Posts

Showing posts from 2024
 जय सद्गुरू🙏🏻  सौ स्वरूपा कुलकर्णी     सद्गुरू ही साधकाच्या जीवनाला पूर्णत्व देणारी माऊलीच असते. प्रपंच करणाऱ्याला त्याचे जन्म देणारे माय बाप हे सर्वस्व वाटतात. पण साधकावस्थेत सद्गुरू हेच साधकाचे खरे माता पिता असतात. सद्गुरूंच्या वात्सल्याने साधकाचे सर्व पोषण होते. साकुरीत सद्गुरू श्रीउपासनी बाबांच्या मायेच्या छत्रछायेखाली अनेक कन्यांनी आपले साधक जीवन समर्पित अवस्थेत जगून जगासमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहे.         अशा समर्पित कन्यांपैकी श्री कन्याकुमारी सती गोदावरी सती लीला ताई यांचे  स्मरण होते. त्यांनी देह ठेवला व त्या सद्गुरूचरणी लीन झाल्या. त्यांना प्रत्यक्ष बघता आले, सहवास घडला हे मी माझे सौभाग्य समजते.           सती लीलाताई या श्री उपासनी बाबांच्या शेवटच्या सत्शिष्या.श्री बाबांनी स्वतः देहावस्थेत असताना ज्या शिष्यांना अनुग्रह दिला त्यापैकी सती लीलाताई या अतिशय चिकाटी, समर्पित वृत्ती, गुरूगृही कठोर परिश्रम, साधकाची त्यागवृत्ती, विवेक वैराग्य, तप, अध्यात्मिक ग्रंथांचे पठण व तीव्र स्मरणशक्ती ह्या सद्गुणांची खाणच...
 स्वागत दिपावलीचे.. ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी       मंडळी, काय म्हणता?  झाली का दिवाळीची तयारी? आवराआवरी झाली का? आणि हो फराळाची तयारी झाली का? नक्कीच झाली असणार! हो ना?     संपूर्ण वर्षभरातील सर्वांचा सर्वात आवडता व मोठा सण म्हणजे दिवाळी. मग उत्सवात काही कमी नको म्हणून जोरदार तयारी होते. काहींची कपड्यांची शॉपिंग, मग ऑनलाईन नाहितर ऑफलाईन.. त्यात प्रत्यक्ष खरेदीचा आनंद लुटणारी मंडळी रसिकच म्हणा, सहसा ती गंडवली जात नाहीत😃, जुना आकाशकंदिल धूळ झटकून नव्यासारखा होस्तर फडके मारून साफ झालेला असतो😄, किंवा जुना फारच खराब झालाय म्हणून नव्याचे आगमन, त्यावर घरच्यांमध्ये बरीच चर्चा😀, दिवाळी आहे म्हणून नविन वस्तुंचे घरात आगमन 😍, यावर्षी साडी नको म्हणता म्हणता २-३ साड्यांची खरेदी 😄, मुलांमध्ये नविन गॅजेटसाठी बाबांना मस्का लावून गळ घालणे 😄, मुली व गृहिणींचे रांगोळ्यांचे विविध डिझाईन्स मनात घोळवून ठेवणे, काही घरात नविन कार खरेदी किंवा मोठ्या वस्तूंची खरेदी, नविन प्रॉपर्टीची खरेदी अशा अनेकानेक गोष्टी म्हणजे दिवाळी!     किती किती लक्ष दिवे स्वतः...
 #कोजागिरी -सौ. स्वरूपा कुलकर्णी       आकाशीच्या चंद्र चांदण्यांचा खेळ रोज रंगतो. रोजची रात्र विविध गमती जमतींनी भरलेली असतेच. पौर्णिमेला चंद्र पूर्ण तर अमावास्येला गायब अशा लपाछपीचा खेळ होतच असतो. चांदण्या आपल्या नित्य चमचमणाऱ्या झग्यात लुकलुकत असतात. संध्याराणीच्या परसात रजनी येते नी दोघी एकमेकींना इतक्या कडकडून बिलगतात की संध्या रजनीतच एकरूप होते.अशी ही रजनी रोज आपल्या आकाशाच्या प्रांगणात रममाण होते.      पण मंडळी, कोजागिरीची रात्र मात्र वर्षभरातील सर्व रात्रींहुन निराळी. कारण ह्या रात्री रजनी आपल्या पूर्ण श्रृंगारात प्रियकराच्या स्मरणात मुग्ध होत असते. तो प्रियकर म्हणजे अर्थातच चंद्रदेव.. आकाशातल्या भव्य पोकळीत रजनीच्या संगे आपल्या पूर्ण कलांनी विकसित झालेला चंद्र असंख्य ताऱ्यांशी रासक्रीडा करत असतो.    कोजगिरी किंवा शरद पौर्णिमा म्हंटलं की कृष्णाने राधा- गोपिकांशी खेळलेला महारास आपण कोणीच विसरू शकत नाही. कृष्णं म्हणजे तो १६ कलांनी विकसित चंद्र तर चांदण्या म्हणजे राधा व गोपिका. हा महारास रात्रभर रंगतो.चंद्रकिरणांचे अमृतपान सगळेच करतात व...
 पाऊस ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी वाटा चिंब हिरव्याओल्या डोंगर-दरी हिरवी सारी, ऋतु श्रृंगारतो दश दिशा धरा ल्यायली शालू वेडी... वाटा नागमोडी नदीच्या वारा वाहे, जळ हाले, मधुनंच पिवळी फुले हळदीचे रान झाले.. निळा मयुर नाचतो पावसाच्या सरी येतांना, पावसाने नाद भरतो सरी धूंदं गातांना... तहान भागते सारी धरतीची पाडसांची, होडी मधुनच गीत गाते मधूर प्रेमाची सौख्याची.. मेघ तृप्त पाहूनी धरा तृप्त ही सारी पायवाटा दूर नेती प्रियेसह सांजवेळी... पक्षी चोचित भरती दाणे कोवळे पिकातले गीत पावसाळी येई ओठी तुझ्या माझ्या प्रितीतले..
 पावसातले प्रेम ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी तू पावसाळी गीत गाशी मी धुंद तव आठवांशी घट्ट लपेटून तूला घेते प्रेमगीत मज ओठी... स्पर्श तुझा चिंब ओला मनी मानसी चिंब ओली कधी भेटशील सजणा मी प्रिया तुझी स्पर्शवेडी.. होई सांजं धुंद मस्तं मी व्याकूळ तुला शोधी तू गेला निघून दूरदेशी माझी राहिली जुनी गाणी तूझ्या स्पर्शास आतुरं मी भाबडी रे हरिणी तुला शोधते पावसांत कधी लपेटून घेशी.. माझा राजा तू भोळा मी राणी तुझ्या स्वप्नांची किती अंतं पहाशी आता आसावला जीव भेटीसाठी.. मी बावरे क्षणोक्षणी तु अजुनका नं येई विसरू नको प्रियेला मी आर्त विरहवेडी..
 ऋतु पावसाळी ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी रिमझिम पावसाच्या झिम्माड सरी येती, आसावली रे धरा चिंब भिजते सारखी रंग बदलती ढगांचे रंग काळानिळा होई, मधुुनच विजा चमकून खाली येती वारा कुंदं मंदं धुंदं पक्षी कोटरात गेली, मातीच्या सुगंधाने दिशा दरवळल्या दाही येतो पाऊस घेऊन नवी आशा नवी उर्मी, माझ्या शेतात अंकुरती बीजं सोनेरी पोपटी उद्या पिकेल शेतात बीज नवे सोनियाचे, मी वेचिन क्षण सुखाचे आनंदाचे भरलेले
 हे मात्र खरय कोऱ्हाळकर आणि शिक्षण क्षेत्र  पहिल्या पासून बघितले तर  श्रीमान मोहनिरज दादा नंतर श्रीमान वासंतकाका ,श्रीमान भालचंद्र काका यांनी KJS कॉलेज ला 7 येकर जमीन देऊन कॉलेजची स्थापना केली , अनेक मुले कोऱ्हाळकर ट्रस्ट अंतर्गत मोफत शिक्षण घेत आहेत , नंतर श्रीमान R G कोऱ्हाळकर यांनी श्रीमान गोकुळचांदजी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द गाजवली आणि शाळेला एक प्रकारचे नावलौकिक मिळऊन दिले ,शिस्त कशाला म्हणतात हे शाळेला दाखऊन दिले  त्या नंतर श्रीमान दिगु काका उर्फ D G कुलकर्णी कोऱ्हाळकर यांनी शाळेची भरभराट करत , शिक्षण आणि शाळेतील सर आणि विद्यार्थी नाते दृढ केले , शाळेचा विकास केला , त्या नंतर मकरंद कोऱ्हाळकर हे मुख्याध्यापक झाले यांनी शाळेची उंची ही खेळातील विकासा कडे नेत शाळेला अनेक बक्षिसे मिळऊन दिले ,अनेक स्पर्धा मध्ये विद्यार्थी ना सहभागी करून शाळेची गती अभादित ठेवली , त्या अगोदर 1972 सालि ज्या वेळी स्त्रिया नोकरी करता बाहेर पडायला लागल्या त्याची सुरुवात श्रीमती मालती विष्णू कोऱ्हाळकर यांनी ज्ञानप्रबोधिनी शी शू विकास शाळेत सेवा देऊन अनेक विद्यार्थी वर संस्...
 पुस्तक परीक्षण  सौ. नम्रता संजय कोरडे. "मन मोगरा मोगरा "हे पुस्तक सौ.स्वरूपा कुलकर्णी ह्या नवोदित लेखिकेचे पहिले पुस्तक आहे, वाचता वाचता जसे पुढे पुढे वाचत जातो, जणू आपण रिकामी परडी घेऊन बागेत शिरतो आणि आणि एक एक फुल तोडून परडीत टाकत जातो त्याप्रमाणे एकानंतर एक लेख वाचत जाताना भासते. संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे सुगंधी मोगऱ्याची परडी भरून असल्याची जाणीव होते. हे मी स्वतः वाचताना अनुभवले. लेखिकेने लेखनामधील वैविध्य जपले आहे. ह्या पुस्तकाला अध्यात्मिकतेची सुंदर किनार आहे. भक्ती चा हळुवार स्पर्श आहे. राम,कृष्ण, सरस्वती, सद्गुरू ह्यांचे विविधतेने नटलेले वर्णन वाचताना मन भक्तीरसात बुडते. सात्विकतेने सुंदर रेखीव नक्षीकाम केल्यासारखे लेखन आहे. भावनांचा सूर अतिशय नाजूक रेशीम धाग्यांनी गुणगुणला गेला आहे. लेखनातील निर्मळ आणि शुद्ध उस्फुर्त विचार त्या पुस्तकातील प्रत्येक लेखाला सौंदर्य बहाल करते आहेअसे वाटते.लेखिकेच्या मनातील भावना तीचा स्वभाव ह्याचे दर्शन लेखनातून घडते. निसर्गातील पानांफुलांच्या वेगवेगळ्या छटा रेखाटताना निसर्गप्रेमी लेखिकेचे भाव जाणवतात.तसेच पहिली परी,ऋणानुबंध...
 विठू तुझे चरणी माझा राहो निर्मळ भक्तिभाव तुजविण न दिसो काही राहो आजन्म एकरूप मी तू ची न व्हावी बाधा संत संग देई सदा तुजवीण आस नाही भेटी दे लवलाही विठ्ठल विठ्ठल गजर राहो मनी ध्यानी स्वप्नी एकतारी जैसे बोले तैसे राहू एकनामी  नको प्रपंचाची चिंता नको आस मायेची तूझ्याच पायी राहूदे माझी मती ही सारखी जगाचा कैवारी तू नाथा होवू दास तुझे चक्रपाणी उन्मनी होत आहे आता न दिसे तुजवीण काही जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसे हरी उभा दशदिशांतही पुजायाला तूला देवा आता उरलो न मी झालो हरी
 नमस्कार,  प्रिय शब्दसखी सौ. स्वरूपा सुबोध कुलकर्णी  "ती अशी घडली "  साधारण चार वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवात माझ्या शेजारी एक उंच, गोरीपान, सडपातळ, सुंदर, हसतमुख व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते,गोऱ्यापान देहावर गडद रंगाची साडी खूप शोभून दिसत होती. चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिच्या शालिनतेची साक्ष देत होता. सगळ्यांशी गोड आणि शांतपणे बोलण्याने तिचे पावित्र्य आणि निर्मळ मन डोकावताना दिसत होते. तिथे आमची ओळख झाली. हीच ती स्वरूपा कुलकर्णी.       अतिशय संस्कारक्षम आणि अध्यात्माचा गाढा पगडा असलेल्या दीक्षित कुटुंबात कुमारी स्वरूपाचा जन्म झाला. आणि" पहिली बेटी धनाची पेटी "ह्या उक्तीप्रमाणे घरात लक्ष्मीची पाऊले उमटली. आजोबांच्या शिकवणुकीतून स्वरूपा वाढायला लागली.      तिचा जन्मछत्रपती संभाजीनगरचा,माहूरची "रेणुकामाता" ही त्यांच्या घरची कुलदेवता .म्हणून रेणुका प्रदीप दीक्षित.तिच्या अगोदर तिच्या आईला एक लहान मुल होऊन ते पंधरा दिवसातंच वारलं...न्युमोनियामुळे,  आणि  त्यानंतर स्वरूपाचा जन्म झाला.त्या...
 वाढदिवस - सौ. स्वरूपा कुलकर्णी      आज तिथीनुसार माझा वाढदिवस. आज चाळीसाव्या वर्षात पदार्पणहोत आहे. आज विचार करतांना सहज मागे वळून पहीले, खरंच किती सुख- दुःखाचे सोहळे अनुभवले. म्हंटलं तर आजवरचे आयुष्य सहज सुंदर होते. काही अपवादात्मक कटू प्रसंग सोडले तर माझ्या वृत्तीत सद्गुरूकृपेने समाधानी आयुष्य लाभले. रामाशी व कृष्णाशी सख्य करता आले हे या आयुष्यातले पारमार्थिक फळ! तीच माझी जीवनभरची सार्थकता!        जगणं समृद्धं करणारे अनेक सुरेख प्रसंग लाभले. माझे बालपण, प्रेमळ, सात्विक आई- बाबा, आजोबा, त्यांचे संस्कार, माझे शालेय आयुष्य,अनेक  बक्षिसं , प्रमाणपत्रं, मैत्रिणी, सर्वात महत्वाचे शिक्षक, कॉलेजजीवन, तिथले प्राध्यापक, पहिला जॉब, तोपण मुंबईतला, नंतरचे कडू गोड अनुभव, लग्नं, नवरा, सासर, घर वितक घेणे,पहिलं अपत्य मुलगी, ओवीच्या येण्याने लाभलेली कृतार्थता, नंतर तिन वर्षांनी आर्याचा जन्म, त्यांचं बालपण, शाळा , माझे लिखाण, बक्षिसं, प्रमाणपत्रं, लोकसंग्रह, आध्यात्मिक प्रगती( अनुभवी व ज्येष्ठांमुळे लाभलेली), किती गोष्टी सांगाव्यात..एकुणच जगण्याचं मर्म आता उ...
 विघ्नविनाशक मंगलमुर्ती मोरया🙏 ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी           वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ।     निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।      संपूर्ण विश्वाचा निर्माता, विद्येचा अधिपती, बुद्धीची देवता, सर्व विघ्नांचे निवारण करणारा विघ्नेश, सर्व कलांची निर्मिती करणारा कलाधीश  अशा मंगलमुर्ती गणेशाचे शुभागमन होत आहे. त्याच्या कृपेने समाजात चाललेल्या अपप्रवृत्ती नष्ट होवोत, सर्वत्र सुख, समाधान व शांती नांदो ही मोरया चरणी प्रार्थना🙏        हे संपूर्ण विश्व ज्या प्रणवातुन उत्पन्न झाले त्याचे साकाररूप म्हणजे श्री गणेश. हा गणेश समस्त ब्रह्मांड व्यापून उरलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनीही फार सुंदर शब्दात त्याचे यथोचित वर्णन केले आहे.       ओम् नमोजी आद्या।       वेदप्रतिपाद्या।        जय जय स्वसंवेद्या।       आत्मरूपा।।      ज्ञानेश्वरांनी हे आद्य तत्व, वेद जिथून निर्माण होतात ते स्थान, स्वसंवेद्य  तत्वाला गणेश म्हणून...
 #अक्षरधनकाव्यस्पर्धा कवितेचा विषय- श्रावण शिर्षक- श्रावणधारा घन निळे श्रावणातले भाव गहिरे सांजओेले कुठून येते ही अवचितं झुळूक मृदगंधी हलके... पश्चिमेत मेघांची दाटीवाटी रंगली मधुनच केशर-पिवळी रवी हरपला सांजडोही निशा हलकेच चाहूल देई... रंग गंधांचा मेळ सुगंधी हवेत अवघा दाटून जाई गार वारा मधुनच आता सांज कलंडते ठायी ठायी..... आस्मानीचा द्याया निरोप वीजबाई लखलखली न्यारी दिशा धुंद त्या; वाराही मंद आसुसलेली ही धरा सारी... कडकडती वीजा मेघही सज्ज वर्षाव अमृताचा होई प्रचंडं  चातक आतुर तृषा भागवी सारी सृष्टी भिजली निवली.. अविरत गाती श्रावणधारा गीत धरतीचे मांगल्याचे नववधू ही जणू नहाते मुक्त बावरी आनंदाने..... कवयित्रीचे नाव- सौ. स्वरूपा कुलकर्णी ठिकाण- राहाता, जि.अहमदनगर
 सद्गुरूकृपा ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी      ज्याला ईश्वराविषयी कुतूहल आहे त्याने नक्की सद्गुरूंकडे जावं. खरं तर सद्गुरूच अशा मुमूक्षाकडे वाट काढत येतात. कारण, मी संसाररूपी मायाबंधनात आहे हे आधी ज्याला जाणवते त्याच्यावरच सद्गुरूकृपा होते.      जग क्षणभंगूर आहे, इथे मिळणारं सुख असो वा दुःख दोन्हीही क्षणापुरतेच. या जगात असलेल्या प्रत्येक वस्तूचा एक ना एक दिवस नाश होणार हे नक्की. जगात होऊन गेलेल्या मोठमोठ्या विभूतिही काळाच्या ह्या विशाल पडद्याआड निघून गेल्या. मग शेवटी उरणार काय ? तर काहिच नाही. फक्त एकच एक परब्रह्म !! जे डोळ्यांनी दिसत नाही पण ते सर्वत्र व्याप्त आहे. कणा कणात आहे. स्वयंभू आहे. त्याचा कोणी मालक नाही. त्याला जन्म नाही, म्हणून मृत्युही नाही. तो अव्यक्त, सनातन, सर्वांचा मायबाप असा सर्वशक्तीमान, सच्चिदानंदघन परमात्माच कायम रहातो. हे आत्मानुभूतीद्वारे ज्याक्षणी साधकाला कळते तत्क्षणी चर्मचक्षूंशिवाय ज्ञानचक्षूद्वारे आत्मा हाच परमात्मा हे तत्व लक्षात येते. परमात्मा गुप्त आहे किंवा रहस्य आहे हे संसार मोहपाशात अडकलेला बद्ध जीव म्हणेलच. पण सखोल चिंतन...
 अस्मिता वहिनी.. - सौ.स्वरूपा कुलकर्णी    आज सहज लग्नातले फोटो चाळतांना हा फोटो दिसला. पाहताच लग्नातले दिवस आठवले. मुळात या फोटोत डावीकडून दुसरी ती माझी चुलत मोठी जाऊ- अस्मिता वहिनी.तिला जाऊन आता ५ वर्षं झाली.तिच्या आठवणीने भुतकाळात गेले.अस्मिता वहिनी म्हणजे माझ्या सासरची सर्वांची लाडकी सून.अतिशय हुशार,कर्तबगार,प्रेमळ अशी सदा हसरी नी बडबडी वहिनी.ती डोंबिवलीत रहायची.      माझं नविन लग्न झालं तशी लग्नातही तिचा वावर सुखावहं होताच पण लग्न झाल्यावर पहिल्या गृहप्रवेशापासून ते आमच्या जागरण गोंधळांपर्यंत वहिनीची लगबग व उत्साहाने सगळ्या कामात पुढे असण्याचा स्वभाव वाखाणन्यासारखाच होता.       माझ्या गृहप्रवेशाला तिने केलेली गृहसजावट आजही लक्षात आहे. वहिनीने खास डोंबीवलीहून जर्बेरा, गुलाब, शेवंतीची फुले आणली होती. माप ओलांडतांना मी घेतलेला उखाणा सर्वांना आवडला.तेंव्हा अतिशय आनंदाने सर्वांनी माझ्यावर व सुबोधवर पुष्पवर्षाव केला.आत प्रवेश करताच आपण कोणीतरी सेलिब्रीटी आहोत अशी वागणूक मला मिळाली.नंतरचे ४-५ दिवस घरात तिचा चैतन्यामयी संचार होता. ती तिच्या मनमोक...
 कृष्णं .. ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी कृष्णगंध हवासा, दरवळ चोहिकडे.. रानातं राधा, शोधे जेथेतेथे... भोवती निळा प्रकाश अनोखा... ती  भान विसरून जाई... येई बासरीचा नाद उत्कट... राधा दंगं होई भाववेडी.. थांबली बासरी, चराचर थांबले.. कोटरात  शांतता, पानंपानं थिजले.. ती बैचेनं तो अदृश्यं... कान्हा गेला जग स्तब्धं... तिची पापणी भिजे अविरतं.. राधा आर्त कृष्णं नसे.. प्रतिबींबं जळातं दर्शन झाले राधा नाही कृष्णं कृष्णं..
 *नववधू आम्रतरू*  सौ.स्वरूपा कुलकर्णी हिरवा हिरवा शालू जणू अंगभर ल्यायली, हिरव्या आम्रतरूची ही नवरी कशी सजली जर्द हळदी पिवळे ऊन माखले सर्वांगाते, रूप तरूण साजिरे नखशिखांत खूलते  पाना पानांवर सजली मेहंदी बारीक नक्षीची, पर्णसंभार डूले वाऱ्यासवे जणू नवरी लाजली अंगभर हिरवा शालू साजरे रूप आम्रपल्लवांचे, आकाशाशी लागले लग्न भर पावसात तीचे चमचमली पाने हिरवी पावसाने चिंब नाहती, नवरी अंगभर शहारते लागली टाळी रानावरती सनई चौघडे वाजती मेघ बरसती चोहिकडे, क्षणात लागले लग्न निळ्या अवकाशाशी तिचे नववधूला भेटायाला वारा घाली मधुनच पिंगा, आकाशीचा रविराजा देई आशिष नववधुला वर्षाराणी घेऊन येई आहेरांच्या लक्ष सरी, नववधू लाजून चूर होई जडले नाते आकाशाशी गार वारा असा शहारा नवदांपत्य खुलून जाई पावसाळी ऋतू ओला नववधू चिंब होई
 #पावसाळा ©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी मनी दाटते काही  थेंब वेडे बघतांना घालती मण्यांची माळ हिरव्यागर्द पानांना.... निळा भरला मेघ करतो भूई ओली तिच्या कुशीत अंकुरते नवनिर्माणाची असोशी... तो मिट्ट काळोख येतो घेऊन वीजेची नक्षी आभाळ व्यापते सारे पक्षी घरट्यात बावरती... घनगर्द काळोखातं धरा निःशब्द गीत गाते तिच्या तनमनात वाऱ्याचे बोल हलके... नदीच्या कडेकडेने तांबूस जाग आली कळी जागली हलकेच अतृप्त निशा ओसरली... तो हलकेच हटला तेथे किर्र दाट काळोख दिशा उजळून जाती प्रतिबींब दिसे पात्रात... आसमंत झाले स्वच्छ दिशा झाल्या मोकळ्या गारवा घाली सादं पावसाळा सुरू झाला...
 "अव्यक्त भावनांचं पत्र"  लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी        प्रिय तीर्थरूप दादा(आजोबा),             साष्टांग नमन.          मला आज खूप मनापासून वाटलं की ती व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांच्याशी मनातलं खूप काही बोलायचं राहून गेलं.मी तुमच्याशी कधिही बोलू शकले नाही ते बोलणार आहे.देवाच्या कृपेने तुम्हाला ९२ वर्षाचे खूप मोठे व चांगले आयुष्य लाभले.तुमची देवभक्ती, सद्गुरूनिष्ठा फळाला आली व एकादशीलाच तुम्हाला मुक्ती मिळाली.मी तेंव्हा फार मोठी नसले तरी हे कळण्या इतपत मोठी होते की तुम्ही वैकुंठाला गेले...जणू देवानेच तुम्हाला बोलावून घेतलं.खरंच तुम्ही सगळं जिंकलंत....आमच्यावर तुम्ही अमीट अशी छाप सोडून गेलात..       मला आठवतं तुमची दिनचर्या जवळ जवळ ९० वर्षांपर्यंत सारखीच होती.सकाळी लवकर उठणे, आंघोळ, देवपूजा, देवदर्शनाला जाणे, न्याहारी, मग दुपारी ठरावीक वेळेत जेवण, दुपारी चहा मधल्यावेळेत जप, सतत कार्यमग्न राहून तुम्ही आमचे कायम आदर्श राहिलात.रात्रीचे जेवणही ठरावीक व मोजके.तुम्ही फार कधी आजारी पडल्याचं आठवत ...
 कृष्णसखा!!      ©️®️✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी       " तू कृष्ण कधी बघितलायेस का गं?"   सलोनी तिला विचारत होती. सईने क्षणभर तिच्याकडे नी क्षणभर मनातल्या कन्हैय्याला पाहून घेतले.." सलोनी, अगं श्याम तर माझ्या मनात रहातो, तनात रहातो..मी तर त्याला स्वतःपासून वेगळं समजतच नाही गं..तू विचारतेस बघितला का? अगं तोच तर चालवतोय हा देह..तुझा देह , माझा देह सर्वांचा देह..त्याला माझ्यातून ह्या सगळ्यातून वेगळं कसं काढू? सांग ना"   सलोनी हसत म्हणाली, " अच्छा म्हणजे तुला नाही भेटलाय अजुन".. सई म्हणाली," अगं तसं नाही गं".  सलोनी म्हणाली,"मग का नाही आजकाल हसत, नाचत गात तू मंदिरात..तुझ्याशिवाय तो मंदिरातला भजनाचा कार्यक्रमही सुना आहे सई..तू नसलीस की मन उदास होतं.." " तू कश्शी मनकवडीयेस गं, कसं कळतं तुला माझ्या मनीचं गुज..तूझं खरंय हर एकांती मी त्याचाच विचार करते पण अजुनही मन स्थिर नाही.त्याला सगुणरूपात भेटावं, पहावं ही सुप्त इच्छा मध्येच डोकं वर काढते बघ..अश्शावेळी नको तो श्रृंगार, नको ते जेवण, नको ते भजन, काही काही नको मला..तोच हवा हीच इच्छा तीव्र ह...
 उठी रे रामा रघुत्तमा... ©️®️  सौ. स्वरूपा कुलकर्णी उठी रे निलमेघश्यामा कौसल्येच्या सुखधामा, आला रवी तुझ्या दर्शना उघडी नेत्र बा रघुत्तमा।। प्राची कोवळी सोनसकाळी राम राम म्हणते गोजिरी, तूला पाहण्या येती रामा पक्षी सुंदर गवाक्षातुनी ।। भाट सारे गाती भुपाळी फुले उमलती निळीजांभळी, तुझ्यास्तव गाती भ्रमर बावरे मत्त मयुर करी नृत्य ते पहा।। तूला पाहूनी मंचकावरी धन्य झाली कौसल्यामाई, किती सुंदर तव नेत्रद्वय ते निळ्या नभाचे दर्शन होई।। तू राजा या अयोध्यापुरीचा वाढव गौरव रघुकूलाचा, तूला पाहण्या आतुर अवघी चराचर सृष्टी परमेशाची।। तुझे स्वागत करण्या आतुर दिशा साऱ्या पहा उमलती, सुगंध कमलदलांचा दरवळे नाजुक सुंदर चरणयुगूलांशी।। दे दर्शन तव भक्तजनांना उत्सुक सकल सृष्टी ही रामा, भेटाया तूज आतुर आम्ही सोड निद्रा पाहू दे मुखकमला।।

ऋणानुबंध

  - सौ.स्वरूपा कुलकर्णी         " सरस्वती, ए सरस्वती , आज रखमा शाळेत न्हाई गेली का गं? " धुणं धुता धुता सरस्वती म्हणाली," राधाक्का, पोरगी मोट्ठी व्हाय लागली. ती जर साळा शिकत बसली तर मला मदत कोन करील?मीच म्हनलं तिला नको जाऊस साळात"  राधाक्का बोलल्या, " अगं सरस्वती, पोरगी शिकली तर तिला मोठं ठिकाण मिळल तिचं कल्याण होईल..अशी तिला कामाला जुंपून का तिच्या भविष्याच्या आड येतिस..मी सांगते नं तुला मी भरीन तिची फिज..नको तिचं शिक्षण थांबवूस"...         सरस्वतीचे डोळे पाण्याने डबडबले.." राधाक्का, तुमचा साऱ्यात जीव..किती करताल म्हायासाठी..माझ्या नवऱ्याला दारूतून सोडिवलं..मोठ्या पोरास नोकरी लावून दिली...येव्हडं आभाळावानी मन तुमचं आक्का..कसं पांग फेडू?"        राधाक्का सरस्वतीच्या जवळ आली. तिला म्हणाली, " सरस्वती, अगं, पोटचं पोर नाही मला जीव लावायला..तुझी पोर ती माझी पोर समजते बघ मी...तुझ्या रखमात मला माझीच पोर दिसते बघ.." सरस्वतीने डोळ्याला पदर लावला.राधाक्काचे डोळे डबडबले..      सारं सावरगाव राधाक्काला तिच्या प्रेमळ...

प्रिती...

  -सौ.स्वरूपा कुलकर्णी             वाटेवर पारिजातकाची फुले विखूरली होती..त्याचा सुगंधी दरवळ वाटेवरच्या प्रत्येकाला गंधाळून टाकत होत्या..बस स्टॉपजवळ अजय कितीतरी वेळ तिची वाट पहात ताटकळत उभा होता..ती आता कशी दिसत असेल या विचारांनी त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले..शाळेत असतांना पुढच्या बेंचवर बसणारी ती आताही तश्शीच लांब वेण्या घालून त्यावर गुलाबाचं फुल लावत असेल का? तीची नेहमी खळखळून हसण्याची सवय आजही तशीच असेल का? अशा विचारातच तो गुंगला होता..इतक्यात बस समोर येऊन थांबली अन् तो भानावर येऊन सावधपणे तीच्या प्रतिक्षा करू लागला..एक एक करत प्रवासी उतरत होते अन् ती दिसली...हजारो पक्षी क्षणभरात इतस्ततः उडून जावे किंवा हजारो फुलपाखरे एकाच वेळी रंगीबेरंगी फुलांवर उतरावी तसं काहिसं त्याचं मन तिच्या पहिल्याच दर्शनाने पाखरू पाखरू झालं...वेड्यासारखा तो तिला पहातच राहिला...                    'मधुरा'...त्याने अतिशय आवेगाने  तो शब्द उच्चारला...        तीही क्षणभर बावरली की इतक्या जोरात कोण हाक ...
 *काव्यबंध समूह आयोजित* *उपक्रम*   *विषय -ऑनलाइन प्रेम*   दिनांक- 10 मार्च 2024    *शीर्षक- बदलती प्रेमाची भाषा*  हल्ली आता तो मला कॉलेजच्या कट्ट्यावर कमी, नी मेसेंजरवर जास्त भेटतो मन म्हणतं,तो बदललाय का?.... विचार करते रोज रोज पहाते वाट नव्या मेसेजची, खरंय का हे फेसबूक लव्ह की टाईमपास की आकर्षण?... तसा तो चांगला माणूस,  पण आता नाही भेटत मला, हसून खेळून कट्ट्यावर? अरे, तो असा का वागतोय?.. प्रश्न विचारे मन माझे,  पण मीही मुकपणे वाट पाही, रोज मेसेजच्या रींगटोनची, तो ऑनलाईन आलाय का?... प्रेम करते मी मनापासून, प्रेम त्याचेही मनापासून, मग बदललंय काय? कोडे भारी वाटते मला ... प्रेम तेच पण भाषा नवी, विठ्ठल तोच पण रूप नवे, खरंच बदलले काही नाही, व्यक्त होण्याची भाषा बदलली... मनीचे मळभ हळूहळू निवळले अरे हो, तो प्रेमच करतो  मनातले गूज मेसेजमधून बोलतो खरंच की, प्रेमच तर करतो... भलेही तो मोठा कवि नाही पण चारोळी माझ्यावर करतोच, रोज नवी लिहितोच ना? इमोजीने मला हसवतोच ना? तो आजही तोच आहे, मीही तीच ती राधा आहे आधुनिक जगामध्ये रमलो तरी प्रेम आजही...
 *काव्यबंध समूह आयोजित* *उपक्रम*   *विषय -ऑनलाइन प्रेम*   दिनांक- 10 मार्च 2024    *शीर्षक- बदलती प्रेमाची भाषा*  हल्ली आता तो मला कॉलेजच्या कट्ट्यावर कमी, नी मेसेंजरवर जास्त भेटतो मन म्हणतं,तो बदललाय का?.... विचार करते रोज रोज पहाते वाट नव्या मेसेजची, खरंय का हे फेसबूक लव्ह की टाईमपास की आकर्षण?... तसा तो चांगला माणूस,  पण आता नाही भेटत मला, हसून खेळून कट्ट्यावर? अरे, तो असा का वागतोय?.. प्रश्न विचारे मन माझे,  पण मीही मुकपणे वाट पाही, रोज मेसेजच्या रींगटोनची, तो ऑनलाईन आलाय का?... प्रेम करते मी मनापासून, प्रेम त्याचेही मनापासून, मग बदललंय काय? कोडे भारी वाटते मला ... प्रेम तेच पण भाषा नवी, विठ्ठल तोच पण रूप नवे, खरंच बदलले काही नाही, व्यक्त होण्याची भाषा बदलली... मनीचे मळभ हळूहळू निवळले अरे हो, तो प्रेमच करतो  मनातले गूज मेसेजमधून बोलतो खरंच की, प्रेमच तर करतो... भलेही तो मोठा कवि नाही पण चारोळी माझ्यावर करतोच, रोज नवी लिहितोच ना? इमोजीने मला हसवतोच ना? तो आजही तोच आहे, मीही तीच ती राधा आहे आधुनिक जगामध्ये रमलो तरी प्रेम आजही...
 # एक_पत्र_कृतज्ञतेचं प्रिय लतादिदी,               शिरसाष्टांग नमस्कार🙏               सर्वप्रथम सांगते,तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस नाही.जणू विधात्याने तू स्मरणकोषातुन दूर जाऊच नये अशीच तुझ्या आवाजाची घडण केली होती.हो केली होती म्हणतीये पण दिदी, तूझा आवाज तुझ्यासारखाच अमर झालाय.सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात ते तुझे दैवी स्वर निनादतच असतात.तू देवाने घडवलेला अप्रतिम नजराणाच.कानांची, मनाची, ह्रदयाचीही तृप्तता तुझ्या स्वरांनी केली. तू स्वर लावलास की शुद्धता,मांगल्य, पवित्रता असा निखळ दैवी आविष्कार ऐकत,अनुभवत आलोय.तुझा आवाज सामान्य नव्हताच..पण तुझं साधं रहाणं, सच्चाईने गाणं, समोरच्याच्या ह्रदयाचा सहज ठाव घेणं खरंच कोणाला जमलच नाही.तुझे नक्षत्रांसारखे हे दैवी देणे आम्हाला भरभरून मिळाले.पण एका कृतज्ञतेशिवाय आम्ही तुला आज काही देऊ शकत नाही.तू देवाघरी गेलीस पण तुझ्या दैवी स्वराने आजही आमच्यातच आहेस.फुलातल्या सुगंधासारखी दरवळते आहेस.तुझ्या सरस्वतीच्या रूपाला मी मनापासून वंदन करते दिदी.तूझं मोठ्यात मोठेपण कितीतरी ...
 *मर्यादा पुरूषोत्तम*  ।।जय श्री राम।। - सौ. स्वरूपा कुलकर्णी धन्य धन्य तू सीतापती  कौसल्यासूत रामा। करीतो नमन तूज चरणी  ह्रदयी प्रेम दे रघुत्तमा।। तू विशालबाहू त्रिकालदर्शी वनवास तो भोगिला। धन्य रमापती तुम्ही दाविली वचननिष्ठा जगाला।। राम लक्ष्मण सवे जानकी केला प्रपंच घोर वनी। नाही झाले उद्विग्न कधिही जीवन भरले दुःखांनी।। जनकनंदिनी सीतामाता रावणाने पळविली। दुःखी राम गाळी अश्रू प्रिय जानकी साठी।। राम करी युद्ध तुंबळ रावण रणी पाडला। जिंकून लंका जय लाभला सीतापती शोभला।। अग्निपरिक्षा सीतेची जरी राम जाणतो अंतरी। सीता माझी शुद्धच आहे नाही कलंक तिजवरी।। मर्यादा सारी चरित्र अवघे रामप्रभू मनी जाणती। लोकांसाठी अग्निपरिक्षा सीतापती करवी।। मग परतती राम तेंव्हा अपुल्या अवधपुरीसी। दशरथनंदन राम जाहला राजा अयोध्यापती।। मारूतीसवे वानरसेना राही रामापाशी। राम करी राज्य सुखाचे राजा रघुराई।।
 ।।जय श्री राम।। ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  राम माझा प्रिय राजा रघुराम। प्रेममुर्ती भक्तचित्त सुखधाम।। राम हा माझा शांतमूर्ती प्रेममुर्ती। करी सदैव प्रेमाची कृपावृष्टी।। राम भक्ता सोडवी सर्व दुःखातूनी। सांभाळी सर्व भक्ता प्रतिदिनी।। राम भक्तांचा सदैव पाठिराखा। आनंदाचा कंद श्रीहरी माझा।। रामाला ना प्रिय हिरे ना मोती। त्याला प्रिय भक्त ह्रदयीचे प्रेम मनस्वी।। राम यावा जीवनी राम क्षणोक्षणी। उद्धरी जीवा तो नेऊनी सुखधामी।।  राम हा ह्रदयी भक्ता देई सुख सारे। न पडावे अंतर रामा तुझ्या माझ्यात रे।। राम राम सदैव राम रामच स्मरावा। क्षण येईल तो मुक्तीचा अद्वैताचा रामाचा।।
 राममय होऊ सगळे.. -सौ.स्वरूपा कुलकर्णी     राम ही दोन अक्षरांची जादू किती अद्भूत आहे हे आपण सगळे रोज अनुभवत आहोतच.राम ही देवता जनमानसात एव्हडी लोकप्रिय व लाडकी का आहे ह्याचा थोडा खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की रामाचे चरित्रच इतकं सकस , इतकं ह्रदयाला भिडणारं आहे की जनमानसात त्याने निर्माण केलेला आदर्श आजही व उद्याही अंतिम शिखरटोक आहे.हे टोक म्हणजे न्यायाचं, नीतीचं, पराक्रमाचं, सहिष्णूतेचं, प्रेमाचं, मानवतेचं,दिव्यत्वाचं परमोच्च बिंदू स्थान आहे.राम नाम घेणे सोपे पण आचरण रामासारखं असायला आपल्याला किती सायास करावे लागतील? मला तर ते सर्वथा अशक्यच वाटतं...    राम म्हणता म्हणता राममय व्हावं, भक्ती प्रेमाने त्याचं जीवलग होऊन जावं अशा भावना मनात उचंबळत असतात..राम कथा ऐकतांना तर अश्रूंची संततधार लागते.बालवयात अनेक सुंदर लीला करणारा राम,भावंडांवर विशेष माया व प्रेम करणारा सालस राम,लहान वयातच गुरूगृही जाऊन वेद वेदांत ग्रहण करणारा राम,लहान वयातच विश्वामित्रांच्या आदेशानुसार निर्भिडपणे वनात जाणारा राम, सीता स्वयंवरात अत्यंत नम्रतेने गुरू आज्ञेनुसार शिवधनुष्य सहज ...
 दासबोध - मला भावलेला  सौ.स्वरूपा कुलकर्णी अध्यात्म म्हटलं की खूप जण हा काहीतरी बोजड, अवघड विषय असावा असे समजून खूपच दूर होतात.तर काहींच्या मते हा Retirement नंतरचा उद्योग! पण खरचं याचा अभ्यास केलात तर कळेल हे तर साधं दैनंदीन आयुष्याचं गणित होतं. लवकर कळलं असतं तर चुका सुधारता आल्या असत्या.  समर्थांचा दासबोध हा असाच एक अध्यात्मिक ग्रंथ..अगदी आजच्या भाषेत सांगायचा तर प्रॅक्टिकल गोष्टी करायला सांगणारा मार्गदर्शक वाटाड्या आहे. श्रोते पुस्ती कोन ग्रंथ । काय बोलिले जी येथ। श्रवण केलियाने प्राप्त।काय आहे।। समर्थांनी दासबोधाची सुरुवातच या ओवीने केली आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही नविन वस्तू हातात पडल्यावर ती काय आहे, ती उघ‌डून पहाता येईल का १, तीचा उपयोग काय ? असे प्रश्न सर्वाना पड़तात. तसेच या ग्रंथाची खासियत ही की सुरुवातीलाच समर्थानी स्वतःच प्रश्न उभा केला आहे की हा कोणता ग्रंथ ? यात काय लिहिलय ? याच्या श्रवणाचे फायदे काय ? बघा, समर्थानी दूरदर्शीपणे पूढच्या पिढ्यांसाठी घ्या ग्रंथाची रचना केलेलीदिसते.  दुसरी ओवी लगेच घ्या प्रश्नांची उत्तरे देतांना समर्थ म्हणतात- ग्रंथा नाम दास...