Posts

Showing posts from May, 2024
 "अव्यक्त भावनांचं पत्र"  लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी        प्रिय तीर्थरूप दादा(आजोबा),             साष्टांग नमन.          मला आज खूप मनापासून वाटलं की ती व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांच्याशी मनातलं खूप काही बोलायचं राहून गेलं.मी तुमच्याशी कधिही बोलू शकले नाही ते बोलणार आहे.देवाच्या कृपेने तुम्हाला ९२ वर्षाचे खूप मोठे व चांगले आयुष्य लाभले.तुमची देवभक्ती, सद्गुरूनिष्ठा फळाला आली व एकादशीलाच तुम्हाला मुक्ती मिळाली.मी तेंव्हा फार मोठी नसले तरी हे कळण्या इतपत मोठी होते की तुम्ही वैकुंठाला गेले...जणू देवानेच तुम्हाला बोलावून घेतलं.खरंच तुम्ही सगळं जिंकलंत....आमच्यावर तुम्ही अमीट अशी छाप सोडून गेलात..       मला आठवतं तुमची दिनचर्या जवळ जवळ ९० वर्षांपर्यंत सारखीच होती.सकाळी लवकर उठणे, आंघोळ, देवपूजा, देवदर्शनाला जाणे, न्याहारी, मग दुपारी ठरावीक वेळेत जेवण, दुपारी चहा मधल्यावेळेत जप, सतत कार्यमग्न राहून तुम्ही आमचे कायम आदर्श राहिलात.रात्रीचे जेवणही ठरावीक व मोजके.तुम्ही फार कधी आजारी पडल्याचं आठवत ...