...तुझे नक्षत्रांचे देणे -सौ. स्वरूपा कुलकर्णी काही माणसं आपल्याला प्रत्यक्ष भेटलेली नसतात पण तरी ती आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग असतात. तशीच लता आणि आशा! दोघीही किती महत्वाच्या हे सांगता येणार नाही. मागे लता गेली तेंव्हा जसा गाभाऱ्यातला देवच हरवला अशी अस्वस्थता आली, आज तरूण कोवळ्या पालवीला अचानक सुकलेलं पाहिल्यावर जी तगमग होते तशी काहीशी स्थिती झाली. रोजच्या जगण्याला ज्या अमर स्वरांची सवय आहे ते स्वर लताचे नी आशाचेच! मागे उभा मंगेश गातांना तिची तन्मयता, अभी न जाओ छोडकर म्हणतांनाची शब्दातील ओढ, तरूण आहे रात्र अजुनी म्हणनारी रोमॅंटिक आशा, केंव्हा तरी पहाटे ची लयबद्ध आशा, चांदणे शिंपीत जाशी मधली निळावंती आशा, ऋतू हिरवा मधिल तिच ती नववधू आशा!तिची अप्रतिम गायकी हे स्वर्गसूखच! ती गायली नी निर्जीव वस्तूंनाही नाचावं वाटलं, डोलावं वाटलं, निसर्गही अधिक तरूण वाटला.. ती तारूण्याचा अमर शेला लेवून आलेली स्वरसम्राज्ञी होती. काय नव्हतं तिच्या गायकीत.. रंग, रूप, स्पर्श, रस, गंध ...सगळी ज्ञानेंद्रीय तृप्त करणारं रसायन तिच्या गायनात होतं....
Posts
Showing posts from April, 2026
- Get link
- X
- Other Apps
महाशिवरात्री - एक दैवी अनुभव - सौ. स्वरूपा कुलकर्णी सर्व देवांमध्ये सर्वात लवकर पावणारा देव म्हणजे महादेव!.. सांब सदाशिव भोळा म्हणून भक्तांना अधिक प्रिय.सर्व पर्वांमध्ये माघ मासातील महाशिवरात्रीचे पर्व हे अध्यात्मिक पर्व असते. संसार सागरात गटांगळ्या खाणाऱ्या प्रत्येक जीवाचा आधार बनते. महाशिवरात्र ही शिवाच्या मंगल, पवित्र लिंगाची शुद्ध भावनेनी बांधलेली पूजा..निर्गुण निराकार शिवतत्व हे परमात्म बीज आहे. तेथे मी- तू पणा न राहाता सारे विश्वच शिवमय होते.ओम् नमः शिवायचा जप केल्याने या अद्वैत अनुभूतीची अत्यंत तीव्र स्वरूपात अनुभूती येते. आज दुपारी जवळच्याच पंचमुखी महादेवाची जल व दुग्धाभिषेकाने पूजा करण्याची संधी मिळाली. अत्यंत पवित्र स्पंदनात मन शिवरूप झालं..तसेच सायंकाळीही पिंपळसच्या रामेश्वर शिवलिंगाच्या दर्शनाचा योग आला.ही खरोखर शिवकृपाच! बेल- फुल, जल अर्पण करून शिवलिंगाच्या पवित्र व तितक्याच तीव्र स्पंदनामुळे तन मन एकरूप होऊन शिवध्यानात निमग्न झाले.जणू मनातील शुभ संकल्पाला शिवजी त्यांच्या सेवेची संधी देऊन पूर्णत्वाचीच हमी देत होते. मनाने न...