Posts

Showing posts from 2026
 सुखकर्ता दुख:हर्ता🙏 - सौ. स्वरूपा कुलकर्णी      श्रीगणेश ही सकल विद्या, कला आणि सद्बुद्धीची देवता आहे. तिची उपासना ही मनुष्यमात्रांसाठी अत्यंत महत्वाची उपासना आहे. कारण, मनुष्य कितीही मोठा, श्रीमंत असला तरी सद्बुद्धी नसेल तर दोन्ही डोळे असून आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणजेच शक्ती व ऐश्वर्य असुनही माणूस सद्बुद्धीविना लंगडाच रहातो. आजची सामाजिक परिस्थिती ही अशिच विचीत्र परिस्थिती आहे. वैचारिक गोंधळात सत्य काय असत्य काय किंवा चांगले काय व वाईट काय याचा बोध सामान्य माणसाला होत नाहीये.वैचारिक मतभेदांचा महापूर आलाय. माणूस पैसा ढीग कमावतोय पण मनःस्वास्थ्य हरवलंय. माणूस मनुष्यत्व हा त्याचा पहिला धर्म विसरून कमालिचा यांत्रिक आणि एक्कलकोंडा होत चाललेला आहे. आधुनिक जगाची समस्या ही आहे की सगळं असून हातात काहीच नाही. म्हणजे सर्व आधुनिक संसाधनांनी परिपूर्ण असुनही माणूस मनावर अधिराज्य मिळवू शकलेला नाही, तो मनाचा गुलामच आहे. मन विकांरांनी भरलेलं आहे, बुद्धीला ग्रहण लागलेलं आहे आणि शरिर कमजोर होत चाललेलं आहे. ही परिस्थिती सुखोपभोगाच्या नादी लागून तयार झालेली मनुष्याची स्वनिर्मित "...
 अविस्मरणीय तिर्थयात्रा भाग ४    - सौ. स्वरूपा कुलकर्णी   चित्रकुटहून वाराणसीला सुखरूप पोहोचलो. रात्री जेवण करून विश्राम केला आणि पहाटे लवकर आवरून काशी विश्वेश्वर दर्शनासाठी निघालो..    *४.काशी(वाराणसी)*      "काशीस जावे नित्य वदावे" अशी एक म्हण आहे.. म्हणजे "मी काशीला चाललोय" असे रोज जरी म्हणले तरी काशीस गेल्याचे पूण्य मिळते असे म्हंटले जाते. काशी ही सप्त मोक्षपुरीतील एक नगरी..ही नगरी भगवान भोले शंकरांची पवित्र धरा आहे.येथे महादेवांचा "बुलावा" आल्याशिवाय येणे होत नाही. काशी हे भगवान शंकरांच्या त्रिशुळावर स्थित नगरी मानली जाते..तप:साधनेची, वैराग्य व भक्ती यांचा अभुतपूर्व संगम असणारी, मोक्ष देणारी प्राचीन नगरी म्हणून सर्व हिंदूंना परिचीत आहे..तसेच १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणूनही शिवलिंगाचे दर्शन घेणे फार महत्वाचे मानतात..      सर्वप्रथम आम्ही काशी विश्वनाथाच्या हॉटेलपासून मंदिराकडे टांग्याने गेलो. पावसाची रिमझीम चालूच होती.इकडे श्रावणमास चालू असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती.. आम्ही गेलो त्यादिवशी गुरूवार होता. दर्शन पासेस असल्यान...
 अविस्मरणीय तीर्थयात्रा भाग ३ - सौ. स्वरूपा कुलकर्णी       रामलल्लाच्या प्रसन्न दर्शनानंतर आम्ही रात्र अयोध्येत घालवून सकाळी नाश्ता वगैरे करून चित्रकुटला रवाना झालो.   *३.चित्रकुट*           रामायणात सांगितल्याप्रमाणे रामप्रभू,सीतामाई व लक्ष्मणाने साडे अकरा वर्षे चित्रकुटावर निवास केला होता. येथेच तुलसिदासांना रामरायाने दर्शन दिले होते.सती अनसुया व अत्री ऋषींचा सिद्धाश्रमही इथेच आहे.मंदाकिनी नदी येथे शांत वहाते.      सर्वप्रथम आम्ही कामदगिरी पर्वत येथिल कुबेराचे मंदिर पाहिले. रामरायाने रावणाला मारण्याची इच्छा मनात धरून कुबेराला कंदमूळ फळे येथेच अर्पण केली असे गाईडने आम्हाला सांगितले. रामघाट ते कामदगिरी पर्वत अंतर बरेच आहे पण रामचंद्र तिथून रोज या कुबेर मंदिरात कंदमुळ फळे अर्पण करण्यासाठी येत असत. शेवटी रावण वध झालाच हे आपण जाणतोच. त्यानंतर गुप्त गोदावरी या अद्भूत ठिकाणी गेलो जेथे आपली गोदावरी नदी गुप्तपणे रामरायांना भेटण्यासाठी येत असे. ती गुफेतून वहाते व पुढे अदृश्य होते..पाण्याचा प्रवाह थोड्याच अंतरावर वहातो अस...
 अविस्मरणीय तीर्थयात्रा  भाग २ - सौ. स्वरूपा कुलकर्णी    काही दुर्मिळ योग हे पुर्वीच ठरलेले असावेत असा योग अयोध्येच्या रामलल्लाच्या दर्शनाचा होता.. राममंदिर झाल्यापासून सारखे वाटत होते की रामाचे दर्शन कधी होईल..ती ओढ शब्दात सांगता येण्यासारखी नाहीच खरी..हिंदूंचं रामाशी असलेलं नातं खरंच कुठल्याही दाखल्याने सिद्ध करायची गोष्टच नाही..तो सर्वांच्या आत बसलेला आत्माराम आहे तोच परमात्माही आहे.. राम व कृष्ण ही दैवतं जणू आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत..       आम्ही सायंकाळी अयोध्येत पोहोचलो.. रामदर्शनाचे पासेस काढले होतेच.. मनातली दाटून आलेली भावावस्था कधी रामदर्शन घेईल अशीच होती..तिथल्या लोकल रिक्षाचालकाने आम्हाला सीतेचं रसोईघर, रामसीतेची हनुमानाची काही मंदिरे दाखवली.. पण मन मात्र रामाचे दिव्य दर्शन घेण्यासाठी आसुसले होते.मग रिक्षाचालकाने रामलल्लाच्या भव्य मंदिर कॉरिडॉरजवळ आम्हाला सोडले.. भव्यता,रमणियता,सौंदर्य अशा तिनही गोष्टींनी सुसंपन्न अशा त्या मंदिर आवारात पोहोचताच राम नामाचा एकच जयघोष झाला.. भरभर पावलं पडत होती..मधे मधे सिक्यरिटी चेकिंग होत होते.....
 अविस्मरणीय तीर्थयात्रा भाग १ - सौ. स्वरूपा कुलकर्णी           कुठल्याही अनुभवाला प्रभावीपणे शब्दांकीत करण्यासाठी प्रतिभा शक्तीचा हात असतो म्हणतात.. देवी शारदेला वंदन करून मी ह्या तीर्थयात्रेचा अनुभव शब्दांकीत करत आहे..साधारण मे महिन्यातच आमचं अयोध्या दर्शन यात्रेचा विषय निघाला. राम हे माझं आवडतं दैवत त्यामुळे मी नाही म्हणन्याचा प्रश्नच नव्हता..लवकरच टिकीट बूक झाले व आम्ही यात्रेच्या तयारीला लागलो.. माझे आई वडील मुली व इतर कुटूंबीय असे २३जणांची यात्रा ठरली.. यात लहान मोठी अगदी शाश्वत (वय वर्षे अडीच)ते ७१ वर्षाचे मामा असे आम्ही तिन पिढ्यातले सदस्य यात्रेत होतो..प्रवास रेल्वेने होणार होता म्हणून जय्यत तयारी होती.. खाण्याचे पदार्थ, फळे, पावसाळा आहे म्हणून छत्र्या, रेनकोट, स्वेटर , कपडे, सर्व गरजेच्या वस्तू घेऊन आमचा लवाजमा १ तारखेला रात्री ९ वाजता पुणे स्टेशनला पोहोचला.. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह होता..पण रेल्वे १ तास लेट आली नी आम्ही थोडे हिरमुसलो..शेवटी आमची सुपॉल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली नी हुश्श झालं.. नंतर एकेक जण रेल्वेत चढला..रेल्वेत साम...
 जे खळांची व्यंकटी सांडो....  पसायदान म्हणजे माऊलींचे भगवंताकडे कळवळून केलेले मागणे!! त्यात कळकळ तर आहेच पण एक उच्चकोटीच्या विचारधारेचा प्रवाह आहे. मुख्य म्हणजे समाजाविषयी त्यात आत्यंतिक मायेची भावना आहे. संतांचे हे चिरंजिवी लक्षण म्हणजे सर्वांविषयी कळवळा असणे, सर्वांचेच कल्याण व्हावे ही आंतरिक इच्छा असणे हे होय. ज्ञानेश्वर माऊलींच्या वैयक्तिक आयुष्यात लहानवयात फक्त अंधःकारच होता. समाजाची  "वाळित टाकलेली मुले" अशी संभावना झेलणारी आणि लहान वयातच आई वडिलांची छत्रछाया हरवलेली ही अनाथ मुले.तरीही अशा काटेरी प्रसंगातून माऊलींचा या निर्दयी समाजाविषयीचा कळवळा कुठेही कमी होतांना दिसत नाही. सज्जनांवर तर त्यांचे प्रेम आहेच पण दुर्जनांचीसुद्धा त्यांना   जास्त काळजी आहे. प्रत्यक्ष भगवंतही नाना अवतार घेऊन खल प्रवृत्तीच्या माणसांना शासन करतात पण पसायदानात ज्ञानेश्वर माऊली भगवंताकडे अत्यंत करूणार्द्र भावाने म्हणते-     जे खळांची व्यंकटी सांडो।     तया सत्कर्मी रती वाढो।     भूतां परस्परे जडो।       मैत्र जीवांचे।। 'जे खळांची व्य...
 माझे सद्गुरू स्वामी समर्थ..      माझ्या लहानपणी आमचं घर व मागे जुन्या पद्धतीचा वाडा होता..आमच्या घरात व ह्या  खोल्यांमध्ये भरपूर मोठं अंगण होतं.. तिथे नंतर फरश्याही बसवल्या गेल्या..एकूण १२ भाडेकरू इथे रहायचे.. पुर्वी घरात मोठी व्यक्ती म्हणजे आजोबा हे करारी व सर्वांना आदर वाटणारे व्यक्तिमत्व होते.. आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' म्हणायचो.. पुर्वी शेतकी खात्यात असणारे व वडिलोपार्जित शेती उत्तमप्रकारे सांभाळणारे माझे आजोबा आम्हा सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते..घरात पुर्वीपासूनच देव धर्म निष्ठेने पाळला जात होता.. अग्निहोत्र, पूजा अर्चा, संध्या वंदना, जपजाप्य, कुलाचार कुळधर्म, सोवळे ओवळे खूप पाळले जात होते.. त्यामुळे नकळतच संस्कार तसेच झाले..आई बाबाही धार्मिक वृत्तीचेच त्यामुळे जगण्याच्या शाळेत नितीमुल्यांची पकड घट्टच राहिली.. ती आजही तशीच आहे.. एक माणुस म्हणून जगतांना ही संस्कारांची रूजवणूक कायम आधार बनून आहे..स्वतःचे चुकले की आत्मपरिक्षण करायची सवय लागली.. सॉरी सहज म्हणता येतं.. चुकलेलं सहज कबुल करता येतं.. माफी मागणं म्हणजे कमीपणा असं वाटत नाही.. समोरच्याला आदर द...
 *श्री रामकथा सुफल संपूर्ण*  राम का गुणगान करीये, रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरीये...     काही अनुभव हे शब्दातीत असतात तसा काहीसा अनुभव राष्ट्र सेविका समितीच्या तीन दिवसीय रामकथेतुन मला मिळाला.राम हा आनंदाचा गाभा आहेच आणि स्मरण चिंतनातुन तन,मन,बुद्धी पवित्र करतो. ह्या रामकथेतुन मिळालेला पिंपळस ग्रामवासियांचा सहवास अनमोल होता. कथा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जसे रामाने सेतुबंधन केले व हजारो वानरांचे हात त्या कार्यास लागले तसेच राहाता शाखेच्या कार्यवाहिका व इतर सेविकांच्या परिश्रमामुळे कार्य निर्विघ्न पार पडले.        तीन दिवसीय कथा करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. रामेश्वर महादेवाच्या पावन सहवासात वाल्मिकींची गोड रामकथा सांगण्याचे भाग्य लाभले हे केवळ वर्णनातीत! गावातील वृद्ध महिलांनी पहिल्या दिवशी अनेक भजनं गायली. त्यात त्या तन्मय होवून गेल्या होत्या. सर्वांनाच कथेत रामजन्माचा आनंद मिळाला. श्रोत्यांची एकुण संख्या ४४ होती. लहान मुलींचीही उपस्थिती होती. संघबंधूंचेही माईक व्यवस्थेत सहकार्य लाभले. दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवरात तिची सासरी पाठवणी हो...
 #अक्षरधनकथास्पर्धा२०२६  विषय- चरित्रात्मक कथा  "सखू ए सखू..कुटं हाईस?"     राधाक्का आवाज देत हुती. पायऱ्या चढतांना त्यास्नी धाप लागली. सखू वरच्या माडीच्या खोलीत आरश्यात बघुन हासत हुती. राधाक्कानी तिचं ध्यान पाहिलं नी खस्सकन हातातली लाली घेतली नी वरडली.    " सखे, परिक्षा जवळ आली नी तू हितं थोबाड रंगवत बसलीस.. काय म्हणावं बाई..कसं व्हायचं सखे?" राधाक्कानी कातावून तिच्याकडं पाहिलं.      " आक्के आगं तिकडं मैतरणी यात्रेला जायाची तयारी करत्यात. मीच काहुन आभ्यास करू, सांग की गं?"       लाडालाडात सखू राधाक्काला इणवू लागली.       " आगं पोरी नानांनी एव्हड्या हौसेनं तुला शिक्षणासाठी कालेजात पाठिवलं आन् तू परिक्षेलाच आभ्यास करीनास..आगं पास न्हाय झालीस तर मी नानांना तोंड कसं दाखवू. लई आपेक्षा हाय तुझ्याकडून सखू. दाद्याला शिक्षणाला तालुक्यात ठेवलंय हे म्हाहीती हाय नवं. तुझ्या नानांना किती हौस शिक्षणाची बाई. थोडी तरी लाज ठेव"       सखू फुरंगटली.तिचं आभ्यासात काई मन रमत नव्हतं. पण नानांच्या हौशेखात...
 आई     - सौ. स्वरूपा कुलकर्णी     आज ठरवलं तुझ्याबद्दल लिहावं.. नेहमी सगळ्यांबद्दल लिहीते आज तुझ्यावरही लिहीता येतं का ते बघावं.. नेहमीप्रमाणे मोबाईलवर बोटं फिरवत राहिले..पण .. पण लिहू कशाकशावर असा विचार येताच मन गलबलून गेलं..खरं सांगते डोळ्यात पाणीच आले..किती सात्विक तुझा चेहरा पटकन समोर आला..जसं तूझा चेहरा नजरेसमोर आला तसं माझं बालपण आठवलं.. किती सुंदर दिसायचीस.. साधी कॉटनची साडी, मोठं ठसठशीत कुंकू, काळेभोर डोळे, दाट काळ्या भिवया, गहूवर्णी पण तुकतूकीत तेजस्वी चेहरा जणू रेणुकामातेचंच प्रतिबींब.. गळ्यात काळ्या मण्यांचं सुंदर मंगळसुत्रं, अतिशय सज्जन भोळा स्वभाव असं सगळं सगळं डोळ्यासमोर आलं.. किती सुंदर भजनं म्हणायचीस..त्यातही रेणुकामातेचं " माहूरगडावरी गं माहूरगडावरी गं तुझा वासं" हे भजन किती तन्मय होऊन म्हणायचीस.. नवरात्रात व इतरही कुलधर्मात तुझी लगबग, काळजी आजही आठवते.. तू आम्हाला मारल्याचं कधी आठवत नाही... शाळेत एकदा मला त्रास दिलेल्या एका मुलीला मारल्याचं आजही आठवतं.. किती चिडली होतीस तिच्यावर की माझ्या लेकराला का मारलंस म्हणून..     तुझं प्रेम, तु...
 *मन तृप्तं झाले आहे तुझ्या* *दर्शने।*  - सौ. स्वरूपा कुलकर्णी             जेंव्हापासून समज आली तेंव्हापासून( माहेरील )घरातील धार्मिक वातावरणाचा मनावर घट्ट पगडा  होता व आजही आहे. मनाची घडणच इतकी सुंदर झाली की साधू संतांचे विचार, भक्तिगीते, गीता, रामरक्षा पठण , सत्संग यामुळे मन सतत अंतर्मुख होत गेलं. ही किमया माझ्या आजोबांची व आई बाबांची!            लहानपणापासूनच तिर्थयात्रांना अनेकवेळा जाणे झाले.तो प्रत्येक अनुभव  वेगळा आहे. मध्यंतरी आळंदी व देहूला जाण्याचा योग आला.तो अनुभव खरं तर शब्दात मांडणं कठिण आहे. कारण संतांचा सहवास आत्मिक पातळीवर समाधान देणारा असतो. तो शब्दांनी व्यक्तं करता येणार नाहीच. पण तरिही निर्गुण निरहंकार परमात्म्याला आपण सगुण रूपात पान फुले वाहतोच ना तशी ह्या अनुभूतीला शब्दबद्धं करण्याचा प्रयत्न आहे.       **देवाचिये द्वारी उभा* *क्षणभरी।तेणे मुक्ति चारी* *साधियेला।हरी मुखे म्हणा हरी* *मुखे म्हणा।पुण्याची* *गणना कोण करी।।*  *     ज्ञानोबा माऊली सहज ओवी लिहून...
 ...तुझे नक्षत्रांचे देणे -सौ. स्वरूपा कुलकर्णी       काही माणसं आपल्याला प्रत्यक्ष भेटलेली नसतात पण तरी ती आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग असतात. तशीच लता आणि आशा! दोघीही किती महत्वाच्या हे सांगता येणार नाही. मागे लता गेली तेंव्हा जसा गाभाऱ्यातला देवच हरवला अशी अस्वस्थता आली, आज तरूण कोवळ्या पालवीला अचानक सुकलेलं पाहिल्यावर जी तगमग होते तशी काहीशी स्थिती झाली. रोजच्या जगण्याला ज्या अमर स्वरांची सवय आहे ते स्वर लताचे नी आशाचेच!          मागे उभा मंगेश गातांना तिची तन्मयता, अभी न जाओ छोडकर म्हणतांनाची शब्दातील ओढ, तरूण आहे रात्र अजुनी म्हणनारी रोमॅंटिक आशा, केंव्हा तरी पहाटे ची लयबद्ध आशा, चांदणे शिंपीत जाशी मधली निळावंती आशा, ऋतू हिरवा मधिल तिच ती नववधू आशा!तिची अप्रतिम गायकी हे  स्वर्गसूखच! ती गायली नी निर्जीव वस्तूंनाही नाचावं वाटलं, डोलावं वाटलं, निसर्गही अधिक तरूण वाटला.. ती तारूण्याचा अमर शेला लेवून आलेली स्वरसम्राज्ञी होती. काय नव्हतं तिच्या गायकीत.. रंग, रूप, स्पर्श, रस, गंध ...सगळी ज्ञानेंद्रीय तृप्त करणारं रसायन तिच्या गायनात होतं....
 महाशिवरात्री - एक दैवी अनुभव - सौ. स्वरूपा कुलकर्णी    सर्व देवांमध्ये सर्वात लवकर पावणारा देव म्हणजे महादेव!.. सांब सदाशिव भोळा म्हणून भक्तांना अधिक प्रिय.सर्व पर्वांमध्ये माघ मासातील महाशिवरात्रीचे पर्व हे  अध्यात्मिक पर्व असते. संसार सागरात गटांगळ्या  खाणाऱ्या प्रत्येक जीवाचा आधार बनते. महाशिवरात्र ही शिवाच्या मंगल, पवित्र लिंगाची शुद्ध भावनेनी बांधलेली पूजा..निर्गुण निराकार शिवतत्व हे परमात्म बीज आहे. तेथे मी- तू पणा न राहाता सारे विश्वच शिवमय होते.ओम् नमः शिवायचा जप केल्याने या अद्वैत अनुभूतीची अत्यंत तीव्र स्वरूपात अनुभूती येते.       आज दुपारी जवळच्याच पंचमुखी महादेवाची जल व दुग्धाभिषेकाने पूजा करण्याची संधी मिळाली. अत्यंत पवित्र स्पंदनात मन शिवरूप झालं..तसेच सायंकाळीही पिंपळसच्या रामेश्वर शिवलिंगाच्या दर्शनाचा योग आला.ही खरोखर शिवकृपाच! बेल- फुल, जल अर्पण करून शिवलिंगाच्या पवित्र व तितक्याच तीव्र स्पंदनामुळे तन मन एकरूप होऊन शिवध्यानात निमग्न झाले.जणू मनातील शुभ संकल्पाला शिवजी त्यांच्या सेवेची संधी देऊन पूर्णत्वाचीच हमी देत होते. मनाने न...
 #प्रेम      - सौ. स्वरूपा कुलकर्णी    प्रेम...       म्हंटलं तर भावना...              म्हंटलं तर पवित्रता..         किंवा त्याग...        अद्वैत..        समर्पण..        आनंद..        अस्तित्व..         जीवन...    खरं तर प्रेम ही अनुभवण्याची, अनुभूतीची गोष्ट आहे..कितीही सांगून, मोठ मोठी ग्रंथसंपदा धुंडाळूनही शिल्लकच राहाते अशी गोष्टं आहे.. ज्याला प्रेम या गोष्टीची अनुभूती आली त्याचे जगणे नक्कीच वेगळे असते..चारचौघांसारखेच पण निराळे..जेंव्हा जगण्यात प्रेम येते तेंव्हा कधीकधी आकर्षणाचे रूप भासते..कधी कधी तर ओळखणेही शक्य नसते..पण आकर्षण, आभास, त्रास, दुःख, विरह, वेदना यापलिकडे जाऊन प्रेमाचं एक मोठं व वेगळं अस्तित्व आहे..जसजसे तुम्ही आत आत खोल जाता प्रेमही त्यांच्या विविध रंग- ढंगात तुम्हाला खोल नेत रहाते..जितकं समृद्धं तुमचं प्रेम तितकीच समृद्ध जगण्यातली समज..प्रेम ही भव्य ईश्वरी चेत...
 सूर्यदेवता -©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी    आदिदेव नमस्तुभ्यम् प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यम् आदिदेव नमोस्तुते।।     दररोज सकाळी देवपूजा झाली की तुळस पूजन आणि नंतर सूर्यदेवाला नमस्कार करतांना हा श्लोक मी म्हणते.खरंच सांगते रोज उगवणारा तोच सूर्य मला नित्य नवाच वाटतो. नवी स्फुर्ती,ताजेपणा, उत्साह, सकारात्मकता, प्रसन्नता हे सगळं त्या सुर्यदर्शनाने प्राप्त होतं.१ ते २ मिनीटं मी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेऊन सूर्याला वंदन करते. पण तो दर्शनाचा सुखद अनुभव मी अंतःकरणापासून अनुभवते. किती आनंद मिळतो ते शब्दात बांधता येणार नाही. ती तेजस्वी आभा मनावरील मळभ क्षणात दूर करते.त्या सकाळच्या तेजस्वी तरिही तितक्याच उबदार सूर्यदर्शनाने दिवसाची सुरूवात फार प्रसन्न होते. सूर्याला पाहिलं की माझं मन श्रद्धा व भक्तीने भरून जातं. किती निरपेक्षपणे जगाचा व्यापार चालवणारा हा जगाचा मालक आपल्या केवळ असण्याने जगाची सर्व यंत्रणा सांभाळतो. सूक्ष्म जीवांपासून ते मानवापर्यंत सर्वच सजिव सूर्यामुळेच जिवंत रहातात. सूर्य नसता तर असा विचार केला की कळतं सूर्य काय गोष्ट आहे ते. तो नसेल तर जग अंधःकाराच्या...
 #गोवा #आठवणी - सौ. स्वरूपा कुलकर्णी     मला लहानपणापासूनच प्रवासाची आवड. आई बाबांसोबत अनेकदा प्रवास घडले. आजवर काही तिर्थयात्रा , काही सहली नातेवाईक तर काही नवऱ्यासोबत अनुभवल्या. पण एकट्याने प्रवासाचे योग तसे कमीच आले. प्रवासांमध्ये सुंदर हिंदी व मराठी गाणी ऐकणे किंवा भेंड्या खेळणे हे माझं अत्यंत आवडतं काम असायचं व आजही आहे. त्यामुळे प्रवास सुंदर होतोच पण मनाच्या सुंदर सुंदर अवस्थाही कळायला लागतात व अधिकच प्रसन्नता अनुभवायला मिळते.         कॉलेजमध्ये असतांना एकदा अचानक गोव्याला जाण्याचा योग आला.कॉलेजची ट्रीप होती.अतिशय सुंदर नियोजन करून कॉलेज लेकिचरर व मित्र मैत्रिणींसोबत ट्रीपला जाण्याची जय्यत तयारी केली. गोव्याला जाण्यापूर्वी मनात गोव्याच्या बीचबद्दल, तिथल्या माश्यांबद्दल,चर्चेसबद्दल, टूरिस्टचा हॉटस्पॉट असल्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. कोकणसारखी तिथेही लाल माती आहे हे नुसतं ऐकून होते. पण जेंव्हा गोव्यात प्रवेश केला तेंव्हाचा अनुभव हा केवळ शब्दातीत! तिथल्या हवेतच झिंग आहे..ती कदाचीत तिथला माणूस दारू प्रिय आहे किंवा इतरही बऱ्याच गोष्टी असतिल पण गोव्य...
 खण व आपली संस्कृती - सौ. स्वरूपा कुलकर्णी    आपल्या महाराष्ट्रात ज्या सुंदर परंपरागत व सांस्कृतिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात त्यात वस्त्र ही कला प्रामुख्याने पहायला मिळते. जी परंपरागत तर आहेच पण अत्यंत वैविध्यपूर्ण व सुंदर धाग्यांनी विणलेली साधी भोळी, शालीन मराठी संस्कृती देखिल आहे. त्यात रंगांचे वैविध्य, कलाकुसर,आईचा उबदार स्पर्श, मऊपणा आहे. इतर वस्त्रांपेक्षा वेगळं असल्याची खूण मिरवणारा हा 'खण' परिधान केला की मी मराठी असल्याचा एक वेगळाच अभिमान मिरवता येतो हे वैशिष्ट्यदेखिल आहे.      खणनारळानं देवीची ओटी भरली जाते हे आईचं लहानपणी खूप वेळा ऐकलेलं वाक्य व आईला प्रत्यक्ष देवीला पूजतांनाही अनेकवेळा पाहिलं होतं. तेंव्हाच ह्या 'खणाचं' महत्व माझ्या मनावर कायमचं गोंदलं गेलं होतं. लग्नानंतर अनेक प्रसंगात हा 'खण' मला भेटत गेला.पहिल्यांदा घेतलेली जांभळ्या रंगाची व लाल काठ असलेली मैत्रिणींच्या आग्रहास्तव नेसलेली खणाची साडी मी जपूनच वापरते हां. आणि हो Womenia ही आधुनिक मराठी स्त्रीचा नथीचा साज घेऊन नटलेली पिवळी व जांभळ्या काठाची खणसाडी कायमच मैत्रिणींमध्ये भा...