अविस्मरणीय तिर्थयात्रा भाग ४ - सौ. स्वरूपा कुलकर्णी चित्रकुटहून वाराणसीला सुखरूप पोहोचलो. रात्री जेवण करून विश्राम केला आणि पहाटे लवकर आवरून काशी विश्वेश्वर दर्शनासाठी निघालो.. *४.काशी(वाराणसी)* "काशीस जावे नित्य वदावे" अशी एक म्हण आहे.. म्हणजे "मी काशीला चाललोय" असे रोज जरी म्हणले तरी काशीस गेल्याचे पूण्य मिळते असे म्हंटले जाते. काशी ही सप्त मोक्षपुरीतील एक नगरी..ही नगरी भगवान भोले शंकरांची पवित्र धरा आहे.येथे महादेवांचा "बुलावा" आल्याशिवाय येणे होत नाही. काशी हे भगवान शंकरांच्या त्रिशुळावर स्थित नगरी मानली जाते..तप:साधनेची, वैराग्य व भक्ती यांचा अभुतपूर्व संगम असणारी, मोक्ष देणारी प्राचीन नगरी म्हणून सर्व हिंदूंना परिचीत आहे..तसेच १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणूनही शिवलिंगाचे दर्शन घेणे फार महत्वाचे मानतात.. सर्वप्रथम आम्ही काशी विश्वनाथाच्या हॉटेलपासून मंदिराकडे टांग्याने गेलो. पावसाची रिमझीम चालूच होती.इकडे श्रावणमास चालू असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती.. आम्ही गेलो त्यादिवशी गुरूवार होता. दर्शन पासेस असल्यान...
Posts
Showing posts from August, 2026
- Get link
- X
- Other Apps
अविस्मरणीय तीर्थयात्रा भाग ३ - सौ. स्वरूपा कुलकर्णी रामलल्लाच्या प्रसन्न दर्शनानंतर आम्ही रात्र अयोध्येत घालवून सकाळी नाश्ता वगैरे करून चित्रकुटला रवाना झालो. *३.चित्रकुट* रामायणात सांगितल्याप्रमाणे रामप्रभू,सीतामाई व लक्ष्मणाने साडे अकरा वर्षे चित्रकुटावर निवास केला होता. येथेच तुलसिदासांना रामरायाने दर्शन दिले होते.सती अनसुया व अत्री ऋषींचा सिद्धाश्रमही इथेच आहे.मंदाकिनी नदी येथे शांत वहाते. सर्वप्रथम आम्ही कामदगिरी पर्वत येथिल कुबेराचे मंदिर पाहिले. रामरायाने रावणाला मारण्याची इच्छा मनात धरून कुबेराला कंदमूळ फळे येथेच अर्पण केली असे गाईडने आम्हाला सांगितले. रामघाट ते कामदगिरी पर्वत अंतर बरेच आहे पण रामचंद्र तिथून रोज या कुबेर मंदिरात कंदमुळ फळे अर्पण करण्यासाठी येत असत. शेवटी रावण वध झालाच हे आपण जाणतोच. त्यानंतर गुप्त गोदावरी या अद्भूत ठिकाणी गेलो जेथे आपली गोदावरी नदी गुप्तपणे रामरायांना भेटण्यासाठी येत असे. ती गुफेतून वहाते व पुढे अदृश्य होते..पाण्याचा प्रवाह थोड्याच अंतरावर वहातो अस...
- Get link
- X
- Other Apps
अविस्मरणीय तीर्थयात्रा भाग २ - सौ. स्वरूपा कुलकर्णी काही दुर्मिळ योग हे पुर्वीच ठरलेले असावेत असा योग अयोध्येच्या रामलल्लाच्या दर्शनाचा होता.. राममंदिर झाल्यापासून सारखे वाटत होते की रामाचे दर्शन कधी होईल..ती ओढ शब्दात सांगता येण्यासारखी नाहीच खरी..हिंदूंचं रामाशी असलेलं नातं खरंच कुठल्याही दाखल्याने सिद्ध करायची गोष्टच नाही..तो सर्वांच्या आत बसलेला आत्माराम आहे तोच परमात्माही आहे.. राम व कृष्ण ही दैवतं जणू आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत.. आम्ही सायंकाळी अयोध्येत पोहोचलो.. रामदर्शनाचे पासेस काढले होतेच.. मनातली दाटून आलेली भावावस्था कधी रामदर्शन घेईल अशीच होती..तिथल्या लोकल रिक्षाचालकाने आम्हाला सीतेचं रसोईघर, रामसीतेची हनुमानाची काही मंदिरे दाखवली.. पण मन मात्र रामाचे दिव्य दर्शन घेण्यासाठी आसुसले होते.मग रिक्षाचालकाने रामलल्लाच्या भव्य मंदिर कॉरिडॉरजवळ आम्हाला सोडले.. भव्यता,रमणियता,सौंदर्य अशा तिनही गोष्टींनी सुसंपन्न अशा त्या मंदिर आवारात पोहोचताच राम नामाचा एकच जयघोष झाला.. भरभर पावलं पडत होती..मधे मधे सिक्यरिटी चेकिंग होत होते.....
- Get link
- X
- Other Apps
अविस्मरणीय तीर्थयात्रा भाग १ - सौ. स्वरूपा कुलकर्णी कुठल्याही अनुभवाला प्रभावीपणे शब्दांकीत करण्यासाठी प्रतिभा शक्तीचा हात असतो म्हणतात.. देवी शारदेला वंदन करून मी ह्या तीर्थयात्रेचा अनुभव शब्दांकीत करत आहे..साधारण मे महिन्यातच आमचं अयोध्या दर्शन यात्रेचा विषय निघाला. राम हे माझं आवडतं दैवत त्यामुळे मी नाही म्हणन्याचा प्रश्नच नव्हता..लवकरच टिकीट बूक झाले व आम्ही यात्रेच्या तयारीला लागलो.. माझे आई वडील मुली व इतर कुटूंबीय असे २३जणांची यात्रा ठरली.. यात लहान मोठी अगदी शाश्वत (वय वर्षे अडीच)ते ७१ वर्षाचे मामा असे आम्ही तिन पिढ्यातले सदस्य यात्रेत होतो..प्रवास रेल्वेने होणार होता म्हणून जय्यत तयारी होती.. खाण्याचे पदार्थ, फळे, पावसाळा आहे म्हणून छत्र्या, रेनकोट, स्वेटर , कपडे, सर्व गरजेच्या वस्तू घेऊन आमचा लवाजमा १ तारखेला रात्री ९ वाजता पुणे स्टेशनला पोहोचला.. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह होता..पण रेल्वे १ तास लेट आली नी आम्ही थोडे हिरमुसलो..शेवटी आमची सुपॉल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली नी हुश्श झालं.. नंतर एकेक जण रेल्वेत चढला..रेल्वेत साम...