Posts

Showing posts from April, 2024
 कृष्णसखा!!      ©️®️✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी       " तू कृष्ण कधी बघितलायेस का गं?"   सलोनी तिला विचारत होती. सईने क्षणभर तिच्याकडे नी क्षणभर मनातल्या कन्हैय्याला पाहून घेतले.." सलोनी, अगं श्याम तर माझ्या मनात रहातो, तनात रहातो..मी तर त्याला स्वतःपासून वेगळं समजतच नाही गं..तू विचारतेस बघितला का? अगं तोच तर चालवतोय हा देह..तुझा देह , माझा देह सर्वांचा देह..त्याला माझ्यातून ह्या सगळ्यातून वेगळं कसं काढू? सांग ना"   सलोनी हसत म्हणाली, " अच्छा म्हणजे तुला नाही भेटलाय अजुन".. सई म्हणाली," अगं तसं नाही गं".  सलोनी म्हणाली,"मग का नाही आजकाल हसत, नाचत गात तू मंदिरात..तुझ्याशिवाय तो मंदिरातला भजनाचा कार्यक्रमही सुना आहे सई..तू नसलीस की मन उदास होतं.." " तू कश्शी मनकवडीयेस गं, कसं कळतं तुला माझ्या मनीचं गुज..तूझं खरंय हर एकांती मी त्याचाच विचार करते पण अजुनही मन स्थिर नाही.त्याला सगुणरूपात भेटावं, पहावं ही सुप्त इच्छा मध्येच डोकं वर काढते बघ..अश्शावेळी नको तो श्रृंगार, नको ते जेवण, नको ते भजन, काही काही नको मला..तोच हवा हीच इच्छा तीव्र ह...
 उठी रे रामा रघुत्तमा... ©️®️  सौ. स्वरूपा कुलकर्णी उठी रे निलमेघश्यामा कौसल्येच्या सुखधामा, आला रवी तुझ्या दर्शना उघडी नेत्र बा रघुत्तमा।। प्राची कोवळी सोनसकाळी राम राम म्हणते गोजिरी, तूला पाहण्या येती रामा पक्षी सुंदर गवाक्षातुनी ।। भाट सारे गाती भुपाळी फुले उमलती निळीजांभळी, तुझ्यास्तव गाती भ्रमर बावरे मत्त मयुर करी नृत्य ते पहा।। तूला पाहूनी मंचकावरी धन्य झाली कौसल्यामाई, किती सुंदर तव नेत्रद्वय ते निळ्या नभाचे दर्शन होई।। तू राजा या अयोध्यापुरीचा वाढव गौरव रघुकूलाचा, तूला पाहण्या आतुर अवघी चराचर सृष्टी परमेशाची।। तुझे स्वागत करण्या आतुर दिशा साऱ्या पहा उमलती, सुगंध कमलदलांचा दरवळे नाजुक सुंदर चरणयुगूलांशी।। दे दर्शन तव भक्तजनांना उत्सुक सकल सृष्टी ही रामा, भेटाया तूज आतुर आम्ही सोड निद्रा पाहू दे मुखकमला।।