मधुमिलनात या...


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी



        धुपाचा मंद सुगंध..त्याच्या हवेत जाणाऱ्या वलयांकीत रेषा...देवघरातील चकचकीत,घासूनपुसून लख्ख देवाच्या मुर्त्या...त्यावर वाहिलेली प्राजक्ताची,चाफ्याची फुले...देवासमोर दाखवलेला नैवेद्य...अहाहा..!!!मिलींद ती पूजा पहातच राहिला...तशी ही अवस्था त्याची नेहमीच व्हायची..'किती मनापासून करते ही पूजा..कमाल आहे..छे:मलाही नाही जमणार अशी पूजा करायला कधी...' मिलींद विचार करत करतच उठला.हळूच त्याचे पाय तिच्या दिशेने निघाले..ती स्वयंपाकघरातच असावी असा विचार करतच तो तेथे पोहोचला...लसणाच्या खमंग वासाने त्याच्या नाकाचा ताबा घेतला..वाह!! लसणाचा ठेसा...त्याच्या जिभेला पाणी सुटले..तेथेही तो विचार करू लागला,' काय all rounder बायको मिळालिये मला..स्वयंपाकही चमचमीत,झणझणीत...कसं जमतं हीला!' त्याची नजर तिला शोधू लागली.पण ती तिथे नव्हतीच..मिलींद आता उत्सुकतेने तिला शोधत बेडरूमकडे गेला..तिथलिही स्वच्छता टापटीप त्याच्या मनावरछाप पडली... अवघ्या ८ दिवसातच तीने हे गारूड केले होते.आता मात्र त्याला रहावेना...ती कुठे गेली? तो कमालिचा उतावीळ झाला...कुठेय माझा मोगरा...सोनचाफा...??मग तो जरासा त्राग्यानेच गच्चीवर गेला..'राधा ...ए राधा..' मिलींद ह्रदयापासून साद घालत होता...आणि दुसऱ्याच मिनीटाला त्याचे डोळे कुणितरी मागुन येऊन दाबले..क्षणात तीचा केतकी गंध त्याच्या मनाला स्पर्शून गेला..त्याची कळी खुलली...हाच तो राधेचा गंध..ती मागुन येऊन हसतच त्याला चिडवत होती...त्याने पटकन तिचे हात काढुन तिला पुढ्यात उभे केले...आणि समोर एखाद्या सुंदर कलाकृतीला पहावे तसे त्याचे नेत्र चमकले...ती सुस्नात होती..न्हायल्यामुळे केसांना टॉवेल बांधून, सुंदर कॉटनची साडी खोचून चेहऱ्यावरचे खोडकर भाव लपवत 'सॉरी' म्हणत समोर उभी होती.मुळातच तिचा गौर रंग न्हयल्यामुळे केसांच्या समोर आलेल्या बटा..उफ्फ ही अदा जीवघेणी...मिलींद पुढे काय बोलायचंय हे विसरूनच गेला..ती खट्याळपणे त्याची छेड काढत हसत राहिली...तो वेड्यासारखा तिला नुसता बघतच बसला..मिलींदने पुढच्याच मिनीटाला तिला जवळ ओढले व ओठांनी तिच्या ओठांशी सलगी करत मनीचे भाव मोकळे केले..ती चंचलपणे त्याच्या मिठीतून सुटण्याचा अविरत प्रयत्न करत राहिली पण तो आज वेगळ्याच रंगात होता..तिला आज कुठेही दूर जाऊ द्यायचे नाही व असंच प्रेम करत रहायचं असं त्याने ठरवलं होतं..तीचा प्रतिकार क्षीण झाला व मग हलकेच आपल्या प्रियावर चुंबनाचा वर्षाव करू लागली...त्याने हसतच तिला दोन्ही हातांवर उचलले व आपल्या बेडरूममध्ये आणले..'आज आपले काही खरे नाही' हे राधेच्या मनात आलेच...तीचीही कळी खुलली...लग्न झाल्यापासून मिलींदच्या प्रेमात ती अशीच नहात होती...भरगच्च प्रेम!!!ती सुखावून गेली होती...आज तर प्रणयातुर सख्याने तिचे अंगन्अंग झंकारावे अशी जादू केली...तिला प्रेमाच्या जादूभऱ्या रंगांनी चिंब चिंब केले..ती नुसती राधा नव्हती तर मिलींदची राधा होती..जणू कृष्णाचीच राधा होती.मिलींद व राधा प्रेमाच्या महासागरात तासन्तास डुबून राहिले..सुर्य कधी मावळतीकडे आला कळलेच नाही...पश्चिमेला चंद्र चांदण्यांची चाहुल दोघांना अजुनच सुखावत राहिली...राधावर मधुमिलींद जय जय ...अशी मुग्ध अवस्था त्यांना लाभली..त्याच्या सावळ्या बाहूत तिची कोवळी मुर्ती जणू सोन्याच्या अंगठीत हिरा चमकावा तशी चमकत होती..ती व तो खिडकीजवळ आले..तेथे वाहणारा गार वारा मिलनातील गोडवा वाढवत होती..अजुनही तो  प्रणयाचा माहौल निवळला नव्हता..रात्रभर ती व तो, कृष्ण राधेच्या मधुर मिलनात दंग होते...

       

ती अनुभूती प्रेमरसाची,अद्वैताची साक्ष पुरवणारी ठरली..तो व तीची ही प्रेमकथा फुलूत होती..असेच ते नित्य नवरा बायकोचे आत्यंतिक प्रेमाचे क्षण अनुभवत राहिले..महिने जात होते..आता वर्षही संपत आलं...

लग्नाचा पहिला वाढदिवसही जोरदार झाला...त्यादिवशीच राधेने मिलींदजवळ आपल्यालाही एक गोड पिलू व्हावं अशी इच्छा व्यक्त केली...मिलींद तर आनंदून गेला..कारण हीच त्याचिही इच्छा होती..

   दिवासामागून दिवस जात राहिले...तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश नव्हते..ती कायम हसरी सदा प्रसन्न रहाणारी राधा आताशा कोमेजून जात होती..मिलींदही वरवर तसं न दाखवता तीची मनधरणी करतच होता..पण तोही मनातून नाराज होत होता..अनेक उपाय झाले ...देवा धर्माचं पाहिलं पण व्यर्थ...ती व तो हताशपणे दिवस घालवत होते..एक दिवस त्यांना डॉ.कुर्तकोटींचा दवाखाना समजला..तेथे गूण येतो म्हणून अनेक लोक लांबून लांबून येतात असे कळले...अखेर ते दोघेही अपॉइंटमेंट घेऊन गेले..तिथे लांबचलांब गर्दितून कसाबसा नंबर लागला..ती व तो अखेर डॉक्टरांसमोर आले..डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या..पुढिल आठवड्यात बोलवले..तो संपूर्ण आठवडा दोघांनाही फार त्रासदायक वाटला..मग तो दिवस आला..रिपोर्ट आलेलेच होते..तो व ती साशंकपणे डॉक्टरांकडे पहात राहिले...डॉक्टरांनी मिलींदचे रिपोर्ट नॉर्मल आहेत असे सांगितले...पण....हा पण अवघड ठरला...कारण, राधेचे रिपोर्ट नॉर्मल नव्हते...तिची प्रजनन क्षमता कमकुवत होती...राधेच्या  पायाखालची जमिनच सरकली...ती तिथेच बेशुद्ध पडली..मिलींदने खूप प्रयत्नांनी तिला सावरलं...राधा खूप मोठ्या धक्क्यात होती...तीचा कानांवर विश्वास बसत नव्हता...तिला कधिही मुल होऊ शकणार नव्हते ही गोष्ट सहनच होत नव्हती..ती मिलींदकडे पहात ओक्साबोक्शी रडली...' मिलींद, हे काय झालं रे...मी काय करू आता' मिलींदने अक्षरक्ष: ओढतच तिला दवाखान्यातुन घरी आणलं..

      ती दिवसेंदिवस खंगत होती..तोही गुदमरला होता...कारण घरातलं हसतं खेळतं वातावरण स्मशानवत झालं होतं...ती कायम उदास,एकाकी व खिन्न राहू लागली...

     अचानक एक दिवस रजनी तिची मैत्रीण तिच्याकडे आली..तिचा प्रॉब्लेम आधिच मिलींदकडून तिला माहित झाला होता..तीने उदास,तेजोहीन राधेकडे पाहून तिच्यासमोर बाहेर फिरायला येतेस का?असा प्रश्न विचारला...बऱ्याच दिवसात ती कुठेच बाहेर न गेल्यामुळे तीची पटकन बाहेर जायची इच्छा होत नव्हती...बळेच रजनीने तीला घराबाहेर काढले..बाहेर पार्कमध्ये फिरतांना तीला झाडावरची फुले पाहून अधिकच व्यग्र व्हायला झालं..पण तरिही ती स्वतःला सावरत होती...अचानक तिच्यासमोर एक लहान मुलगी बॉल खेळत आली..ती इतकी निरागस व गोंडस होती की तिला पाहून राधेची कळीच खुलली...तिने थांबून तिला जवळ घेतले..ती मुलगी गोड हसली व आली तशीच धावत परत इतर मुलांमध्ये मिसळली...राधा विचार करत बसली खरंच किती गोड असतात लहान मुलं..रजनीने सांगितले ही मुलगी त्या शेजारच्या अनाथाश्रमातील आहे..राधा खूप खूश झाली..तीने हसतच घर गाठले..आल्या आल्या मिलींदला आपणही एक मुलगी दत्तक घेऊ या का? असा प्रश्न विचारला..मिलींद खुललेला राधाचा चेहरा पहात होता..तिचा आनंद बघुनच तोही तयार झाला..

नंतर एका शुभ दिनी राधा व मिलींद यांनी अनाथाश्रमातुन त्या सुंदर मुलीला दत्तक घेतले...

   आता राधा व मिलींद आनंदाच्या हिंदोळ्यावर स्वार झाले...मुलीचं नाव मीरा ठेवलं...राधा व मिलींद परत एकदा सुख सागरात डुंबून गेले..राधा परत आपल्या मिलींदमध्ये तन्मय झाली व मीरा हळूहळू दिवसागणीक फुलणाऱ्या कळीप्रमाणे मोठी होत गेली...अखेर त्यांचा संसार सुखाचा झाला..


समाप्त।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न