उठी रे रामा रघुत्तमा...


©️®️  सौ. स्वरूपा कुलकर्णी



उठी रे निलमेघश्यामा

कौसल्येच्या सुखधामा,

आला रवी तुझ्या दर्शना

उघडी नेत्र बा रघुत्तमा।।


प्राची कोवळी सोनसकाळी

राम राम म्हणते गोजिरी,

तूला पाहण्या येती रामा

पक्षी सुंदर गवाक्षातुनी ।।


भाट सारे गाती भुपाळी

फुले उमलती निळीजांभळी,

तुझ्यास्तव गाती भ्रमर बावरे

मत्त मयुर करी नृत्य ते पहा।।


तूला पाहूनी मंचकावरी

धन्य झाली कौसल्यामाई,

किती सुंदर तव नेत्रद्वय ते

निळ्या नभाचे दर्शन होई।।


तू राजा या अयोध्यापुरीचा

वाढव गौरव रघुकूलाचा,

तूला पाहण्या आतुर अवघी

चराचर सृष्टी परमेशाची।।


तुझे स्वागत करण्या आतुर

दिशा साऱ्या पहा उमलती,

सुगंध कमलदलांचा दरवळे

नाजुक सुंदर चरणयुगूलांशी।।


दे दर्शन तव भक्तजनांना

उत्सुक सकल सृष्टी ही रामा,

भेटाया तूज आतुर आम्ही

सोड निद्रा पाहू दे मुखकमला।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न