Posts

Showing posts from July, 2025
 सांगायचं राहूनच गेलं... प्रिय पु.लं.,          शि.सा. नमस्कार 🙏🏻       काही माणसं आयुष्यात अगदी जवळून भेटतात, जसे आपले आई, वडील, भाऊ, बहीण तर काही लांबची नाती जी रक्ताची असोत किंवा नसोत पण पुरेशी कळतात तर कधी नाहीही. काही माणसं आयुष्यभर भेटतच नाहीत, पण फक्त भेटतात ती पुस्तकातून! अगदी जिवंत माणसासारखी आपल्याशी मैत्री करतात, बोलतात, हसवतात, चार चांगल्या गोष्टी सांगतात आणि रडवतातही! पु. ल. तुम्ही त्यापैकीच एक! मनापासून आवडलेले व्यक्तीमत्वं.. तुमची घडणच मुळात अजब गजब..विनोदाचा ढगळ वेष अंगी घेऊन आयुष्यभर भेटलेल्या नाना रंगा-ढंगाच्या माणसांवर तुम्ही केलेली टिप्पणी आजही खोखो हसवते. तुमची पुस्तकं हातात घेतली की मी काही काळ ही भोवतालची दुनिया विसरून तुम्ही रंगवलेल्या कोकणात तर कधी मुंबईत , परदेशातही सहज फेरफटका मारते.पुस्तकांच्या पानापानांतुन तुम्ही रंगवलेले जग पहातांना " अरेच्या , किती खरंय हे" म्हणून तासन् तास गुंतून जाते. साहित्य, कला, नाटक, संगित अशा प्रांतातुन तुम्ही यथेच्छ मुशाफिरी केली. तुम्ही सामान्य माणसाची नाडी चांगलीच ओळखली होती. पु.ल. त...
 ती आणि चाळीशी ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी      हिरव्यागार झाडाची कोवळी पानं पाहिली की आतुन एक सुखद शिरशिरी येते.कारण, हा त्या झाडाचा सृजनोत्सव असतो. नवनविन पानांनी सजलेली झाडाची काया विलक्षण सुंदर दिसते. पोपटी पानांची सळसळ सुखद वाटते.  एका तरूण पोपटी पानांसारखी 'तीही' सुंदर असते.षोडशवर्षीय, नवयुवती किती सुंदर, मोहक, चंचल भासते नाही?. तिची चाल बदलून जाते. निसर्गाचा हा मनमोहक बदल तिचे आयुष्य व्यापून टाकतो. तीचं बोलणं, दिसणं,हसणं साधं नजरेनं कटाक्ष टाकणंही बदलून जातं. सुंदर होतं. ती मुळातच सुंदर असेल तर मग तरूण वयात तर किती सुंदर असेल हे सांगूच नये.अशातंच लग्नं झालं तर मग काय विचारता, तरूणीचे तन मन नव्या नव्हाळीने ताजे तवाने होते. तीच्या तरूण तुकतुकीत अंगकांतीवर सोनेरी तेज फाकते. हिरवा चुडा, मोगऱ्याचा गजरा, साजश्रृंगार, हिरवी काठपदराची साडी सगळंच नवचैतन्य प्रकटते.ती तिच्या नवऱ्याची लाडकी साजरी नवयौवना किती अल्लड, लाघवी लोभस असते. खरंच, रम्य ते दिवस. मग हळूच त्यांच्या संसारवेलीवर फळ लागते. सुंदर चिल्ल्यापिल्यांनी घर भरून जाते. तिचे व त्याचे जग अधिक सुंदर बनते. हळूहळ...