रचना- सौ.स्वरूपा कुलकर्णी
विषय-झाली फुले कळ्यांची
सरले बालपण माझे
आले तारूण्य जवळी
मी मोहरले मनोमनी
भासे जग नवखे प्रतिदिनी
मी सजले कोवळ्या गंधांनी
आले तारूण्य सोनपावली
जग बदलले हळूवार हे
रम्य वाटे क्षणोक्षणी
जणू फुटले पंख मजला
झाले फुलपाखरू नवे
साद घालती मला दशदिशा
झाले सोहळे जगण्याचे हे
कळ्या त्या अबोल कालच्या
आज पाहती उमलू हळूच गडे
रे हे स्वप्न पडले मजला
झाली फुले कळ्यांची
Comments
Post a Comment