Posts

Showing posts from August, 2025
 विष्णूप्रिया एकादशी ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी      मंडळी, एकादशी म्हंटलं की उपवास, पंढरपूर किंवा वारी असं चित्र डोळ्यासमोर येतं. पुराणांमध्ये एकादशीविषयी खूप महत्वपूर्ण कथा व माहिती आलेली आहे.सर्वप्रथम एकादशी हे एक व्रत आहे आणि ते विष्णूला अत्यंत प्रिय आहे ही महत्वाची माहिती मिळते. जो एकादशी नेहमी करतो तो वैकुंठाला जातो असे म्हणतात. एकादशी बद्दल माझं वैयक्तिक उदाहरण सांगते. दोन वर्षांपुर्वी आषाढी एकादशीपासून मी ह्या व्रताला सुरूवात केली. बऱ्याच अनुभवी लोकांकडून व पुस्तकांमधून तसेच लहानपणापासून घरातल्या वातावरणामुळे एकादशी ह्या व्रताबद्दल विलक्षण कुतूहल होतं. मोठी एकादशी तर करतच होते पण वर्षातील सगळ्या एकादश्या कराव्यात अशी आस मनाला लागली. तशी मी विष्णूभक्तंच पण एकादशीचा उपवास निभवेल का नी दरवेळी तो लक्षात राहिल का असा मनात प्रश्नं होताच. पण तो निभावणे आपल्या हातात नसुन प्रत्यक्ष हरीच त्याची काळजी घेतो हे मला थोड्याच दिवसात कळाले. आपण चुकूनही एकादशी विसरत नाही व उपवासही चांगला निभावतो हेही मला पुढे कळत गेले.खरंच हे माझे क्रेडीट नाहीच, ही त्या हरीचीच कृपा. एकादशीचा दि...
 एक बिल्व शिवार्पणम्.. - सौ. स्वरूपा कुलकर्णी      श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवालयात पुजेसाठी गेले होते. स्वच्छ पांढरे कपडे घालून माझ्यासारख्या अनेक स्त्रिया पुजेसाठी अगदी उत्साहात २ -२ तास रांगेत अगदी शांत बसल्या होत्या. राहात्यातील हे शिवालय तसं जुनंच.अगदी माझ्या आजेसासूच्याही पुर्वीच्या पिढीचं. दिसायला बाहेरून अगदी साधंसंच. पण गाभाऱ्यात मात्र पावित्र्यं जपलेलं..आतुन खूप वेळ रूद्राचे पवित्र मंत्र कानावर पडत होते..मन शांत करत होते..गुरूजी व बाहेरील स्त्रीयाही तन्मतेने त्या मंत्रांशी एकरूप झाल्या होत्या.मीही तितकीच तन्मयतेने विभोविश्वनाथाचे ते पवित्र रूद्रं ऐकत ओम् नमः शिवायचा जप करत बसले होते.  बऱ्याच प्रतिक्षेनंतर शिवपूजेसाठी आत जाता आलं.गाभारा खूप मोठा नव्हता पण ४ जणी एकत्र पूजा करू शकतील इतका मोठा नक्कीच होता.समोरच पुर्वी कधिही न बघितलेली सुरेख अशी त्रिमुखी ब्रह्मा,विष्णू महेशाची ती पिंड मनाला आकर्षून गेली.तिनही देवता कोरलेली ती पिंड किती वेगळी वाटली मला! पिंडीवर अखंड पडणारी अभिषेकपात्रातील जलधारा!मुखाने नकळत ओम् नमःशिवाय जप!.मन अधिक पवित्र व नकळत गंभि...