स्वप्नातली परी
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
ती सुंदर परी भेटली
अवचित माझ्या घरी आली,
अवघडलेली किंचीत भोळी
मला भेटण्या उभी लाजरी
किती मुलायम तिची काया
सुंदर लोभस चेहरा कोवळा,
साडीचा पदर घेऊन हाती
हळूच लाजली पाहून मजसी
एरवी बोलका माझा स्वभाव तो
परंतू झाला अबोल शांत हा,
कसे वदावे गुपित मनीचे
ती संकोचून पाहे मजला
आता अचानक झालो वाघ मी
गेलो सामोरी तिच्या इतुका
घेतले हात माझ्या हाती
जवळ ओढिले नकळत तिजला
चुंबन घ्याया अधिरे मन हे
परंतू नव्हते कोणीच तेथे
क्षणात भंगले गोड स्वप्न हे
जाहलो आम्ही क्षणात वेगळे
हाय!कशी ती जवळी घेतली
माझी मलाच लाज वाटली,
दुलई माझी अजुनी भासते
स्वप्नात पाहिलेली गोड परी ती!!
Comments
Post a Comment