नाते जुळले मनाशी मनाचे कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी धागे विणले नवनात्यांचे, माहेर सोडून सासरी आले, जन्म नवा हा मजला भासतो, शतजन्मीची भावफूले रेशीमगाठही हळूच सांगते, तुझे नी माझे बंध प्रितीचे, मनात तुझिया मी राहते, माझिया मनी तूझाच वावर रंग प्रितीचे मनी मानसी, फुलते झूरते असे साजिरे, गंध मोगरा अमृत शिंपी, तुझे नी माझे जग हे सुखाचे मी व तू न राही आता अंतर, करू साजरा आनंद जन्मभर, आता न जाणीवा वेगळ्या उरल्या, नाते जुळले मनाशी मनाचे
Posts
Showing posts from October, 2022
- Get link
- X
- Other Apps
चंद्र आहे साक्षीला कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी धूंद सुगंधी निशा ही भरजरी लेवूनी साज शृंगार यौवनाचा तू उभा जवळी माझीया चंद्र आहे साक्षिला.. मी उभी मूग्ध बावरी अबोल संकोचूनी तुझिया समिप रे झाले अबोल क्षण एकांतातले हे चंद्र आहे साक्षिला... वारा निशःब्द जाहला अधिकच हळूवार वाढवी ओढ आपुल्यातली तू -मी शांत तरीही प्रेम उमलते हे चंद्र आहे साक्षिला.. वाढे गोड अनामिक हुरहूर क्षणांना जवळ ओढिलेस बहुपाशांत मजला मी उभी बावरून ह्रदयाशी तुझिया चंद्र आहे साक्षिला.. जाणवे धडधड तुझिया छातिची, मी भारावले मुग्ध केव्हडी लाजूनी तू प्रितीत सख्या मीही तूझी चंद्रिका रे चंद्र आहे साक्षिला..