जीवनाची कविता...
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
जन्म मृत्यू मध्ये वाहते,
जीवनाची ही अखंड सरिता,
नकळे कशी वळणे घेते
थांबत नाही कधी एकदा...
जन्म होतो मायबापाच्या घरी
बालपण सरते खेळ खेळून सारी,
मन रमते आईच्या कुशीत अवघे,
उडून जाती दिनं पाखरू जसे...
मग येतो तारूण्याचा बहर,
मन हे गुंतते मयुरपंखी स्वप्नी,
अवचित येतो सण प्रितीचा तेंव्हा,
हरवते मन बावरे पुन्हा पुन्हा...
पुढे पुढे सरतो आहे ,
कालचक्र हा पूर्ण विरागी,
प्रौढत्वाची फिरे सावली,
मन मात्र रेंगाळे तारूण्याशी...
काळ सांगतो पुढल्या हाका,
आता उरलो थोडाथोडका,
नको रे घालवू मला असा तू
ईश्वरच अपुला असे सोबती...
नकळत दान पडे वृद्धत्वाचे,
किती राबलो संसारासंगे,
आता जाणवे सगळे खोटे
उरले चिंतन स्वस्वरूपाचे...
ईश्वर साक्षी खराच अपुला,
कळले उशीरा जरी शेवटी,
मृगजळ हे नश्वर जीवन,
संपते मृत्युच्या बहुपाशी...
Comments
Post a Comment