तूझी आणि माझी मैत्री ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी जसे फुलपाखरू उडे दोन पंखांनी तशी मैत्री तुझ्या माझ्यातली एकमेकांसवे घेई मकरंद तो कुसूमातूनी... मन तुझे नी माझे बागडे अवखळ उनाड ते फुलाफुलांचा गंध घेत जीवनाची मजा अनुभवे तू मित्र युगायुगांचा मी श्वास तू निश्वास रे कसे सावलीपरी राहे मैत्र दृढ हे विश्वासाचे तूझी नी माझी मैत्री सख्या पौर्णिमेतली तू चंद्र पूर्ण अवकाशी मी सागर तवसमोरी तू आर्त भाबडा मेघ मी धरा तहानलेली तूझ्या मैत्रीत सापडे रे क्षण विसावणारा नेहमी तूझ्या माझ्या मैत्रीत सख्या भावना चिंब चिंब नाहती काटा टोचता मज पाऊली अन् अश्रू झरे तव नयनातुनी किती आठवतो डबा सुट्टीतला जो तू न खाई मजला सोडूनी माझ्या आवडीचे लोणचे तू आनी रोज मजसाठी किती आवडे तूला गुळांबा मी काढून ठेवी तूजसाठी मन हळवे होई तेंव्हा तू हसून पहात राही तूझी आवडती भैरवी ती मी आळवे सायंकाळी तू दाराशीच ऐकत राही आलापी मन लावूनी ती संगीत असे तुझा प्राण मीही सूरांची त्या वेडी तो सूर निरागस व्हावा हे दान मागे देवाशी रात्री सापडे जागा चंद्र चांदण्यासोबतीला गिटार काढूनी तू होई मग्न तारांशी तूझा नी माझा...
Posts
Showing posts from August, 2023
- Get link
- X
- Other Apps
*विषय :-रक्षाबंधन...* *शीर्षक :-रेशमाचे बंध...* रेशीम धाग्यांनी गुंफले नाते तुझे नी माझे रक्षण्या मजला देवाने तुजला जगी पाठवले... सण रेशमी सुखाचा बंध हे मायेचे प्रेमाचे धाग्या-धाग्यातून ओसंडते बहिण-भावाचे विश्व सारे... श्रावण आला जवळी लागे माहेराची ओढ रक्षाबंधनाचा सण मनी स्मृतींची रूणझूण... तू केंव्हा रे येशिल दारी चारदा पहाते गाडी पाहून लांबून मनोमनी सुखावते... तूझे रूपडे प्रेमळ माझ्या डोळा पाणी येते तूला आनंदी पाहून मनापासून सुखावते... पिल्ला भाचरांचा दंगा आत्या आली हे बघून जणू वाटते गोकूळ झाले माहेर हे सारे... निरांजन तेजाची मांगल्याचे कुंकू घेते सुपारी सौख्याची घेते अक्षता प्रेमाची... औक्षवंत होण्या तुजला मी औक्षण हे करीते किती प्रेम बहिणीसाठी हे तुझ्या डोळ्यात वाचते.... तू तृप्त मी तृप्त क्षणभरी रेशमी बंध मी बांधिते जणू सूख हे स्वर्गिचे त्या धाग्याने अनुभवते... नाते हे भावविभोर आई- बाबा दुरून पहाती पाहून बंधूभगिनी प्रेम आशिर्वाद लाख देती.... तू मायेनं आणली साडी मजसाठी भाऊराया नाही सर तिची कशाला आवडीने जपेन तिजला... सोहळा हा सौख्याचा अनुभवते सानंदाने मी मागते देवाक...
- Get link
- X
- Other Apps
श्रावण💚 ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी काही गोष्टींचा, रंगांचा आपल्या मनावर विशेष प्रभाव असतो. जसे पावसाचे पाणी, हिरवा निसर्ग, चंद्र- चांदणे, ओल्या मातीचा सुवास, विविध सुगंधी फुलांचे गंध..कधी कधी या गंधांसोबत मनात चिटकलेली गोष्ट किंवा प्रसंग..निसर्गातील विविध रंगसंगती आपल्या मनाला कधी उत्साह देतात,उर्जा देतात तर कधी संध्याछाया भिवविती ह्रदया असाही अनुभव देतात.पण खरं सांगू हे जगणं सुसह्य होतं या रंगांमुळे निसर्गातल्या संगीतामुळे..हे रंग उमटतात निसर्गचक्रामूळे...त्याच्या अनोख्या कार्यकुशलतेने.. काही महिने असेच अनोखे..निसर्गाच्या भव्य पटलावर एक एक नक्षी अशा काही रेखाटतात की मानवी मन व त्याच्या अनुभव विश्वाला खूप सुखद अनुभव देतात..समृद्ध करतात..त्या निसर्ग सोहळ्यातून प्रसवलेली गाणी,कविता,कथा, गीत, संगित मानवी जन्माची श्रीमंती वाढवतात..हे समृद्ध जगणं परमेश्वराची कृपाच आहे.. अवखळ दरीखोऱ्यातून वाहणारे पाणी जेंव्हा अधिकच वेगवान वहाते...जेंव्हा धरतीवर ओल्या नक्षी सतत पडायला लागतात..जेंव्हा वारा आपल्याच तोऱ्यात गाणी गाऊ लागतो,जेंव्हा निसर्गा...
- Get link
- X
- Other Apps
विरह - सौ.स्वरूपा कुलकर्णी मैत्री तुझी नी माझी आहे सुखद भाववेडी मन बावरे कसे रे गुंतले जसे मधाशी तू ऋतू पावसाळी ओला मी चिंब संध्या पश्चिमेची गाणे आर्त विरहाचे मिळे आतूर भैरवीशी तूला गाता सुरांतुनी मी रे कणकण व्यक्त होते तू मित्र युगायुगांचा सौख्य हे नित्य स्मरते राहशी दूर मित्रा मजपासूनी दूर देशी का वहावे अश्रू खारे तव आठवांनी नित्य दिवशी नकळे भान जाते स्मरता मनी तूला रे काहूर उठते अनावर मी होते मुकी स्वतःशी विरह हा तुझा मला रे छळतो तुलाही का असा रे मैत्र दोन जीवांचे भाबडे हे न साहवे अंतर मिलनातले तू आठवतो नित्य दिवशी जसा सुर्य येतो दारापाशी मी वेचते किरण अलगद जणू वेचते क्षण भेटीतले धरित्री ही नित्य फिरते रवीच्या कक्षेभोवती मन तसेच माझे फिरते तुझ्याच आठवांभोवती नको दुरावा हा असह्य ये ये फिरूनी घरकुलाशी मी तुझीच कालही होते सखी तुझीच प्रिया आजही