#_विठू_सावळा
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
ये ग ये ग सावळ्या विठाई,
माझे पंढरीचे आई,
आस लागली जीवा,
कधी भेटीन तूला पाही
अवघ्या विश्वाची जननी,
भूकेली भक्तांसाठी,
विश्व तूझे छोटे बाळ,
नको राहू त्याहून तू दूरी
मला वेड तव चरणांचे,
भाव दाटले डोळा सारे,
मी एकटी तूजवीण,
नको हा विरह माझे विठाई
तू सावळा सुंदर
ठेवी कर कटावर,
मी पाहते मनी मानसी
अखंड तूज गे विठाई
धाव धाव गे आई,
करू नको उशीर आता काही,
मन झाले उन्मनी,
मी तू न उरले काही
Comments
Post a Comment