Posts

Showing posts from February, 2023
रचना- सौ.स्वरूपा कुलकर्णी विषय-झाली फुले कळ्यांची सरले बालपण माझे आले तारूण्य जवळी मी मोहरले मनोमनी भासे जग नवखे प्रतिदिनी मी सजले कोवळ्या गंधांनी आले तारूण्य सोनपावली जग बदलले हळूवार हे रम्य वाटे क्षणोक्षणी जणू फुटले पंख मजला झाले फुलपाखरू नवे साद घालती मला दशदिशा झाले सोहळे जगण्याचे हे कळ्या त्या अबोल कालच्या आज पाहती उमलू हळूच गडे रे हे स्वप्न पडले मजला झाली फुले कळ्यांची
 मधुमिलनात या... ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी         धुपाचा मंद सुगंध..त्याच्या हवेत जाणाऱ्या वलयांकीत रेषा...देवघरातील चकचकीत,घासूनपुसून लख्ख देवाच्या मुर्त्या...त्यावर वाहिलेली प्राजक्ताची,चाफ्याची फुले...देवासमोर दाखवलेला नैवेद्य...अहाहा..!!!मिलींद ती पूजा पहातच राहिला...तशी ही अवस्था त्याची नेहमीच व्हायची..'किती मनापासून करते ही पूजा..कमाल आहे..छे:मलाही नाही जमणार अशी पूजा करायला कधी...' मिलींद विचार करत करतच उठला.हळूच त्याचे पाय तिच्या दिशेने निघाले..ती स्वयंपाकघरातच असावी असा विचार करतच तो तेथे पोहोचला...लसणाच्या खमंग वासाने त्याच्या नाकाचा ताबा घेतला..वाह!! लसणाचा ठेसा...त्याच्या जिभेला पाणी सुटले..तेथेही तो विचार करू लागला,' काय all rounder बायको मिळालिये मला..स्वयंपाकही चमचमीत,झणझणीत...कसं जमतं हीला!' त्याची नजर तिला शोधू लागली.पण ती तिथे नव्हतीच..मिलींद आता उत्सुकतेने तिला शोधत बेडरूमकडे गेला..तिथलिही स्वच्छता टापटीप त्याच्या मनावरछाप पडली... अवघ्या ८ दिवसातच तीने हे गारूड केले होते.आता मात्र त्याला रहावेना...ती कुठे गेली? तो कमालिचा उतावीळ झाला...कुठेय माझ...
 रचना-  सौ.स्वरूपा कुलकर्णी    "चाहूल वसंताची"  गारवा- थंडी हवेतली ही हळूहळू ओसरू लागली, गरमीची ऊब थोडी थोडी  वातावरणात पसरू लागली किती हलकेच त्याची चाहूल ऊबदार स्पर्श सोनेरी, आंबा मोहोरला हळूवार डोले पानापानामधूनी जादू वसंताची झाली पानोपानी तरूतरूवरी, फुलला मोगरा पानातुनी तो उसळतो सुगंध चहूबाजूंनी सूर्यदेव प्रसन्न वसंताला झाडे चैतन्याने न्हाली, ही सृष्टीतील नवउर्जा मन आनंदाने गीत गाई सुगंध फुलाफुलांचा पळस लालेलाल होई, गुलमोहर बहरतो आता फुलला वसंत चराचरी
#_विठू_सावळा कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी ये ग ये ग सावळ्या विठाई, माझे पंढरीचे आई, आस लागली जीवा, कधी भेटीन तूला पाही अवघ्या विश्वाची जननी, भूकेली भक्तांसाठी, विश्व तूझे छोटे बाळ, नको राहू त्याहून तू दूरी मला वेड तव चरणांचे, भाव दाटले डोळा सारे, मी एकटी तूजवीण, नको हा विरह माझे विठाई तू सावळा सुंदर ठेवी कर कटावर, मी पाहते मनी मानसी अखंड तूज गे विठाई धाव धाव गे आई, करू नको उशीर आता काही, मन झाले उन्मनी, मी तू न उरले काही