अनोळखी प्रिती
अनोळखी प्रिती
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
अनोळखी या वाटेवरती
फुले उमलली सहज सुगंधी,
सहवासाचे ऋतू कोवळे
अलगत आले तारूण्यात हे
मी संकोचून पहिल्यांदा
प्रश्न विचारी जगावेगळे,
तोही हसूनच बोलत राही
उत्तर देई अवखळ मज ते
कशी मी गुंतले त्याच्याभोवती
नकळे भान सुटले अवघे,
भूत भविष्य सारे विसरून
समीप आलो प्रेमऋतुते..
कसे कधी न काही कळले
एव्हडे अंतर क्षणात सरले,
तुम्ही तुम्ही करता करता
तू तूझी मी बनले सख्या रे
सावध होते इतुके साल मी
विसरले माझे सुर वेगळे
आता आळवते सूर मखमली
तुझी नी माझी प्रित नवीनवी...
Comments
Post a Comment