Posts

Showing posts from September, 2024
 सद्गुरूकृपा ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी      ज्याला ईश्वराविषयी कुतूहल आहे त्याने नक्की सद्गुरूंकडे जावं. खरं तर सद्गुरूच अशा मुमूक्षाकडे वाट काढत येतात. कारण, मी संसाररूपी मायाबंधनात आहे हे आधी ज्याला जाणवते त्याच्यावरच सद्गुरूकृपा होते.      जग क्षणभंगूर आहे, इथे मिळणारं सुख असो वा दुःख दोन्हीही क्षणापुरतेच. या जगात असलेल्या प्रत्येक वस्तूचा एक ना एक दिवस नाश होणार हे नक्की. जगात होऊन गेलेल्या मोठमोठ्या विभूतिही काळाच्या ह्या विशाल पडद्याआड निघून गेल्या. मग शेवटी उरणार काय ? तर काहिच नाही. फक्त एकच एक परब्रह्म !! जे डोळ्यांनी दिसत नाही पण ते सर्वत्र व्याप्त आहे. कणा कणात आहे. स्वयंभू आहे. त्याचा कोणी मालक नाही. त्याला जन्म नाही, म्हणून मृत्युही नाही. तो अव्यक्त, सनातन, सर्वांचा मायबाप असा सर्वशक्तीमान, सच्चिदानंदघन परमात्माच कायम रहातो. हे आत्मानुभूतीद्वारे ज्याक्षणी साधकाला कळते तत्क्षणी चर्मचक्षूंशिवाय ज्ञानचक्षूद्वारे आत्मा हाच परमात्मा हे तत्व लक्षात येते. परमात्मा गुप्त आहे किंवा रहस्य आहे हे संसार मोहपाशात अडकलेला बद्ध जीव म्हणेलच. पण सखोल चिंतन...