...गुंतता ह्रदय हे!!
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
लास्ट लेक्चर संपलं.. मानसी व तिच्या मैत्रीणी सरळ कॅंटीनजवळ आल्या ..आज सेमिस्टरचा शेवटचा दिवस, त्यामुळे समोसा पार्टी ठरली होती, तीपण रजनीकडून...ती पार्टी आटोपून मानसी सटकली, कारण तीला आज घरी बघायला येणार होते..
वा-यावर भूरभूर उडणारे केस .. ५०- ६० च्या स्पीडवर तिची अॅक्टीव्हा रस्त्याची अनेक वळणे मागे टाकत सेव्हन व्हील्स ला पोहोचली...तिथून एक टर्न मारत तिने घर गाठलं...घर पाहताच आता पुढे काय वाढुन ठेवलय ?असा तिच्या मनात विचार आला..
खरं म्हणजे तीचा लग्न करण्याला विरोध नव्हता पण बिना नोकरीचं लग्न करावं हे तिच्या करीअरिस्टीक मनाला पटत नव्हतं.. ती दिसायला सावळी, सुंदर मोठ्या डोळ्यांची, लांब केस, तुकतुकीत त्वचा, फिगर छानच असलेली , थोडक्यात लग्न नावाच्या बाजारात पसंत असलेली.. ती सावळी होती पण तीच तिची उजवी बाजू होती कारण तिचा चेहरा विलक्षण आकर्षक होता.. सावळी माणसं नाकी, डोळी निटस असल्यावर सुंदर दिसतात... तशीच ती... नावाप्रमाणेच 'मानसी' मन मोहून टाकणारी.. तिचा स्वभावही मनस्वी, हळवा, सालस... संवेदनशीलता ओतप्रोत भरलेली.. तिचे बाबा निवृत्त बैंक अधिकारी, आई गृहिणी, ती एकुलती एक, त्यामुळे आई बापाचा जीव की प्राण..
तिचं वय २३,म्हटलं तर लग्नास योग्य म्हंटलं तर अजून नोकरी शोधून लग्न करायला वेळ होता... पण एक स्थळ सांगुन आलं.. तिच्या मावशीचे ओळखितलेच होते.. मुलीच्या फक्त फोटोवरून मुलाच्या आईला ती आवडली... मावशीनेही भाचीचे भरभरून कौतुक केले.. मग काय चहा-पोह्याचा कार्यक्रम ठरला.. दिवस निश्चित झाला.. मानसी गेली आ़ठवडा कसा असेल मुलगा? ,मी आत्ताच लग्न का करू? ,मला इतकी घाई नाही, अजुन नोकरी कुठे मिळालिये? इत्यादी विचार करण्यातच गेला..
तीला घरात आल्या आल्या आईने फ्रेश होऊन तयार व्हायला सांगीतले.. ती जरा नाखूषीनेच बाथरूमकडे वळली..
"या, या, नमस्कार...". असे म्हणत मानसीच्या बाबांनी पाहुण्यांचे स्वागत केले.. पाहुणेही नमस्कार करत घरात प्रवेशले.. मुलाचे बाबा, त्याची आई, मानसीची मावशी व मुलगा एव्हडीच मंडळी होती.. मानसीचे बाबा मंडळींशी बोलू लागले...बोलतांना त्यांची नजर मुलाकडे जात होती, अतिशय देखणा, उमदा म्हणावा असा निशांत डोळ्यात भरण्यासारखा होता, ते मनोमन प्रसन्न झाले.. 'जोडा अगदी शोभून दिसेल' त्यांच्या मनात आले..
सगळी मंडळी मोकळेपणाने गप्पा मारत होती, निशांतही मधून मधून सहभागी होत होता... पण त्याची आतुर नजर पडद्याकडे लागली होती... फोटोत दिसणारी ती प्रत्यक्षात कशी असेल? मनातले ते विचार दाबून ठेवत चेहर्यावर हसू आणत तो तीची वाट पहात होता..गेला आठवडाभर तिचा फोटो पाहून तिच्या प्रेमात पडलेला तो तिला भेटायला उत्सुक होता..समोरील मंडळींना जास्त न ताणता मानसीच्या बाबांनी मानसीच्या आईकडे ईशारा केला.. तशी ती 'आलेच हं' म्हणत आत गेली... आई मानसीला घेऊन बाहेर आली.. तीला समोर पहाताच निशांत क्षणभर स्तब्ध झाला... तीचा तो सुंदर, देखणा चेहरा, तिचे लांबसडक केस, तीने कौशल्याने बांधलेली त्याची हेअर स्टाईल, गळ्यात नाजुक नेकलेस, कानात टॉप्स, तीची सुबक बिंदी, खुबिने नेसलेली गुलाबी रंगाची साडी, तीची साधी पण सुंदर रहाणी तो एकुणच हरखून गेला... हीच माझी स्वप्नातली राणी तो मनाशी ठरवून तिच्याकडे बघू लागला... तिने मान वरून एकदा सगळ्यांकडे बघितलं निशांतकडे नजर जाताच तिलाही काहीतरी जन्मोजन्मीचं आपलं नातं आहे असं वाटुन गेलं.. तिचं तिलाच आश्चर्य वाटलं... तिला तो पहिल्या नजरेतच आपला वाटला, तीने लाजुन मान खाली घातली ... नंतर सगळ्यांशी हलक्याफुलक्या गप्पा झाल्यानंतर मावशी म्हणाली, 'अगं ताई, मानसी व निशांतला निवांतपणे बोलू दे म्हणजे त्यांना एकमेकांचे स्वभाव कळतील' सगळ्यांनी अनुमोदन दिले... ती दोघं टेरेसवर गेली...
कुंड्यात मस्त गुलाबी गुलाब फुललेला होता, जाई-जुई, चाफा, मोगरा फुलले होते... तिथल्या २ खुर्च्यांवर ते दोघं बसले.थोडावेळ शांतता होती..मग निशांतनेच बोलायला सुरुवात केली... ' तुम्ही एस.पी.कॉलेजमध्ये आहात नं? ' तिने हळूच हो असा प्रतिसाद दिला... तीचा शांत स्वभाव त्याला आल्यापासून जाणवत होता... त्याने संभाषण चालुच ठेवलं, तीही मनमोकळेपणाने बोलत होती.. 'तुम्हाला गुलाब आवडतो की मोगरा' ती हसुन, 'दोन्हीही 'असं उत्तर दिलं... त्यावर तो म्हणाला ' मला मात्र गुलाबी गुलाबच आवडतो' यावर त्याचे डोळे तिच्याकडे हसत बघत होते... तीला अचानक लक्षात आलं की आपण गुलाबीच साडी नेसलीये.. ती खूप लाजली.. त्यावर तो म्हणाला, 'मी गुलाबाचा खरंच चहाता आहे, जिथे गुलाब तिथे मी' मनापासून हसत तो उतरला.. तिला अजुनच लाजलेलं पाहून तिचे दोन्ही हात हातात घेऊन, 'मानसी, माझ्याशी लग्न करशील? मला मनापासून साथ देशील, मी तुझी जन्मोजन्मी साथ निभवेल, तु फक्त हो म्हण' यावर त्याचे एकेरी संबोधन व त्याच्या हातांचा उबदार स्पर्श खूप जवळिक निर्माण करून गेला... ती मनोमन खुश झाली... त्याच्यापासून हात सोडवत ती दुसरीकडे बघत म्हणाली, पण मला नोकरी करायचीये, माझं करीअर लग्न झाल्यावर थांबेल.. यावर तो, 'अगं एव्हडंच ना, ते मी पाहुन घेईन तू नको काळजी करूस, लग्न झाल्यावरही तुझं करीअर थांबणार नाही, I promise'यावर त्याला नकार द्यावा असं तीला काहीच वाटलं नाही... तो दिसायला, वागायला अतिशय लोभस वाटला.. त्यात चांगल्या कंपनीत उच्चपदस्थ होता... MBAझालेला तो उत्तम गिटारीस्ट पण होता... तिला त्याच्या बायोडेटामधिल माहिती आठवली.. ती काहीच बोलत नाही हे पाहुन तो घुटमळला'त्याची नजर तिचे चेहर्यावरचे हावभाव पाहु लागली.. ती हसली.. तो अजुनच खलास झाला.. ही काहीच का बोलत नाही, तो बैचैन झाला.. ती हळूच एक एक शब्द बोलली.. 'अं माझ्याकडून होकार आहे'.. ते शब्द त्याला ऐकुनही ऐकुच आले नाही, त्याने परत विचारले, 'काय म्हणालात? '
यावर ती त्याच्या परिस्थितीवर हसून म्हणाली, 'मी तयार आहे लग्नाला'त्यावर अतिशय हर्षाने त्याने तिच्या हाताचं किस घेतलं.. Thank you thank you very much हे ऐकण्यासाठी मी केव्हडा तरसलो होतो, thank you❤🌹ती खळखळून हसली.. तो मात्र वेड्यासारखाच तिच्या दिलखुलास हसण्याकडे बघतच राहिला... हाय, मी तर या मुलीवर जाम फीदा आहे. .. त्याने तिला तिथेच propose केलं I love you Manasi ती वर नजर करून त्याच्याकडे बघु शकत नव्हती... ती लाजेने लाल गुलाबी झाली.. त्यांना त्या स्वप्निल जगातून बाहेर काढणारे शब्द कानी आले, 'निशांत, मानसी अगं किती वेळ, लवकर खाली या' तो आईचा आवाज होता... मानसी बावरली त्याच्याकडे न बघताच सरसर पायर्या उतरून खाली आली, इकडे निशांतला मनासारखे उत्तर मिळाले होते, पण तीचा सहवास सोडवत नव्हता.. तोही भानावर येत खाली आला... मनात मात्र स्वप्न रंगण्यात गुंगुन गेला... इकडे आईने तीला पाहताच ओळखले की तीचं उत्तर काय आहे.. जातांना निशांत डोळ्यात तिला साठवून वारंवार तिच्या खिडकीकडे पहात होता.. त्यांची कार गेल्यावर मानसी लाजेने लालबुंद होत स्वतःला आरशात न्याहाळू लागली... तीथे तिला निशांतचा
I love you❤म्हणनाराच चेहरा दिसत होता...तीला रात्रभर तोच आठवत राहिला...तिची अवस्था जणू गुंतता ह्रदय हे अशीच झाली...
थोड्याच दिवसात त्यांचं लग्न ठरलं व ती दोघं विवाह बंधनात अडकली.... शेवटी मानसी निशांतची झाली..झट् मंगनी पट् ब्याह याचे उत्तम उदाहरण ठरले.
👩❤️👨
Comments
Post a Comment