गुरूमहिमा
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरः। गुरूःसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।। अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज महाराज अशा परमआदरणीय सद्गुरूंना आजच्या गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वावर कोटी कोटी प्रणाम! माझ्या अल्पमतीने सद्गुरूंविषयी समर्थ काय सांगतात ते लिहिण्याचा प्रयत्न करते.समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात सद्गुरूस्तवन समासात सद्गुरूमहिमा वर्णन केला आहे.त्यात समर्थ म्हणतात की सद्गुरूंचे अंतिम लक्ष्य शिष्याला आपल्यासारखेच बनवणे हे आहे.म्हणजेच सद्गुरू शिष्याला स्वतःइतके सक्षम बनवून सोडतात.अशी कृपा खरोखर या संपूर्ण ब्रम्हांडात कोणीही करू शकत नाही.ही किती थोर कृपा आहे की ज्यामुळे शिष्य सद्गुरूंसारखच सद्गुरूपद प्राप्त करू शकतो.उदार अंतःकरणाच्या या परमेशाचे वर्णन करायला समर्थ सांगतात की मी अपुर्ण आहे.या मायेच्या आधाराने मी सद्गुरूमहिमान वर्णन करू शकत नाही,कारण पृथ्वी जवळ क्षमा व आधाराचा गुण आहे.परंतू तिची उपमा सद्गुरूंना लागू होत नाही कारण सृष्टीच्या अंतकाळ...