#प्रवास #आठवणी #उटी लेख क्र ३ -सौ. स्वरूपा कुलकर्णी म्हैसूरला सुबोधच्या कस्टमर्सकडे अत्यंत जोरदार आतिथ्य स्विकारून उटीकडे प्रयाण केले. उटी हे उदगमंडलम् या नावानेही ओळखले जाते. हे तमिळनाडू राज्यातील थंड हवेचे हिल स्टेशन आहे.येथिल बोटॅनिकल गार्डन, बोटींग, चहा व कॉफीचे मळे अत्यंत सुंदर अनुभव देतात. प्रथमतः आम्ही हॉटेलवर रूम बूक केली. त्या रूममधिल मोठ्या खिडक्यातुन उटीचे नैसर्गिक सौंदर्य दृष्टीस पडत होते.हवा उबदार होती फार थंड नव्हती. तिथे थोडा हिरमोड झाला कारण उटी म्हंटल्यावर थंडी खूप असेल या भावनेने बऱ्याच तयारीत आम्ही आलो होतो.त्यानंतर सगळ्या दक्षिण भारतात मिळणारा इडली,रस्सम्, वडा सांबार खाल्ला.खरंतर एव्हड्या प्रवासात सगळीकडे आलटून पालटून तेच पदार्थ खाल्ले पण खरं सांगू आम्ही दोघेही अजिबात कंटाळलो नाही.कारण आम्ही दोघेही इडली-डोसा लव्हर! मग काय एकुणच चंगळ होती.कुठेही कंटाळलो नाही. निलगिरीच्या हिरव्या पर्वतरांगांतून चहा कॉफीचे मळे फारच सुखद दर्शन देत होते.तिथे मला " साजन" पिक्चर मधिल माधूरी व संजय दत्तच्या गाण्यांची आठवण...
Posts
Showing posts from 2025
- Get link
- X
- Other Apps
#प्रवास #म्हैसूर #आठवणी लेख क्र २ - सौ. स्वरूपा कुलकर्णी बॅंगलोरचा प्रवास संपवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो आणि कारने आम्ही म्हैसूरकडे प्रयाण केले. म्हैसूरमध्ये सर्वात प्रथम पाहिले ते म्हैसूर पैलेस! मी माझ्या आयुष्यात इतका भव्य दिव्य राजवाडा प्रथमच पहात होते. वास्तूची भव्यता, देखणा परिसर,सुंदर रंगसंगतींचे घुमट सगळंच सुंदर. राजवाडा बाहेरूनच इतका विशाल व सुंदर आहे की पहाणारा प्रेमातच पडतो. आतुन पहातांना भारतातील विविध धर्मांची छाप त्या कलाकृतींवर दिसून येत होती. विविध कलाकृती, सुंदर दरवाजे, आतिल भव्यता, झुंबर तर केवळ अप्रतिम असे..सगळं डोळ्यात साठवत तिथले खांब पहात व एकुणच वास्तुतील वैभव पाहून मन तृप्त झाले. तिथे बाहेर इतर नवख्या जोडींप्रमाणेच आम्हीही तिथल्या कॅमेरामनकडून फोटो काढून घेतला व एक अनोखी आठवण त्या फोटोत कैद झाली. नंतर म्हैसूरचे अतिशय प्रसिद्ध वृंदावन गार्डन पहाण्याचा योग आला. अप्रतिम लाईट फाऊंटेन अर्थात रंगीत कारंज्यासाठी प्रसिद्ध असलेले हे गार्डन पहातांना व नवऱ्याच...
- Get link
- X
- Other Apps
#प्रवास #बंगळूरू #आठवणी लेख क्र १ -सौ.स्वरूपा कुलकर्णी २०१३ मध्ये आमचं लग्नं झाल्यावर आम्ही फिरायला म्हणून बंँगलोर(आताचं बंगळूरू) उटी,म्हैसूर अशा पर्यटकांना प्रिय असणाऱ्या स्थळांना भेट द्यायला गेलो.मुळातच मला प्रवास आवडतो,नविन ठिकाणचे अनुभव,तिथली माणसं,तिथले व्हाईब्स सगळं सगळं मनात साठवायला प्रचंड आवडतं.पुन्हा नंतर त्या आठवणी आल्या की मन परत ताजंतवानं होऊन जातं. जणू टाईम मशीनसारखं परत त्या काळात जाऊन तो अनुभव समोर येतो. तर आम्ही ट्रॅव्हल्सने पुण्याला व पुण्याहून विमानाने बँगलोरला पोहोचलो.विमानात दुसऱ्यांदा बसण्याचा योग होता.विमान प्रवास सहज व आरामदायक पार पडला.तो रोमांचक होता.पुणे ते बॅंगलोर पटकन आलो असं वाटत राहिलं..मग बँगलोरच्या अतिशय आधुनिक नी लांबलचक एअर पोर्टवर पोहोचलो. तिथे पोहचल्यावर खूप भारी वाटलं.तिथला क्राऊड खरंच मस्तं होता. तिथून एका हॉटेलवर रूम घेऊन फ्रेश झालो. तिथे सुबोधच्या(नवरा) जुने कस्टमर असलेल्या श्री.सत्यनारायण सरांच्या मुलीचे शाही लग्नाचे निमंत्रण स्विकारलेले असल्याने तिकडेही २ दिवस जाणे झाले.कर्नाटकी प...
- Get link
- X
- Other Apps
मोक्षदायीनी एकादशी ।।श्री राम।। ।।श्री कृष्ण।। - सौ. स्वरूपा कुलकर्णी आज गीताजयंती.तसेच मोक्षदा एकादशी. अतिशय पवित्र दिवस. भगवंताने आजच्या दिवशी गीता सांगितली म्हणून हा दिवस खास आहेच पण एकादशी असल्यामुळे उपवासही घडतो म्हणून अजुन खास आहे. आजचा दिवस तसेच इतरही एकादशींना जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास हा तन व मन दोन्ही शुद्ध करतो.हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.आज सकाळी उठून मुलींचं आवरलं नी त्या शाळेत गेल्या. मग स्वतःचं आवरून देवपूजेला बसले. आज एकादशी म्हणून देवाला उद्वार्चन केले. सुगंधी शिकाकाईने व गरम पाण्याने स्नान घातले. सुगंधी उदबत्तीने वातावरण आधीच प्रसन्न झाले होते. तोंडाने श्री राम जय राम जय जय राम चा जप करत देवाला दुधाने स्नान घातले. परत स्वच्छ पाण्याने स्नान घातले. वस्त्राने पुसून देव जागेवर ठेवले , फोटोंचीही पुजा झाली. माझ्या देवघरात कुलदेवत खंडोबा व वणीची देवी आहेत. तसेच, गणेश व इतरही देव आहेत. पण सर्वात जिव्हाळ्याचं नातं आहे ते रामाशी. गोंदवलेकर महाराज सांगतात तसं मी रामाशी सर्व नाती जोडली आहेत. वडिल, पती, बाळ, मित्र, आई, द...
- Get link
- X
- Other Apps
विष्णूप्रिया एकादशी ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी मंडळी, एकादशी म्हंटलं की उपवास, पंढरपूर किंवा वारी असं चित्र डोळ्यासमोर येतं. पुराणांमध्ये एकादशीविषयी खूप महत्वपूर्ण कथा व माहिती आलेली आहे.सर्वप्रथम एकादशी हे एक व्रत आहे आणि ते विष्णूला अत्यंत प्रिय आहे ही महत्वाची माहिती मिळते. जो एकादशी नेहमी करतो तो वैकुंठाला जातो असे म्हणतात. एकादशी बद्दल माझं वैयक्तिक उदाहरण सांगते. दोन वर्षांपुर्वी आषाढी एकादशीपासून मी ह्या व्रताला सुरूवात केली. बऱ्याच अनुभवी लोकांकडून व पुस्तकांमधून तसेच लहानपणापासून घरातल्या वातावरणामुळे एकादशी ह्या व्रताबद्दल विलक्षण कुतूहल होतं. मोठी एकादशी तर करतच होते पण वर्षातील सगळ्या एकादश्या कराव्यात अशी आस मनाला लागली. तशी मी विष्णूभक्तंच पण एकादशीचा उपवास निभवेल का नी दरवेळी तो लक्षात राहिल का असा मनात प्रश्नं होताच. पण तो निभावणे आपल्या हातात नसुन प्रत्यक्ष हरीच त्याची काळजी घेतो हे मला थोड्याच दिवसात कळाले. आपण चुकूनही एकादशी विसरत नाही व उपवासही चांगला निभावतो हेही मला पुढे कळत गेले.खरंच हे माझे क्रेडीट नाहीच, ही त्या हरीचीच कृपा. एकादशीचा दि...
- Get link
- X
- Other Apps
एक बिल्व शिवार्पणम्.. - सौ. स्वरूपा कुलकर्णी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवालयात पुजेसाठी गेले होते. स्वच्छ पांढरे कपडे घालून माझ्यासारख्या अनेक स्त्रिया पुजेसाठी अगदी उत्साहात २ -२ तास रांगेत अगदी शांत बसल्या होत्या. राहात्यातील हे शिवालय तसं जुनंच.अगदी माझ्या आजेसासूच्याही पुर्वीच्या पिढीचं. दिसायला बाहेरून अगदी साधंसंच. पण गाभाऱ्यात मात्र पावित्र्यं जपलेलं..आतुन खूप वेळ रूद्राचे पवित्र मंत्र कानावर पडत होते..मन शांत करत होते..गुरूजी व बाहेरील स्त्रीयाही तन्मतेने त्या मंत्रांशी एकरूप झाल्या होत्या.मीही तितकीच तन्मयतेने विभोविश्वनाथाचे ते पवित्र रूद्रं ऐकत ओम् नमः शिवायचा जप करत बसले होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर शिवपूजेसाठी आत जाता आलं.गाभारा खूप मोठा नव्हता पण ४ जणी एकत्र पूजा करू शकतील इतका मोठा नक्कीच होता.समोरच पुर्वी कधिही न बघितलेली सुरेख अशी त्रिमुखी ब्रह्मा,विष्णू महेशाची ती पिंड मनाला आकर्षून गेली.तिनही देवता कोरलेली ती पिंड किती वेगळी वाटली मला! पिंडीवर अखंड पडणारी अभिषेकपात्रातील जलधारा!मुखाने नकळत ओम् नमःशिवाय जप!.मन अधिक पवित्र व नकळत गंभि...
- Get link
- X
- Other Apps
सांगायचं राहूनच गेलं... प्रिय पु.लं., शि.सा. नमस्कार 🙏🏻 काही माणसं आयुष्यात अगदी जवळून भेटतात, जसे आपले आई, वडील, भाऊ, बहीण तर काही लांबची नाती जी रक्ताची असोत किंवा नसोत पण पुरेशी कळतात तर कधी नाहीही. काही माणसं आयुष्यभर भेटतच नाहीत, पण फक्त भेटतात ती पुस्तकातून! अगदी जिवंत माणसासारखी आपल्याशी मैत्री करतात, बोलतात, हसवतात, चार चांगल्या गोष्टी सांगतात आणि रडवतातही! पु. ल. तुम्ही त्यापैकीच एक! मनापासून आवडलेले व्यक्तीमत्वं.. तुमची घडणच मुळात अजब गजब..विनोदाचा ढगळ वेष अंगी घेऊन आयुष्यभर भेटलेल्या नाना रंगा-ढंगाच्या माणसांवर तुम्ही केलेली टिप्पणी आजही खोखो हसवते. तुमची पुस्तकं हातात घेतली की मी काही काळ ही भोवतालची दुनिया विसरून तुम्ही रंगवलेल्या कोकणात तर कधी मुंबईत , परदेशातही सहज फेरफटका मारते.पुस्तकांच्या पानापानांतुन तुम्ही रंगवलेले जग पहातांना " अरेच्या , किती खरंय हे" म्हणून तासन् तास गुंतून जाते. साहित्य, कला, नाटक, संगित अशा प्रांतातुन तुम्ही यथेच्छ मुशाफिरी केली. तुम्ही सामान्य माणसाची नाडी चांगलीच ओळखली होती. पु.ल. त...
- Get link
- X
- Other Apps
ती आणि चाळीशी ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी हिरव्यागार झाडाची कोवळी पानं पाहिली की आतुन एक सुखद शिरशिरी येते.कारण, हा त्या झाडाचा सृजनोत्सव असतो. नवनविन पानांनी सजलेली झाडाची काया विलक्षण सुंदर दिसते. पोपटी पानांची सळसळ सुखद वाटते. एका तरूण पोपटी पानांसारखी 'तीही' सुंदर असते.षोडशवर्षीय, नवयुवती किती सुंदर, मोहक, चंचल भासते नाही?. तिची चाल बदलून जाते. निसर्गाचा हा मनमोहक बदल तिचे आयुष्य व्यापून टाकतो. तीचं बोलणं, दिसणं,हसणं साधं नजरेनं कटाक्ष टाकणंही बदलून जातं. सुंदर होतं. ती मुळातच सुंदर असेल तर मग तरूण वयात तर किती सुंदर असेल हे सांगूच नये.अशातंच लग्नं झालं तर मग काय विचारता, तरूणीचे तन मन नव्या नव्हाळीने ताजे तवाने होते. तीच्या तरूण तुकतुकीत अंगकांतीवर सोनेरी तेज फाकते. हिरवा चुडा, मोगऱ्याचा गजरा, साजश्रृंगार, हिरवी काठपदराची साडी सगळंच नवचैतन्य प्रकटते.ती तिच्या नवऱ्याची लाडकी साजरी नवयौवना किती अल्लड, लाघवी लोभस असते. खरंच, रम्य ते दिवस. मग हळूच त्यांच्या संसारवेलीवर फळ लागते. सुंदर चिल्ल्यापिल्यांनी घर भरून जाते. तिचे व त्याचे जग अधिक सुंदर बनते. हळूहळ...
- Get link
- X
- Other Apps
ढळलेली सांज.... ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी सांज ही वितळली धुंद त्या डोंगरात गं निशा काळी सावळी सावरी आता पदर गं रंग धुंद संध्या सावळी बिलगली किरणास गं आवरूनी पसारा केशरी किरणे घेती निरोप गं लेवूनी साज चंदेरी निशा आली पटलावरी गं शशि साजिरा पुनवेचा पश्चिमेस आला गं किती देखणे क्षण सुगंधी घेऊनी मन्मथ पुनवेचे गं निशा चंद्र युगूल बागडे धुंदं प्रणय भरजरी गं चांदणे पुनवेचे सांडते प्रतिबिंबं निळ्या डोही गं अवनीवरही घडे काहीसे धुंद युगूल एकांती गं
- Get link
- X
- Other Apps
तो, ती आणि कोल्ड कॉफी ... लेखिका- सौ. स्वरूपा कुलकर्णी कॉलेजला जायला राधा निघाली. तो होताच तिचा पाठलाग करत मागे येणारा. तिलाही सवयच झाली होती त्याची. ती तशी अबोलीचं फूल पण समोर तो दिसला की कळी खुलायची तिची.ती व तिच्या मैत्रिणी आणि तो कॉफी शॉपमध्ये भेटायचे. जवळपास रोजच.तो असला की ती नकळत कॉन्शिअस व्हायची व आज आपला अवतार ठिक तर आहे ना म्हणून हळूच मोबाईलच्या स्क्रीनकडे नजर टाकायची. तोही बोलता बोलता तीला कोपरखळी मारत पोट धरून हसवायचा. मग तिची खळी अजुनच खुलायची. " हाय तेरी अदा" म्हणत मनातच तिला मिठीत घ्यायचा. ती व तो कायमच एकमेकांविषयी मनामध्ये जास्त व समोरासमोर कमी असे बोलत होते. एकमेकांचा खूप आदर करत होते. तीचा स्वभाव मुलांमध्ये रमण्याचा नव्हताच कधी. पण हा मुलगा मात्र तिच्या मुलांविषयीच्या गैरसमजाला फाटा देणारा होता. तो म्हणजे श्रीरंग होताच निगर्वी, हुशार, सभ्यही होता. मनाने तिच्यात गुंतून बसला होता. खरंतर दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा होता. कॉफीशॉपच्या बहाण्याने होणाऱ्या गाठीभेटी त्यांना हलकेच मोरपीस फिरवल्यासारख्या रम्य वाटत होत्या. ...
- Get link
- X
- Other Apps
घर -सौ. स्वरूपा कुलकर्णी गेल्या काही महिन्यांपासून आमच्या फ्लॅटचं रिनोव्हेशन अर्थात नुतनीकरण करण्याचा विचार चालू होता. आम्ही नवरा बायको रोज त्याबाबत चर्चा करायचो. खरं म्हणजे नुतनीकरण करतांना खर्चाचा विचार करत होतोच पण त्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी रहावं लागणार हा विचार तितकाच महत्वाचा वाटत होता. २ वर्षांपुर्वीच मिस्टरांनी त्यांच्या काकाचे जुने घर विकत घेतले तेही अगदी हौस म्हणून. कारण काय तर त्यांची लहानपणची जुनी आठवण होती व घर अगदी स्वस्तात मिळाले म्हणूनही. मग फ्लॅटचे रिनोव्हेशन करायचे तर पूर्ण होईपर्यंत कुठेतरी रहावेच लागणार म्हणून राहात्यातल्या या गावातील घरालाच प्रथम पसंती होती. हे घर म्हणजे ३ मोठ्या खोल्या, पाठिमागे भरपूर मोकळी जागा आणि टुमदार असा जुन्या पद्धतीचा बंगला. लहानपण सोडलं तर नेहमीच फ्लॅटमध्ये आयुष्य गेलेल्या मला हे जरा नविनच व कुतूहलाचं होतं. तसं गावातल्या मैत्रिणी भरपूर आहेतच पण समोर व बाजूला फारशी ओळख नसल्याने जरा वेगळं वाटलं. घराला जुन्या पद्धतीच्या लाकडी, लोखंडी डिजाईनच्या खिडक्या. ह्या घराचेही पुर्वीच रिनोव्हेशन केलेले असल्याने स्वच्छ...
- Get link
- X
- Other Apps
भक्ती ©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी परमेश्वराच्या निर्गुण निराकार तत्वाला सगुण साकार करण्याची ताकद ज्या गोष्टीत आहे ती म्हणजे भक्ती! प्रेम, स्नेह, माया, ममता, दया, जिव्हाळा या आणि अशा सर्व सुंदर भावनांचा एकत्रित परिपाक म्हणजे भक्ती! भगवंत भक्ताशिवाय परिपूर्ण नाहीच मुळी. अहो म्हणून तर हा मायेचा पसारा आहे.वैकुंठातही देव नाही नी कैलासातही नाही जिथे भक्त भक्तिने त्याचे गायन करून रंगुन जातात तिथे मी असे तो सांगतो.भक्ती हा सर्वस्वी पूर्ण शरणागतीचा विषय आहे. कारण जिथे मी मावळला तिथेच भक्तीचे शिखर. मग भक्त असो की भगवंत एकमेकांत मिसळून गेले की भक्तीचे दिव्य रंग उजळून निघतात. भगवंत नेहमीच भक्तीच्या शोधात असतो. खरा सच्चा प्रार्थनेचा सूर ऐकला की त्याचे कान टवकारतात. अशा ठिकाणी तो आवर्जुन असतोच असतो. भावनांनी भगवंताला प्रेमाने पुजने मग तिथे वरवरच्या साधनांची गरज नाहीच. भक्ताने आर्ततेने घातलेली साद त्याला जागवते. शुद्ध पवित्र मनाने केलेली मानसपुजाही त्याला चालते. करोडपती व्यक्तीने केलेली साग्रसंगित पुजा त्याला मोहीत करत नाही तर अश्रुधारांचा प्रेमवर्षाव त्याला अ...
- Get link
- X
- Other Apps
प्राजक्तं - सौ. स्वरूपा कुलकर्णी चल सांगतो मी तुला फुलाची ती कथा, रंगबावरा निसर्ग कसा गुंफतो पाकळ्या प्राजक्तं फुल उमलते कळीतून गोजिऱ्या केशरी देहदंड पाच पांढऱ्या पाकळ्या फुल सुकूमार कोवळे पानापानातुन बाहेरं जणू बाळ इवलेसे पाही आईच्या पदरातुन पहाटेच्या नक्षत्रवेळा जणू चांदणे खाली येई फुल जन्म घेई तेंव्हा चांदण्यांचाही जन्म होई फुल सुंदर गोजिरे साही थेंब तो दवाचा फुलावर शिंपले अत्तर दशदिशांनी अहा! अशा नाजुक वेळेस आला क्षण विरहाचा सुर्य जन्मता डोंगरी झाला पसारा किरणांचा प्राजक्ताचे झाडं जणू ढाळी अश्रु दुःखाचे टपटप फुले गळती सारे मातीत अवघे स्वर्गातले दिव्य तरू वसुधेच्या कुशीतं पाही रूप जग सारे कोमल प्राजक्तं फुलांचे
- Get link
- X
- Other Apps
घर सौ. स्वरूपा कुलकर्णी गेल्या काही महिन्यांपासून आमच्या फ्लॅटचं रिनोव्हेशन अर्थात नुतनीकरण करण्याचा विचार चालू होता. आम्ही नवरा बायको रोज त्याबाबत चर्चा करायचो. खरं म्हणजे नुतनीकरण करतांना खर्चाचा विचार करत होतोच पण त्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी रहावं लागणार हा विचार तितकाच महत्वाचा वाटत होता. २ वर्षांपुर्वीच मिस्टरांनी त्यांच्या काकाचे जुने घर विकत घेतले तेही अगदी हौस म्हणून. कारण काय तर त्यांची लहानपणची जुनी आठवण होती व घर अगदी स्वस्तात मिळाले म्हणूनही. मग फ्लॅटचे रिनोव्हेशन करायचे तर पूर्ण होईपर्यंत कुठेतरी रहावेच लागणार म्हणून राहात्यातल्या या गावातील घरालाच प्रथम पसंती होती. हे घर म्हणजे ३ मोठ्या खोल्या, पाठिमागे भरपूर मोकळी जागा आणि टुमदार असा जुन्या पद्धतीचा बंगला. लहानपण सोडलं तर नेहमीच फ्लॅटमध्ये आयुष्य गेलेल्या मला हे जरा नविनच व कुतूहलाचं होतं. तसं गावातल्या मैत्रिणी भरपूर आहेतच पण समोर व बाजूला फारशी ओळख नसल्याने जरा वेगळं वाटलं. घराला जुन्या पद्धतीच्या लाकडी, लोखंडी डिजाईनच्या खिडक्या. ह्या घराचेही पुर्वीच रिनोव्हेशन केलेले असल्याने स्वच्...
- Get link
- X
- Other Apps
#मातृदिन Repost -सौ.स्वरूपा कुलकर्णी प्रिय आई, पत्र लिहीण्यास कारण की, तुझा माझा पत्र संवाद होण्याची ही पहिलीच वेळ. लग्न व्हायच्या आधी तुला सोडून रहाण्याचा प्रसंग क्वचितच आला. लग्न झाल्यानंतर मात्र तुझ्या फोनची कायम वाट पाहिली आणि आजही पहाते. लहानपणापासून मला देव धर्म याविषयी कायम सांगणारी तू माझ्या मनात कायमच श्रद्धेचा अखंड नंदादीप आहेस. यासोबतच तुझा प्रेमळ स्वभाव सतत हवाहवासा वाटतो. आजही वाटतं तुझं साधं, सोज्वळ, सुंदर भोळं रूप देवघरात देवाशेजारी ठेवावं व त्या परमेश्वराला म्हणावं तुझ्यापेक्षाही प्रेमळ आणि माझी अहोरात्र काळजी करणारं एक माणूस आहे बरका माझ्या जगात. नेहमी कपाळी मोठ्ठं कुंकू लावणारी, सदा वेणीच घालणारी, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र घालणारी माझी ईश्वराचेच दुसरं रूप घेऊन आलेली आई, खरच तुझ्या मुलीचे तू वैभव आहेस. कारण स्वतः पलिकडे माझ्यावर प्रेम करणारी तू, तुझ्या सोशिक स्वभावामुळे माझी आदर्श झालीस जणू माझी संपत्ती झालीस. फोनवर बोलतांनाही आधी जावयाची, मुलाबाळांची चौकशी करणारी तू त्यांच्यासाठी नवस सुद्धा क...
- Get link
- X
- Other Apps
ऋतुरंग - सौ. स्वरूपा कुलकर्णी ऋतु बदलला म्हणजे रोज दिसणारी झाडांची, फुलांची, हवामानातील बदलाची जाणीव आपल्याला होते. हे ऋतुरंग मला जणू नववधुने गृहप्रवेश करतांना तीच्या बदलणाऱ्या आयुष्यासारखे सुंदर वाटतात. सुंदर सकाळ अजुनच सुंदर होते.आता हेच बघा ना,सद्ध्या ऋतु बदलतोय हे आपल्याला जाणवतंय. हिवाळा जाऊन उन्हाळ्याकडे झपाट्याने प्रवास होतोय. शिशिर सरून वसंताचे आगमन झाले आहे.निसर्गातील हा बदल विलक्षण देखणा व सुगंधी आहे , कसा ते बघा हं..विविध झाडांच्या हिरव्या पानांतुन आता कोवळ्या पोपटी पानांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात केलिये.आंब्याच्या हिरव्या- पोपटी पानांत आता मोहर लगडलाय.आता आंब्याच्या प्रतिक्षेत सर्वजण मोहोर व बाळकैऱ्यांकडे आठवणीने मधुन मधुन लक्ष ठेऊन आहेत. कैऱ्यांची चटणी,तक्कू, लोणची हळूहळू घराघरात दिसू लागलीये. छोट्या बागेतील झाडांवर उन्हामुळे विसावलेले विविध रंगांचे-जातीचे पक्षी दिसत आहेत. नळाजवळ, पाणवठ्याजवळ पक्षी घुटमळत आहेत. तहानलेल्यांसाठी गच्चीवर, गॅलरीत पाण्याच्या छोट्या वाट्याही ठेवल्या जाताहेत. पहाटेच कळ्या उमलून जणू ह्या चांदण्याच वाटाव्यात अशा मोगऱ्याचा ...
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार🙏 माझं नाव आनंदी.. डॉ. आनंदी गोपाळराव जोशी आज तुम्हाला माझी छोटी जीवनगाथा सांगणार आहे.माझा जन्म ३१ मार्च १८६५चा. मी माहेरची यमुना. गणपतराव जोशींची ज्येष्ठ कन्या. वयाच्या ९ व्या वर्षी माझा विवाह माझ्याहूनही वयाने २० वर्ष मोठ्या बीजवराशी गोपाळराव जोशींची झाला.गोपाळराव हे मुळ नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे.लग्नानंतर माझे नाव यमुना बदलून आनंदी ठेवले गेले.लग्न झाल्यापासूनच गोपाळराव मला अभ्यास करायसाठी मागे लागत. कविता , धडे पाठ करायला सांगत. ती नाही केली तर मारहाणदेखील करत.त्या काळी मुलीने स्वयंपाक केला नाही तर तीला नवरा मारहाण करी पण माझ्या नशीबी वेगळाच प्रकार लिहिला होता.अभ्यास नाही केला म्हणून मी मार खाल्ला.वयाच्या १४ व्या वर्षी मला मुलगा झाला. पण वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तो वारला. मी दुःखी झाले.ही मात्र माझ्या आयुष्यातली महत्वाची घटना. या घटनेनंतर मी डॉक्टर व्हायचे ठरवले.ह्यांनी लोकहितवादींची शतपत्रे वाचली होती. त्यांचे विचार पुरोगामी होते. स्त्रीयांनीही इंग्रजी , संस्कृत शिकावं या विचारांचे ते होते. माझी अभ्यासातली गती पाहून ह्यांनी माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत प...
- Get link
- X
- Other Apps
चैत्रगौरीस पत्र - सौ. स्वरूपा कुलकर्णी प्रिय गौरी, तुझ्या शुभागमनाने मन परत आनंदाने बहरून गेले. तुझी पावले माझ्या अंगणातुन घरात उमटली नी मन खरंच टवटवित झाले.सळसळतं चैतन्य घरादाराला आले. किती प्रतिक्षा तुझ्या आगमनाची! ही अवस्था तर दरवर्षीचीच गं.त्या कैलासाधिपती शंकरांना सोडून माहेरी मनसोक्त विश्राम करायला येतेस.माझ्या संसाराला काय हवं काय नको ते पहायला तू येतेस. हिरवी साडी, ठसठशीत कुंकू, लांब वेणी, कमनीय बांधा, नाजूक हात, सुंदर पावले अशी तू सोळा श्रृंगार करणारी गौराई माझ्या घरी विश्रांतीसाठी येतेस.आल्या आल्या सुगंधी तेल लावून,उटणे लावून अभ्यंग स्नान करतेस.त्या तूला स्नान घालतांनाचे तुझे माझे संवाद कितीतरी वेळ चालतात.माझ्या मनोराज्यात तूझे स्वागत होते. तू गोड खिरापत, दुध-साखरेचा नैवेद्य भक्षण करतेस.मी मनोभावे केलेली आरती तू हसतमुखाने स्विकारतेस.गार माठातलं,सुगंधी वाळ्याचं पाणी पितेस, कच्ची कैरी चवीने खातेस, मोगऱ्याचा गजरा केसात माळतेस, सुगंधी अत्तर हौशेने लावतेस. मधुनच घरातल्या पिल्...
- Get link
- X
- Other Apps
पाखरू सौ.स्वरूपा कुलकर्णी उन्हाच्या काहिलीत पानंही हलेना उष्ण झळ्या त्या जीवा सोसवेना अशा गरम दुपारी कुठूनसे अवचितं निळे पाखरू आले अंगणी नकळतं मनी हर्षले किती सुंदर रंग त्याचे कुठून आले भर दुपारी अंगणी ते.. शोधित पाणी नजर त्या जीवाची गेली अवचित अंगणात बादलीशी क्षणार्धात झेपावली काया त्याची आकंठ प्यायला जल तृप्ती त्या तृषेची मग करूनीया किलबीलाट स्वतःशी हिरवी पाने हसली पाखरा पाहुनी तहानलेल्या जीवा मिळाला दिलासा पाहुनी मोगरा झाला सुगंधी केव्हडा तशातच आला जवळूनी स्वर माझ्या खांद्यावरी बसुनी गायला पक्षी वेडा निळ्या चोचीतुनी गायला सुखाने धन्यवाद दिले मला जणू पाखराने
- Get link
- X
- Other Apps
हळदी-कुंकू ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी मकर संक्रमण उत्सव म्हणजे गोड गोड तिळ-गुळ खाण्याचा व लुटण्याचा सण! लहानग्यांनी पतंग उडवण्याचा सण तर आम्हा बायकांसाठी तर निव्वळ आनंद सोहळाच जणू! चांगला महिनाभर चालणाऱ्या ह्या सणात हळदी- कुंकवाचे आमंत्रणं स्विकारणे व घरीही मैत्रिणींना बोलावून हास्य फवारे उडवणे हा जणू परिपाठच! हिची साडी कशी, तिची साडी कशी, हिचे ब्लाऊज कोणी शिवले ते हिचा मेक अप लई भारी पर्यंत नानाविध चर्चांना ऊत येतो. बायकाच त्या ऐकणार का कोणाचं?.छोट्या गावांमध्ये हळदी कुंकवाची वेगळीच मजा असते. बायका मनमुराद हास्स्यकल्लोळात वाण लुटतात व आपल्या सौभाग्यासाठी रोज नवनविन शृंगार लेऊन सजतात. किती हौशीने रोज नव्या घरी आमंत्रणं स्विकारत आपल्या मैत्रिणीचे कौतूक, तिची सजावट बघायला जातात. जगणं खरंच किती तिळ- गुळासारखं गोड आहे हे हसत खिदळत स्विकारतात. नाव घे , नाव घे करत मैत्रिणीला चिमटे काढतात. माझा नवरा किती प्रेमळ आहे हे सांगण्याची लाजरी खूण म्हणजे उखाणा ! सण सौभाग्याचा पण घरात नवरा नको अशी काहितरी विचीत्र अवस्था होते पहा आम्हा बायकांची. अहो का म्हणून काय विचारता ...
- Get link
- X
- Other Apps
प्रेमाच्या गावा जावे.. ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी मनाच्या बंगल्यात अनेक अडगळीच्या खोल्या असतात. काही सुंदर, निटनेटक्या, आवरलेल्या तर काही अस्वच्छ, गलिच्छ, घाणेरड्या. व्यक्तिपरत्वे त्या जागा वेगवेगळ्या रंग रूपाने नटलेल्या. मनातल्या जागांची खासियत ही की डोळ्याने पाहिलेले, ग्रहण केलेले तसेच पंचेंद्रीयांनी अनुभवलेले भावविश्व फार सखोल टिपत रहाते. स्मृतींच्या रंगीत कपाटात बंद होते. स्वच्छ, सुंदर , पवित्र असं सापडलं की माणसाची अनुभूती सुखद होते. तेच वाईट आठवांनी मन दुःखीही होते. रंगबिरंगी आठवणींच्या खोल्या बालपण,तारूण्य, प्रौढावस्था अशा मानवी जीवनाच्या टप्प्यांचा कोलाज सांभाळत पुढे पुढे जात रहाते. पण काही स्मृती इतक्या जबरदस्त गोंदलेल्या असतात की मन त्या आठवणी समोर आल्या की तिथेच थांबून जाते. काही केल्या पुढे जात नाही. जणू त्यावेळी काळ थांबून जातो. प्रेम, द्वेष, राग, अपमान, मोह, हत्या, अपघात अशा काही गोष्टींचा मनावर विलक्षण परिणाम होत रहातो. त्या जखमा विसरता विसरत नाही. जगण्याचे कितीही टप्पे पुढे गेले तरी मन तिथेच घोटाळत रहाते. का होते असे?मानसशास्त...
- Get link
- X
- Other Apps
कृष्णप्रिती -सौ. स्वरूपा कुलकर्णी निळसर जळात झुकते आभाळ काळे सावळे, जणू रजनीने सोडले हलके केस तिचे मोकळे मधुनच वारा मंद शांत तो सहजच पाती हलवी, संथ लयीतुन दीर्घ क्षणांनी पावा स्वर आळवी निरांजनीला सूर गर्भित अंगणात स्निग्ध पोचवी, नितांत सुंदर कृष्णमंजिरीला जणू काही सुचवी रात्रीचे ते सुर अनामिक चंद्र नभातुनी गहिवरतो, रुसलेल्या राधेला पहाण्या कृष्ण जळांत उतरतो ती उभी भरूनी घागर यमुना काठी मुग्धं, हसले चिरंतन स्वप्न जगाचे तिच्या समोरी धूंदं तिला पाहुनी कृष्णमुरारी झाला अतीहर्षित, रुसवा क्षणात विसरूनी राधा मिठीत त्याच्या धुंद पुनःपुन्हा तो पाही तिजला अतिप्रेमाने स्नेहाने, तिही विसरून रूसवा सारा प्रितीने बावरे राधा लाजे अती प्रेमाने कृष्णसख्याच्या येण्याने, पाहुनी सुखद दृश्य साजिरे जग सारे मोहिले यमुनेच्या तीरावर झाली कृष्णसख्याशी भेट, पावा अजुनी घुमत रहातो गीत प्रितीचे सार्थ मन्मथ ह्या संपूर्ण सृष्टीचे राधा-कृष्णात गुंफते, जीवाशिवाचे ऐक्य इथे दृश्यमान होते