बंधविमोचन राम!

   लेखक- रविंद्र भट

    विषय- रामायण

     

ही एक अत्यंत सकस व रसदार कादंबरी वाचकाच्या मनाचा ठाव घेते.कादंबरी ही जरी रामायणातले प्रसंग वर्णन करणारी असली तरी आजच्या युगात घडणाऱ्या घटनांनाही आपल्या समोर आणते..लेखकाने  रामचरित्राचे फार सुंदर व यथायोग्य विवरण यात केलंय..राम हा किती आदर्श पुरूषोत्तम होता ह्याचे फार सुंदर वर्णन केलंय..राम मानव म्हणून व तितकच दैवी पुरूष म्हणूनही त्याच्या कार्याचा व जीवनाचा सर्वांगिण विचार या कादंबरीत आढळतो..ही कादंबरी रामायण वाचलेलं नसणाऱ्या व्यक्तींसाठी सुखद आनंद आहे.कारण मुख्य नायक श्री रामाचे सक्षक्त , सोज्वळ रूप आपल्यासमोर रेखाटलं जातं.त्यात रामाचे वीररसातले वर्णनही सुंदर आहे.राम कसा जगन्नायक आहे व बाकीचे पात्र कसे त्याच्यातच गुंफले गेले आहेत हे फार छान वर्णन केले गेले आहे. 

     रामाचं स्थान भारतीय समाजमनात किती सखोल कोरले गेले आहे हे लेखकाला चांगलेच माहीत असल्यामुळे "राम" हा ठळकपणे समोर उभा रहातो..पण म्हणून बाकीचे पात्र झाकले जातात असे होत नाही..सीता व लक्ष्मण तसेच बाकीचे सर्व पात्र तितकेच ठसठशीत आहेत.मोठ्या कौशल्याने रामायणकालीन वर्णन या पुस्तकात आढळते..त्यामुळे सहजच आपण रामासोबत रामायणात प्रवेश करतो.जणू दृश्य समोर घडतेय...हीच लेखकाची जादू..अत्यंत खूबीने संस्कृत श्लोकांचा वापर ही तर वाखाणन्यासारखी बाब.मी खरंच पुस्तकात खूप रमले..कादंबरी जास्त मोठी नाही..त्यामुळे लवकर वाचून संपते..राम मनात कोरूनच ही कादंबरी थांबते...


      पुस्तक जरूर वाचा...राम ज्यांना आवडतो त्यांना तर अलभ्य लाभ!...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न