नाते जुळले मनाशी मनाचे
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
धागे विणले नवनात्यांचे,
माहेर सोडून सासरी आले,
जन्म नवा हा मजला भासतो,
शतजन्मीची भावफूले
रेशीमगाठही हळूच सांगते,
तुझे नी माझे बंध प्रितीचे,
मनात तुझिया मी राहते,
माझिया मनी तूझाच वावर
रंग प्रितीचे मनी मानसी,
फुलते झूरते असे साजिरे,
गंध मोगरा अमृत शिंपी,
तुझे नी माझे जग हे सुखाचे
मी व तू न राही आता अंतर,
करू साजरा आनंद जन्मभर,
आता न जाणीवा वेगळ्या उरल्या,
नाते जुळले मनाशी मनाचे
Comments
Post a Comment