहल होतं.का ते या उतारवयातही देवपूजा इतक्या आवडीने करत असतील?तिला प्रश्नच पडायचा.माधव त्यांचा मुलगा पण तो मात्र देवाधर्मापासून लांबच.म्हणजे गणपती उत्सव हा त्याचा लाडका सोहळा पण एरवी मात्र देवासमोर नमस्कार करण्या पलिकडे तो जात नसे.आबा मात्र स्वभावाने धार्मिक.रोज सत्संग ऐकणारे.नामस्मरण करणारे.सत्तरीतही तरूणाला लाजवतील अशी अनेक कामं शिताफीने करणारे.घरी गाई-गोठा..परसात अनेक जातीची फुलं त्यांनी स्वतःहून जोपासलेली.गावातली सारी लहान थोर मंडळी आबांच्या शब्दाबाहेर नसे.त्यांचा एक वेगळाच रूबाब व थाट पहाणाऱ्याला जाणवत राही.मनाने अतिशय स्वच्छ,दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध.. आज पहाटेच नित्याप्रमाणे आबांना जाग आली.झुंजूमुंजू झालं होतं.कोंबडा आरवला.बंबात पाणी टाकण्याचा आवाज त्यांना आला.ह्या...
- Get link
- X
- Other Apps
जीवना तव सुंदरता सुंदर होण्यात सरे... ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी कविश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी केलेलं हे विधान किती सार्थ आहे हे रोजच्या जगण्यात आपण पावलो पावली अनुभवतो.या वाक्यात जगण्याची धडपड व त्यातून घडणारे आपण ही लढाई खऱ्या अर्थाने टिपली आहे...बरोबरच बोलले ते जगण्याशी चाललेली नित्य झकड-पकड व त्यातले डाव कधी जिंकतांना कधी हरतांना नकळत आपण स्वतःच स्वतःला घडवत जातो..एखाद्या कसलेल्या मुरब्बी कलाकाराच्या शिल्पासारखे.सहज, नैसर्गिक तरिही सुबक,वेगळेपण जपलेले...ही त्या विश्वनियंत्याची खरी ताकद आहे.आपण घडत जातो " तो" घडवत जातो...ते अनोखे शिल्प घडायला कितीतरी नाट्य,वेळ,पैसा,शक्ती,विचार अशा अनेक गोष्टी खर्ची पडत असतीलही पण मंडळी हीच तर त्या विधात्याची साधन सामग्री आहे..याच साधनांचा वापर होऊनच घडते ते एक परिपक्व सुंदर व्यक्तिमत्व..विधात्याच्या अफलातून कौशल्यानेच साकारतो तो परिपक्व मानव..ही सुंदरता मिळवायला त्या मानवाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागते.तो शिकतो, कधी पडतो धडपडतो पण पुढे चालत रहातो.मार्ग कितीही घनघोर असो, तो पुढेच जात रहातो.मानवी आयुष्याची ही खरी जमेची व तितकीच कठी...
- Get link
- X
- Other Apps
विषय -लता मंगेशकर " मेरी आवाजही पहचान है।...." भारत सरकारने लतादीदींना ‘भारतरत्न’ हा किताब दिला, तेव्हा मनात आले की, या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली? लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर ‘स्वरभारती’, ‘कलाप्रवीण’, ‘सूरश्री’, ‘स्वरलता’ व ‘डी. लिट.’ असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे अथक परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते – या उक्तीनुसारच आज साऱ्या दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करतात. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे. दीदींच्या गळ्यात ‘गंधार’ आहे, याची कल्पना त्यांच्या बाबांना-दीनानाथांना होती. ते दीदींना सांगत, “लता, तुझ्यावर ईश्वराने कृपा केली आहे, गळ्यातला गंधार सांभाळ.’ लतादीदींनी आपल्या पित्याचे वचन आयुष्यभर सांभाळले. आज त्या गंधाराने आम्हा रसिकांचे जीवनही तृप्त केले आहे. अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८००...