जन्माष्टमी

 

-सौ.स्वरूपा कुलकर्णी


घनगर्द श्रावण मासी

जन्मला यमुनेच्या काठी

घेऊन स्वचैतन्य अवघे

मिसळला जनमाणसाशी


किती कौतूक या धरेला

जन्म देवकीनंदनाचा

जाहली तृप्त पिऊनी

संतत श्रावणधारा


असे हा सोहळा आनंदाचा

स्वर्ग उतरला अवनीवरी हा

जग हे सजले सगळे अवघे

अष्टमीची ही पावन रजनी


बरसती सुमन हे अंबरी अन्

देवी देवता दाटी झाली

कृष्ण जन्मलाहो माझा

मथूरेच्या कारागारी


वसुदेव निघाले गोकूळी 

बाळ रूदन ते विसरूनी

घालती टोकरीत बाळं

यमुना अडवी वाटेवरती...


पदस्पर्श झाला हरीचा अन्

यमुना ओसरली हलकेचं

चालले वसुदेव घाईने

थाटातं निघाले भगवानं..



श्रावण कोंदला चराचरी

पाहण्या बाळा आर्त सारी

लेवूनी सौंदर्य विश्वाचे हे

बाळकृष्ण हा हसतो गाली..


भवभयबंधन संपविण्या हे

घेई देव अवतार असाही

गोकूळ मथूरा पावन झाली

मनीमानसी कृतार्थ सारी


जग उद्धाराया हरीने हा

घेतला अवतार रामकृष्णांचा

संतमंडळी गाती नाचती

जय जय रामकृष्ण हरी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न