*काव्यबंध समूह आयोजित* *उपक्रम*
*विषय -ऑनलाइन प्रेम*
दिनांक- 10 मार्च 2024
*शीर्षक- बदलती प्रेमाची भाषा*
हल्ली आता तो मला
कॉलेजच्या कट्ट्यावर कमी,
नी मेसेंजरवर जास्त भेटतो
मन म्हणतं,तो बदललाय का?....
विचार करते रोज रोज
पहाते वाट नव्या मेसेजची,
खरंय का हे फेसबूक लव्ह
की टाईमपास की आकर्षण?...
तसा तो चांगला माणूस,
पण आता नाही भेटत मला,
हसून खेळून कट्ट्यावर?
अरे, तो असा का वागतोय?..
प्रश्न विचारे मन माझे,
पण मीही मुकपणे वाट पाही,
रोज मेसेजच्या रींगटोनची,
तो ऑनलाईन आलाय का?...
प्रेम करते मी मनापासून,
प्रेम त्याचेही मनापासून,
मग बदललंय काय?
कोडे भारी वाटते मला ...
प्रेम तेच पण भाषा नवी,
विठ्ठल तोच पण रूप नवे,
खरंच बदलले काही नाही,
व्यक्त होण्याची भाषा बदलली...
मनीचे मळभ हळूहळू निवळले
अरे हो, तो प्रेमच करतो
मनातले गूज मेसेजमधून बोलतो
खरंच की, प्रेमच तर करतो...
भलेही तो मोठा कवि नाही
पण चारोळी माझ्यावर करतोच,
रोज नवी लिहितोच ना?
इमोजीने मला हसवतोच ना?
तो आजही तोच आहे,
मीही तीच ती राधा आहे
आधुनिक जगामध्ये रमलो तरी
प्रेम आजही प्रेमच आहे...
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
- राहाता, अहमदनगर
Comments
Post a Comment