विहिणबाईंना पत्र
लेखन - सौ. स्वरूपा कुलकर्णी
(चि.सौ.कां. अनुजा व चि.अन्वय यांचा विवाह थाटामाटात पार पडला.सौ.माधवी ताई या नववधूच्या आई व सौ. किर्ती ताई या वराच्या आई..माधवी ताईंनी रूखवतात आपल्या पत्रलेखनातून भावना मांडल्या आहेत.
ते पत्र पुढिल प्रमाणे-)
प्रिय विहिणबाई सौ. किर्ती ताई यांस,
नमस्कार.
लग्न ठरल्यापासून मनात येत असणाऱ्या भावभावनांना वाट मोकळे करून द्यावं असं वाटलं,म्हणूनच हा लेखनप्रपंच.माझी लाडकी लेक अनुजा लहानपणापासून माझ्याजवळच राहिली, वाढली.शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठीही फार लांब जाण्याचा प्रसंग तिच्यावर कधी आला नाही.ती लहानपणापासून अतिशय गुणी व मोठी असल्यामुळे समजुतदार राहिली.मला घरकामात कायम तिची मदत होत होती.बोलक्या स्वभावामुळे मैत्रिणीही खूप आहेत तिला.
माझी एकच विनंती तुम्हाला तिला तुमच्या वसूसारखच समजा.जीव लावा.ती तुम्हाला आईसारखाच मान देईल ही मला खात्री आहे.तीला जमेल तसे पदार्थ शिकवा, घरकामही सांगा ती कशालाही नाही म्हणनार नाही.सगळं शिकेल.मीही जमेल तसं तिला घरकाम शिकवलंय.स्वयंपाक ती उत्तम करते.तुम्हीही नवीन नवीन गोष्टी तीला शिकवा.तिची आईच व्हा.आता मी नसेल तिच्या आसपास पण तुम्ही तिला माया द्यायला मागेपुढे पाहू नका.माझीच छाया ती,तुमच्या अंगणात बगिचा फुलवेल.तुमचं घर भरलं गोकुळ करेल..मला पूर्ण विश्वास आहे.
मी विनंती करते विहिणबाई, तुम्ही माझ्या अनुजाला कधिच अंतर देऊ नका.ती तुमची मुलगीच होऊन जाईल हा विश्वास आहे.
तुमची,
सौ. माधवी
Comments
Post a Comment