Posts

Showing posts from January, 2024
 *मर्यादा पुरूषोत्तम*  ।।जय श्री राम।। - सौ. स्वरूपा कुलकर्णी धन्य धन्य तू सीतापती  कौसल्यासूत रामा। करीतो नमन तूज चरणी  ह्रदयी प्रेम दे रघुत्तमा।। तू विशालबाहू त्रिकालदर्शी वनवास तो भोगिला। धन्य रमापती तुम्ही दाविली वचननिष्ठा जगाला।। राम लक्ष्मण सवे जानकी केला प्रपंच घोर वनी। नाही झाले उद्विग्न कधिही जीवन भरले दुःखांनी।। जनकनंदिनी सीतामाता रावणाने पळविली। दुःखी राम गाळी अश्रू प्रिय जानकी साठी।। राम करी युद्ध तुंबळ रावण रणी पाडला। जिंकून लंका जय लाभला सीतापती शोभला।। अग्निपरिक्षा सीतेची जरी राम जाणतो अंतरी। सीता माझी शुद्धच आहे नाही कलंक तिजवरी।। मर्यादा सारी चरित्र अवघे रामप्रभू मनी जाणती। लोकांसाठी अग्निपरिक्षा सीतापती करवी।। मग परतती राम तेंव्हा अपुल्या अवधपुरीसी। दशरथनंदन राम जाहला राजा अयोध्यापती।। मारूतीसवे वानरसेना राही रामापाशी। राम करी राज्य सुखाचे राजा रघुराई।।
 ।।जय श्री राम।। ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  राम माझा प्रिय राजा रघुराम। प्रेममुर्ती भक्तचित्त सुखधाम।। राम हा माझा शांतमूर्ती प्रेममुर्ती। करी सदैव प्रेमाची कृपावृष्टी।। राम भक्ता सोडवी सर्व दुःखातूनी। सांभाळी सर्व भक्ता प्रतिदिनी।। राम भक्तांचा सदैव पाठिराखा। आनंदाचा कंद श्रीहरी माझा।। रामाला ना प्रिय हिरे ना मोती। त्याला प्रिय भक्त ह्रदयीचे प्रेम मनस्वी।। राम यावा जीवनी राम क्षणोक्षणी। उद्धरी जीवा तो नेऊनी सुखधामी।।  राम हा ह्रदयी भक्ता देई सुख सारे। न पडावे अंतर रामा तुझ्या माझ्यात रे।। राम राम सदैव राम रामच स्मरावा। क्षण येईल तो मुक्तीचा अद्वैताचा रामाचा।।
 राममय होऊ सगळे.. -सौ.स्वरूपा कुलकर्णी     राम ही दोन अक्षरांची जादू किती अद्भूत आहे हे आपण सगळे रोज अनुभवत आहोतच.राम ही देवता जनमानसात एव्हडी लोकप्रिय व लाडकी का आहे ह्याचा थोडा खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की रामाचे चरित्रच इतकं सकस , इतकं ह्रदयाला भिडणारं आहे की जनमानसात त्याने निर्माण केलेला आदर्श आजही व उद्याही अंतिम शिखरटोक आहे.हे टोक म्हणजे न्यायाचं, नीतीचं, पराक्रमाचं, सहिष्णूतेचं, प्रेमाचं, मानवतेचं,दिव्यत्वाचं परमोच्च बिंदू स्थान आहे.राम नाम घेणे सोपे पण आचरण रामासारखं असायला आपल्याला किती सायास करावे लागतील? मला तर ते सर्वथा अशक्यच वाटतं...    राम म्हणता म्हणता राममय व्हावं, भक्ती प्रेमाने त्याचं जीवलग होऊन जावं अशा भावना मनात उचंबळत असतात..राम कथा ऐकतांना तर अश्रूंची संततधार लागते.बालवयात अनेक सुंदर लीला करणारा राम,भावंडांवर विशेष माया व प्रेम करणारा सालस राम,लहान वयातच गुरूगृही जाऊन वेद वेदांत ग्रहण करणारा राम,लहान वयातच विश्वामित्रांच्या आदेशानुसार निर्भिडपणे वनात जाणारा राम, सीता स्वयंवरात अत्यंत नम्रतेने गुरू आज्ञेनुसार शिवधनुष्य सहज ...
 दासबोध - मला भावलेला  सौ.स्वरूपा कुलकर्णी अध्यात्म म्हटलं की खूप जण हा काहीतरी बोजड, अवघड विषय असावा असे समजून खूपच दूर होतात.तर काहींच्या मते हा Retirement नंतरचा उद्योग! पण खरचं याचा अभ्यास केलात तर कळेल हे तर साधं दैनंदीन आयुष्याचं गणित होतं. लवकर कळलं असतं तर चुका सुधारता आल्या असत्या.  समर्थांचा दासबोध हा असाच एक अध्यात्मिक ग्रंथ..अगदी आजच्या भाषेत सांगायचा तर प्रॅक्टिकल गोष्टी करायला सांगणारा मार्गदर्शक वाटाड्या आहे. श्रोते पुस्ती कोन ग्रंथ । काय बोलिले जी येथ। श्रवण केलियाने प्राप्त।काय आहे।। समर्थांनी दासबोधाची सुरुवातच या ओवीने केली आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही नविन वस्तू हातात पडल्यावर ती काय आहे, ती उघ‌डून पहाता येईल का १, तीचा उपयोग काय ? असे प्रश्न सर्वाना पड़तात. तसेच या ग्रंथाची खासियत ही की सुरुवातीलाच समर्थानी स्वतःच प्रश्न उभा केला आहे की हा कोणता ग्रंथ ? यात काय लिहिलय ? याच्या श्रवणाचे फायदे काय ? बघा, समर्थानी दूरदर्शीपणे पूढच्या पिढ्यांसाठी घ्या ग्रंथाची रचना केलेलीदिसते.  दुसरी ओवी लगेच घ्या प्रश्नांची उत्तरे देतांना समर्थ म्हणतात- ग्रंथा नाम दास...