Posts

Showing posts from January, 2023
 श्री दासबोध ग्रंथाचे सार जय जय रघुवीर समर्थ। -सौ.स्वरूपा कुलकर्णी       कुठल्याही ग्रंथाची सुरूवात गजाननाच्या स्तुतीशिवाय होत नाही हे खरेच! परंतू, समर्थांचा दासबोध ग्रंथ मात्र अपवाद आहे.ग्रंथाची सुरूवातच हा ग्रंथ कोणता? कशासाठी निर्मीला?म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला किंवा चिकीत्सकाला ग्रंथ उचलतांनाच जो साधा प्रश्न पडेल  त्या मुलभूत प्रश्नांनी सुरूवात केलिये. तसेच लागोलाग उत्तरही येथे समर्थांनी दिले आहे.खरंच समर्थ किती मनकवडे व दुरदर्शी विचारांचे होते.कोणालाही नविन ग्रंथ वाचायला घेतांना हमखास असे प्रश्न पडतातच.म्हणजेच  सुरूवातीलाच वाचकाचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांनी ही अभूतपूर्व ग्रंथरचना केली आहे हे जाणवते.  समर्थांची ही मनोवेध घेऊन आत्मानुभूतीचा प्रवास करवणारी  लेखनकला अजोड आहे.              बघा हं ,आईला बरोबर कळतं बाळाने कितीही नाटक केलं तरी की खरा problem काय आहे.बाळ कितीही खोडकरपणा करत असलं तरी आई बेमालूमपणे बाळाला ताळ्यावर आणतेच आणते.तसेच संतही सामान्य जीवाला भगवंताकडे नेण्यासाठी अनेक युक्त्...
प्रिय अमुची भारतमाता कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी हिरवा- निळा शालू पांघरून, धरती सजली नवरंगांनी, तिच्या भाळी जणू विराजे, प्रियतम अमुची भारतमाता वसुधेला अलंकार नवनवे, परंतू शोभे कुंकवाने ते, धरती बनली सौभाग्यशालिनी, भारतमातेच्या अस्तित्वाने रंग भगवा त्यागाचा हा, शुभ्र रंग हा सात्विकतेचा, हिरवा रंग सृजनाचा हा, निळ्या चक्राने सजला तिरंगा सारा धन्य धन्य ही धरा अमुची, राम-कृष्णांची जन्मभूमी, स्वातंत्र्य लाभले बलिदानाने, राखू आम्ही प्राणपणाने आसेतूहिमाचल ऋतू वेगळे, निसर्गाचे अनेक सोहळे, संगित इथल्या कणाकणातले, गातो आम्ही भक्तीभावे प्रियतम अमुची भारतभूमी, असे देवांनी निर्मित भूमी, हिच्या आश्रयाने जीवन सारे, झाले मंगल झाले सुंदर
विहिणबाईंना पत्र लेखन - सौ. स्वरूपा कुलकर्णी (चि.सौ.कां. अनुजा व चि.अन्वय यांचा विवाह थाटामाटात पार पडला.सौ.माधवी ताई या नववधूच्या आई व सौ. किर्ती ताई या वराच्या आई..माधवी ताईंनी रूखवतात आपल्या पत्रलेखनातून भावना मांडल्या आहेत.        ते पत्र पुढिल प्रमाणे-)      प्रिय विहिणबाई सौ. किर्ती ताई यांस,                    नमस्कार.                               लग्न ठरल्यापासून मनात येत असणाऱ्या भावभावनांना वाट मोकळे करून द्यावं असं वाटलं,म्हणूनच हा लेखनप्रपंच.माझी लाडकी लेक अनुजा लहानपणापासून माझ्याजवळच राहिली, वाढली.शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठीही फार लांब जाण्याचा प्रसंग तिच्यावर कधी आला नाही.ती लहानपणापासून अतिशय गुणी व मोठी असल्यामुळे समजुतदार राहिली.मला घरकामात कायम तिची मदत होत  होती.बोलक्या स्वभावामुळे मैत्रिणीही खूप आहेत तिला.     माझी एकच विनंती तुम्हाला तिला तुमच्या वसूसारखच समजा.जीव लावा.ती तुम्हाला आईसारखाच मा...
 बंधविमोचन राम!    लेखक- रविंद्र भट     विषय- रामायण       ही एक अत्यंत सकस व रसदार कादंबरी वाचकाच्या मनाचा ठाव घेते.कादंबरी ही जरी रामायणातले प्रसंग वर्णन करणारी असली तरी आजच्या युगात घडणाऱ्या घटनांनाही आपल्या समोर आणते..लेखकाने  रामचरित्राचे फार सुंदर व यथायोग्य विवरण यात केलंय..राम हा किती आदर्श पुरूषोत्तम होता ह्याचे फार सुंदर वर्णन केलंय..राम मानव म्हणून व तितकच दैवी पुरूष म्हणूनही त्याच्या कार्याचा व जीवनाचा सर्वांगिण विचार या कादंबरीत आढळतो..ही कादंबरी रामायण वाचलेलं नसणाऱ्या व्यक्तींसाठी सुखद आनंद आहे.कारण मुख्य नायक श्री रामाचे सक्षक्त , सोज्वळ रूप आपल्यासमोर रेखाटलं जातं.त्यात रामाचे वीररसातले वर्णनही सुंदर आहे.राम कसा जगन्नायक आहे व बाकीचे पात्र कसे त्याच्यातच गुंफले गेले आहेत हे फार छान वर्णन केले गेले आहे.       रामाचं स्थान भारतीय समाजमनात किती सखोल कोरले गेले आहे हे लेखकाला चांगलेच माहीत असल्यामुळे "राम" हा ठळकपणे समोर उभा रहातो..पण म्हणून बाकीचे पात्र झाकले जातात असे होत नाही..सीता व लक्ष्मण तसेच बाकीचे सर्...

घरचे लग्न

#_विवाह_शृंखला साहित्य प्रकार - संवाद लेखन विषय - घरचे लग्न ( लगीन घाई) लेखिका - सौ.स्वरूपा कुलकर्णी                                (  होणारी वधू- साक्षी, होणारा वर- सौरभ, वराची आई- माधवी, वराचे बाबा- मुकूंद) मुलाकडील लग्नाघरचा संवाद... माधवी-  अहो, साक्षी फारच सुंदर होती नै साखरपूड्यात...बघता बघता एकच आठवडा राहीला हो लग्नाला...मी तर फार उत्सूक आहे तिला नववधूच्या वेशात पहायला.. मुकूंद- अगं हो हो, जरा श्वास घेशिल बोलतांना...(हसून) खरंय तुझं सौरभला अगदी सुंदर, सुशिल बायको मिळणारे...भाग्यवान तो व आपणही... माधवी- तुम्हाला सांगते, सुनेसाठी आईंच्या पाटल्या व कुड्या जपून ठेवल्यात इतके वर्ष..मी माझ्या लग्नात त्या घातल्या..आता साक्षीला देईन..म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होईल माझी.. मुकूंद- हो नक्की..पण खरं सांग तीला आवडतील नं त्या जुन्या डिझाईन?..हल्लीच्या मुली फारच मॉडर्न विचारांच्या आहेत..त्यांची आवडनिवड वेगळीच..सौरभशी बोललीस का? माधवी- अहो, हा मुद्दा तर माझ्या डोक्यात आलाच नाही हो..किती मी वेंधळी..थांबा...

आज कालचा लग्नाचा थाट

  लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी वैचारिक लेख        आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न किंवा विवाह हा मानवी आयुष्यातील महत्वाचा संस्कार आहे.तो १६ संस्कारांपैकी एक आहे.वेद ऋचांच्या साथीने विवाहवेदीवर नवदांपत्य आजन्म सोबत रहाण्याच्या आणाभाका घेतात.मंत्राग्नीच्या समवेत लग्न सोहळा धुमधडाक्यात पार पडतो.खरं तर लग्न ही दोन्ही जीवांचा आनंद सोहळाच आहे परंतू ,अलिकडच्या काळात लग्न हा एक "इव्हेंट" झालाय! माझं असं मुळीच म्हणनं नाही की लग्नात वेगवेगळ्या प्रथांची जोपासना होण्यासाठी त्या नियोजनबद्ध व सुंदर सादर व्हाव्यात.पण प्रश्न असा आहे की आपल्या सुंदर चालीरीती,प्रथा परंपरा ह्या केवळ "शो" साठी  नसून मनामनांची रेशीमगाठ बांधण्यासाठीची ती एक सात्विक, सुंदर पद्धती आहे.त्यातून दोन जीवांसोबतच दोन परिवार एक होणार असल्याची ती मुहूर्तमेढ आहे.आपल्या सर्व चालीरीतींना सखोल अर्थ आहेत व ते फक्त दिखावा किंवा उंची डामडौल किंवा पैशाची उधळमपट्टी हा नसून मनामनांना जोडण्याचा तो सेतू आहे.        आजचे आई वडिल खूप खर्चिक वाटा निवडून मुलांसाठी वाट्टेल ते करण्याच्या भानगडीत मूळ सूत्रच...

भक्ती

 # लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी     प्रेमातून भक्ती निर्माण होते की भक्तीतून प्रेम निर्माण होतं याचं उत्तर कोंबडी आधी की अंड असं आहे.पण भक्ती म्हंटलं की ती देवाचीच असं साधारण समिकरण समोर येतं. व ते आहेही समर्पक.     प्रेम ही जर भक्तीची सुरूवात मानली तर ते खरंच आहे शिवाय भक्तीतून प्रेमाचा महापूर वहातो हेही खरंय. का भक्ती करावी? किंवा का प्रेम करावं हा प्रश्न असेल तर उत्तर फार सुंदर आहे. ते असं थोडंसं वेगळं-प्रेम कधी केलं जात नाही ते होतंच -असतंच किंवा अध्यात्मात प्रेम म्हणजे ईश्वराचे सत्य अस्तित्व!जे Omnipresent आहे..अर्थात सर्वत्र आहे.मग ही भक्ती म्हणतात ती काय? - ती तर प्रेमाची परिपक्व अवस्था! सहज सुंदर व निरागस भाव म्हणजे भक्ती!ती मुख्यतः ईश्वरावर होते.परमात्मा व आत्मा एकरूप अवस्था जेंव्हा अनुभवतात त्यालाच भक्ती म्हणतात.भक्ती प्रेम निर्माणही करते नी प्रेमाला परम पदापर्यंतही नेते.दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू.प्रेमाशिवाय भक्ती अपूर्ण व भक्तीशिवाय प्रेमही अपूर्ण!किती अभेद्य हे नातं तसेच गहिरंही..भक्तीत रस आला की प्रेमतरंग तयार होतात व देवही भक्ताच्या अश्रूधार...