विषय-  नागपंचमीच्या आठवणी

दिनांक- ०२/०८/२०२२ 

लेखिका - सौ.स्वरूपा कुलकर्णी

                  

                      नागपंचमीच्या आठवणी


          श्रावणातला आम्हा स्त्रियांचा अत्यंत आवडता सण म्हणजे नागपंचमी. उंचच उंच झोके खेळणे,हातावर भरगच्च मेंदी काढणे,माहेरी जाणे, नविन कपडे घेणे,नागाची दूध लाह्या दाखवून पूजा करणे सगळी मजाच मजा..ही मजा दिवसेंदिवस कमी होत चाललेली दिसतिये पण आमच्या लहानपणी फार मजा यायची.

        माझं माहेर औरंगाबाद.लहानपणी नागपंचमीच्या पूजेचं एक विलक्षण गुढ व कौतूक बालमनाला वाटायचं."आई, नाग व साप तर विषारी असतात नं गं.मग त्यांची पूजा का करायची?" असे प्रश्न विचारले की ती म्हणायची, "अगं , नागोबा हा आम्हा स्त्रीयांचा भाऊच,तो जर पूजला तर दंश करत नाही.त्याची कृपा आपल्यावर रहाते".मला ते उत्तर तसं पटलेलं नसायचं पण मनाची समजूत घालून झोके खेळायला जायचे.आज ती मतं पटतात कारण भारतीय स्त्रीच्या उदात्त भावना त्यातून दिसतात.विषारी नागालाही मानाचं स्थान देणारी भूतदया मानणारी आपली संस्कृती खरोखर फार उच्च जिवनमुल्यांमूळे आजही टिकून आहे.

       नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेंदी काढण्याचा प्रोग्राम व्हायचा.काडेपेटीच्या काडीने आई इवल्या हातावर मेंदी काढायची तेंव्हाचा तो गार स्पर्श आजही आठवतो.मग मेंदी बघतच झोपून जायचो.सकाळी जाग आली की आधी मेंदी पूसून किती रंगली ते बघायची घाई व्हायची.नागोबाची पूजा शहरात कागदावर नागोबाचे चित्र काढून व्हायची.आईपण वारूळं नसल्यामुळे नागदेवतेची चित्र कागदावर काढून मनोभावे पूजा करायची.दूर्वा फुलं,दूधलाह्याचा नैवेद्य दाखवला जायचा.ती पूजा मन लावून करत असल्याने नकळत हात जोडले जायचे.हा नागोबा प्रत्यक्षात मात्र कधी दिसू नये अशी भित्र्या मनात प्रार्थना व्हायची.

            नागपंचमीला खेळले गेलेले त्या गॅरलीतले झोके आजही आठवतात कारण फ्लॅटमध्ये रहात होतो...पण त्यातही दडलेली मजा आज नाही.या लेखाच्या निमीत्ताने मन आज परत ते झोके खेळून आलं.नागपंचमीच्या आपना सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न