सूर्यदेवता -©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी आदिदेव नमस्तुभ्यम् प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यम् आदिदेव नमोस्तुते।। दररोज सकाळी देवपूजा झाली की तुळस पूजन आणि नंतर सूर्यदेवाला नमस्कार करतांना हा श्लोक मी म्हणते.खरंच सांगते रोज उगवणारा तोच सूर्य मला नित्य नवाच वाटतो. नवी स्फुर्ती,ताजेपणा, उत्साह, सकारात्मकता, प्रसन्नता हे सगळं त्या सुर्यदर्शनाने प्राप्त होतं.१ ते २ मिनीटं मी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेऊन सूर्याला वंदन करते. पण तो दर्शनाचा सुखद अनुभव मी अंतःकरणापासून अनुभवते. किती आनंद मिळतो ते शब्दात बांधता येणार नाही. ती तेजस्वी आभा मनावरील मळभ क्षणात दूर करते.त्या सकाळच्या तेजस्वी तरिही तितक्याच उबदार सूर्यदर्शनाने दिवसाची सुरूवात फार प्रसन्न होते. सूर्याला पाहिलं की माझं मन श्रद्धा व भक्तीने भरून जातं. किती निरपेक्षपणे जगाचा व्यापार चालवणारा हा जगाचा मालक आपल्या केवळ असण्याने जगाची सर्व यंत्रणा सांभाळतो. सूक्ष्म जीवांपासून ते मानवापर्यंत सर्वच सजिव सूर्यामुळेच जिवंत रहातात. सूर्य नसता तर असा विचार केला की कळतं सूर्य काय गोष्ट आहे ते. तो नसेल तर जग अंधःकाराच्या...
Posts
Showing posts from January, 2026
- Get link
- X
- Other Apps
#गोवा #आठवणी - सौ. स्वरूपा कुलकर्णी मला लहानपणापासूनच प्रवासाची आवड. आई बाबांसोबत अनेकदा प्रवास घडले. आजवर काही तिर्थयात्रा , काही सहली नातेवाईक तर काही नवऱ्यासोबत अनुभवल्या. पण एकट्याने प्रवासाचे योग तसे कमीच आले. प्रवासांमध्ये सुंदर हिंदी व मराठी गाणी ऐकणे किंवा भेंड्या खेळणे हे माझं अत्यंत आवडतं काम असायचं व आजही आहे. त्यामुळे प्रवास सुंदर होतोच पण मनाच्या सुंदर सुंदर अवस्थाही कळायला लागतात व अधिकच प्रसन्नता अनुभवायला मिळते. कॉलेजमध्ये असतांना एकदा अचानक गोव्याला जाण्याचा योग आला.कॉलेजची ट्रीप होती.अतिशय सुंदर नियोजन करून कॉलेज लेकिचरर व मित्र मैत्रिणींसोबत ट्रीपला जाण्याची जय्यत तयारी केली. गोव्याला जाण्यापूर्वी मनात गोव्याच्या बीचबद्दल, तिथल्या माश्यांबद्दल,चर्चेसबद्दल, टूरिस्टचा हॉटस्पॉट असल्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. कोकणसारखी तिथेही लाल माती आहे हे नुसतं ऐकून होते. पण जेंव्हा गोव्यात प्रवेश केला तेंव्हाचा अनुभव हा केवळ शब्दातीत! तिथल्या हवेतच झिंग आहे..ती कदाचीत तिथला माणूस दारू प्रिय आहे किंवा इतरही बऱ्याच गोष्टी असतिल पण गोव्य...
- Get link
- X
- Other Apps
खण व आपली संस्कृती - सौ. स्वरूपा कुलकर्णी आपल्या महाराष्ट्रात ज्या सुंदर परंपरागत व सांस्कृतिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात त्यात वस्त्र ही कला प्रामुख्याने पहायला मिळते. जी परंपरागत तर आहेच पण अत्यंत वैविध्यपूर्ण व सुंदर धाग्यांनी विणलेली साधी भोळी, शालीन मराठी संस्कृती देखिल आहे. त्यात रंगांचे वैविध्य, कलाकुसर,आईचा उबदार स्पर्श, मऊपणा आहे. इतर वस्त्रांपेक्षा वेगळं असल्याची खूण मिरवणारा हा 'खण' परिधान केला की मी मराठी असल्याचा एक वेगळाच अभिमान मिरवता येतो हे वैशिष्ट्यदेखिल आहे. खणनारळानं देवीची ओटी भरली जाते हे आईचं लहानपणी खूप वेळा ऐकलेलं वाक्य व आईला प्रत्यक्ष देवीला पूजतांनाही अनेकवेळा पाहिलं होतं. तेंव्हाच ह्या 'खणाचं' महत्व माझ्या मनावर कायमचं गोंदलं गेलं होतं. लग्नानंतर अनेक प्रसंगात हा 'खण' मला भेटत गेला.पहिल्यांदा घेतलेली जांभळ्या रंगाची व लाल काठ असलेली मैत्रिणींच्या आग्रहास्तव नेसलेली खणाची साडी मी जपूनच वापरते हां. आणि हो Womenia ही आधुनिक मराठी स्त्रीचा नथीचा साज घेऊन नटलेली पिवळी व जांभळ्या काठाची खणसाडी कायमच मैत्रिणींमध्ये भा...