कविता - स्वातंत्र्याचे पर्व
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
जय जय भारत,
जय जय हिंदूस्थान,
आम्हा सार्थ तूझा अभिमान,
आम्हा सार्थ तूझा अभिमान...
सौभाग्यवती माता भारती,
लेकुरे सारी तिची प्रतापी,
उखडून ढोंग दुष्टांचे ते,
करीती शत्रू निष्प्रभ झणी...
सैतानाचे उडवूनी मस्तक,
केले नामोहरम शत्रूस सारे,
उखडूनी बाहू धडावेगळे,
भूमंडळ हादरे कंपाने ते...
तोडूनी ही पारतंत्र्याची शृंखला,
पेटवूनी स्वातंत्र्याचा वन्ही,
उजळले भाग्य ह्या धरेचे,
संपले बंध वेदनांचे ते...
दिशा वाजवी नगारे स्फुर्तीचे,
विजय पाहण्या देवही आले,
पराक्रमाने रण हे जिंकले,
स्वर्गच वाटे अवनीवर हे..
गुलामगिरीचे क्रौर्य संपूनी,
स्वातंत्र्याचा झेंडा रोवूनी,
धरती अंबर नाचू लागले,
पराक्रम हा अतिबलदायी...
संपवून सारी पिडा जनाची,
लढले हुतात्मे प्राणपणाने,
धरा प्रिय ही जीवीताहूनही,
नको पारतंत्र्य पुन्हा कधिही...
जय जय भारत,
जय जय हिंदूस्थान,
आम्ह सार्थ तूझा अभिमान,
आम्हा सार्थ तूझा अभिमान...
Comments
Post a Comment