# एक_पत्र_कृतज्ञतेचं प्रिय लतादिदी, शिरसाष्टांग नमस्कार🙏 सर्वप्रथम सांगते,तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस नाही.जणू विधात्याने तू स्मरणकोषातुन दूर जाऊच नये अशीच तुझ्या आवाजाची घडण केली होती.हो केली होती म्हणतीये पण दिदी, तूझा आवाज तुझ्यासारखाच अमर झालाय.सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात ते तुझे दैवी स्वर निनादतच असतात.तू देवाने घडवलेला अप्रतिम नजराणाच.कानांची, मनाची, ह्रदयाचीही तृप्तता तुझ्या स्वरांनी केली. तू स्वर लावलास की शुद्धता,मांगल्य, पवित्रता असा निखळ दैवी आविष्कार ऐकत,अनुभवत आलोय.तुझा आवाज सामान्य नव्हताच..पण तुझं साधं रहाणं, सच्चाईने गाणं, समोरच्याच्या ह्रदयाचा सहज ठाव घेणं खरंच कोणाला जमलच नाही.तुझे नक्षत्रांसारखे हे दैवी देणे आम्हाला भरभरून मिळाले.पण एका कृतज्ञतेशिवाय आम्ही तुला आज काही देऊ शकत नाही.तू देवाघरी गेलीस पण तुझ्या दैवी स्वराने आजही आमच्यातच आहेस.फुलातल्या सुगंधासारखी दरवळते आहेस.तुझ्या सरस्वतीच्या रूपाला मी मनापासून वंदन करते दिदी.तूझं मोठ्यात मोठेपण कितीतरी ...
Posts
Showing posts from February, 2024