पहिली परी
✍🏻लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी लग्न होऊन दोन वर्ष झाली.सईच्या सासूबाईंना अजुन पाळणा कसा हलला नाही याची काळजी वाटू लागली.सई व समीर दोघेही निर्धास्त.आत्ताच तर लग्न झालंय बघू पूढे.पण घरात मात्र सासू सासरे काळजीत.विमलबाई तशा मोकळेपणाने तिच्याशी बोलत नव्हत्या पण विनायकरावांला याविषयी काळजी बोलून दाखवत होत्या." अहो, समीरचं लग्न होऊन ५वर्ष झाली.अजुन पाळणा हलला नाही.दोघांचे वयही तिशीच्य् पुढे.काळजी वाटतो हो.." यावर विनायकबुवा मात्र हसून गोष्ट दुर्लक्षित करत होते."अगं एव्हडी काय काळजी करतेस.होईल सगळं वेळेवर.नको एव्हडा विचार करूस". विमलबाई मात्र तोपर्यंत हातात माळ घेतलेली असे.त्यांचं देवाला साकडं घालणं चालूच होतं.मन काही थार्यावर नव्हतं. सई व समिरचे कायम एकमेकांशी खटके उडायचे.समिरने सईला तिच्या पुर्वआयुष्यासगट स्विकारलेलं होतं.पण ती मात्र कायम निराशेच्या गर्तेत जात राहीली.प्रेम ही गोष्ट नात्याचा श्वास असतो हे ती विसरली.त्यामुळे घरात कायम वितंडवाद होत राहिले.हे सगळं बघून विमलबाई विलक्षण चिंताक्रांत होत्या. दिवस चालले होते आणि अचा...