#अक्षरधनकथास्पर्धा२०२६
विषय- चरित्रात्मक कथा
"सखू ए सखू..कुटं हाईस?"
राधाक्का आवाज देत हुती. पायऱ्या चढतांना त्यास्नी धाप लागली. सखू वरच्या माडीच्या खोलीत आरश्यात बघुन हासत हुती. राधाक्कानी तिचं ध्यान पाहिलं नी खस्सकन हातातली लाली घेतली नी वरडली.
" सखे, परिक्षा जवळ आली नी तू हितं थोबाड रंगवत बसलीस.. काय म्हणावं बाई..कसं व्हायचं सखे?" राधाक्कानी कातावून तिच्याकडं पाहिलं.
" आक्के आगं तिकडं मैतरणी यात्रेला जायाची तयारी करत्यात. मीच काहुन आभ्यास करू, सांग की गं?"
लाडालाडात सखू राधाक्काला इणवू लागली.
" आगं पोरी नानांनी एव्हड्या हौसेनं तुला शिक्षणासाठी कालेजात पाठिवलं आन् तू परिक्षेलाच आभ्यास करीनास..आगं पास न्हाय झालीस तर मी नानांना तोंड कसं दाखवू. लई आपेक्षा हाय तुझ्याकडून सखू. दाद्याला शिक्षणाला तालुक्यात ठेवलंय हे म्हाहीती हाय नवं. तुझ्या नानांना किती हौस शिक्षणाची बाई. थोडी तरी लाज ठेव"
सखू फुरंगटली.तिचं आभ्यासात काई मन रमत नव्हतं. पण नानांच्या हौशेखातर लग्न जमोस्तर कालेजात जावं लागणार हुतं.राधाक्कासमोर पुस्तक तोंडासमोर धरून ती बसली खरी पण मनात महादूचेच विचार येत हुते.. तो कॉलेजातला तरणाबांड, हुशार पोरगा हुता. तरी तिला तो लई आवडायचा. त्याची हासण्याची स्टाईल तिला लई झाक वाटायची.
कालेजचे परिक्षेचे दिस जवळ आले.शेवटचा पेपर हुता.आज तीनं जास्तच नट्टापट्टा केला. राधाक्काला संशय आला खरा पण सखू त्यांच्या व नानांच्या पाया पडून आशिर्वाद मागू लागली ते हसतमुखानं तिला मुखभर आशिर्वाद देत ऱ्हाईले. लाहानपनापासून सखूला लई लाडाकोडात वाढवली. तशी ती समंजस पण अल्लडच हुती. आजुन लोकांची नजर दुनियादारी तिला कायबी कळत नव्हती.ती महादूच्या नादी लागून त्याच्या प्रेमात येडी झाली हुती. आज तिनं नी त्यानं पळून जाऊन लगिन करायचं ठरविलं हुतं. पण घरात पत्ता नव्हता. नानांनी या लग्नाला परमिशन दिलीच नस्ती हे तिला माहीत हुतं. डोळे भरून सगळं घर , नाना व राधाक्काला पाहून ती रिक्षात बसली. इकडं महादू वाटच पहात हुता.
" आलिस का जानेमन." महादू बेफिकरीत हसला. त्याच्या बेफिकीर हसण्यावर ती फिदा हुतीच. क्षणात घरच्यांचा इसर पडला. रिक्षातुन उतरली नी धावत जाऊन त्याच्याकडं गेली. गळ्यातच पडली.
" आगं समदं प्रेम हितच करणार का? लोक बघतिल ना"
असं म्हणत साळसूदाचा आव आणत तिला आपण कोर्टात जाऊ म्हनत मोटरसायकलवर बसविलं. ती मनात सुखी स्वप्न रंगवत त्याच्या मागे बसली. त्याच्या घरच्यांचीही ह्या लग्नाला परवानगी नव्हतीच.
सखू हसत त्याच्या हातात हात घालून चालली हुती.तो बराच शांत हुता पण ती नुस्ती खिदळत चालली हुती. पुढे येणाऱ्या संकटांची तिला काहीबी कल्पना नव्हती. तो तिला घेऊन रूमवर आला. ती १८ वर्षाची तरूण पोरगी नुकतीच कॉलेजात जात व्हती. पण महादूला पाहून वेडी झाली हुती. आज आपण कोर्टात त्याच्याशी लगिन करणार या खोट्या आशेनं आणलं हुतं. पण महादू आधिच १०- १२ लफडी करून बसला हुता. सखूच्या गोऱ्या शरीरावर भाळून तिला खोट्या लग्नाचं आमीष दाखवत हुता.सखूच्या भोळ्या स्वभावामुळं ती त्याच्या जाळ्यात पुरती फसली हुती.
पण गावातल्या पाटलाच्या दादूची नजर महादूवर हुतीच.दादू गावातला अतिशय सज्जन पोरगा हुता. शिक्षणात हुशार आनी समाजसेवेत पुढं. महादूची पोरींना आपल्या जाळ्यात आणन्याची रीत त्याला ठावूक हुती. यावेळी त्यानं महादूला रंगेहात पकडायचच म्हून ठरिवलं.
महादूनं सखूला रूमवर बसवलं नी बाहेर जाऊन सगळं ठिक हाय ना हे पाहिलं. मग आत येवून कडी लावली.तिला कळेना हा यव्हडा शांत कसा. सखूला त्याचा चेहरा काईतरी येगळाच वाटला.. हा आपला महादू नाही असं तिला वाटून गेलं. तिच्या जवळ येत त्यानं तिची साडी ओढायला सुरवात केली. ती घाबरून किंचाळली. दुर्दैवाने तिला फार उशिरा सोताची चुक लक्षात आली. हा आपल्या लायकीचा न्हाय हे तिला समजलं.. पशुवानी त्याने तिच्यावर झडप घातली. तोपर्यंत तिनं खूप आरडा ओरडा केला पण काही उपयोग नव्हता. तो तिचे लचके तोडायला लागला. तिनं घाबरून गावच्या रामाचा धावा करायला सुरवात केली. तीला अर्ध उघडं करण्यासाठी तो धावलाच होता पण तेव्हड्यात पोलीसाच्या गाडीचा सायरन वाजला.. सगळीकडून धाड पडली. पोलीसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.तोपर्यंत ती देवाचं नाव घेत अर्धमेली झाली हुती. दादूनं तिला कपड्यात सावरून महिला पोलीसाकडं सोपवलं. महादूला अटक झाली. दादूनं कम्प्लेंट लिहीली हुतीच. साऱ्या गावाला बातमी कळली. राधाक्का बातमीनं बेशुद्ध झाली. नाना सुन्न झाले.
सखूच्या मैतरणी घाबरून गेल्या हुत्या.गावात चर्चेला उधान आलं हुतं. दादूचं सगळीकडं कौतूक झालं हुतं. इकडं सखूला कसबसं घरी आणलं. कित्येक दीस ती बोलत नव्हती. राधाक्का नी नाना कोलमडून गेले होते. एकुलत्या येक पोरीच्या नशीबात काय लिहीलंय त्यांना कळत नव्हतं.
येक दिवस दादू सखूला भेटायला घरी आला. नाना पोरीच्या चिंतेनं काळेठिकर पडले हुते. तो काळजीनं त्यांना म्हणाला,
"नाना, पोरीची कायबी काळजी करू नकासा. देव सगळं नीट करील"
नानांनी दादूचं तोंडभरून कवतूक केलं. आणि डोळ्यात पाणी आनून ते बोलले,
" तू नस्तास तर माझ्या पोरीला कुणी वाचवलं अस्तं बाबा. पण मी बाप हाय तिचा.. आता कसं करू. कोण तिच्याशी लगिन करंन? तिचं भविष्य काय हाय आता?
ते बोलनं ऐकून दादूच्याही डोळ्यात पानी आलं. शांतपणे विचार करून त्यानं नानांसमोर विचार मांडला.. " नाना तुमची परवानगी आसन तर मीच करीन तिच्याशी लगिन. सखूला मी सुखात ठेविन" नाना शांतच झाले. त्यांना काय बोलावं सुचेना. रडून डोळे सुजलेले नाना दादूला आभारासाठी हात जोडत
" लई लई आभारी हाय दादुसा.. लई पुन्याचं काम करताय.. माझं कुळ धन्य हुईल आसा जावई मिळाला तर"
राधाक्काने पदर पसरले दादूने दोघांनाही उठवलं. त्यांना नमस्कार केला. थोड्याच दिवसात लगिन ठरलं नी साधेपणाने रामाच्या मंदिरात लगिन लागलं. दोघेही सुखी झाली. रामच पावला.सखू सुखाने सासरी नांदायला गेली. रामासारखा जावई मिळाला म्हून नाना व राधाक्का धन्य झाली.
नाव- सौ. स्वरूपा कुलकर्णी
पत्ता- ता. राहाता, जि. अहिल्यानगर ४२३१०७
Comments
Post a Comment