ढळलेली सांज....
©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी
सांज ही वितळली धुंद त्या डोंगरात गं
निशा काळी सावळी सावरी आता पदर गं
रंग धुंद संध्या सावळी बिलगली किरणास गं
आवरूनी पसारा केशरी किरणे घेती निरोप गं
लेवूनी साज चंदेरी निशा आली पटलावरी गं
शशि साजिरा पुनवेचा पश्चिमेस आला गं
किती देखणे क्षण सुगंधी घेऊनी मन्मथ पुनवेचे गं
निशा चंद्र युगूल बागडे धुंदं प्रणय भरजरी गं
चांदणे पुनवेचे सांडते प्रतिबिंबं निळ्या डोही गं
अवनीवरही घडे काहीसे धुंद युगूल एकांती गं
Comments
Post a Comment