Posts

Showing posts from September, 2026
 सुखकर्ता दुख:हर्ता🙏 - सौ. स्वरूपा कुलकर्णी      श्रीगणेश ही सकल विद्या, कला आणि सद्बुद्धीची देवता आहे. तिची उपासना ही मनुष्यमात्रांसाठी अत्यंत महत्वाची उपासना आहे. कारण, मनुष्य कितीही मोठा, श्रीमंत असला तरी सद्बुद्धी नसेल तर दोन्ही डोळे असून आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणजेच शक्ती व ऐश्वर्य असुनही माणूस सद्बुद्धीविना लंगडाच रहातो. आजची सामाजिक परिस्थिती ही अशिच विचीत्र परिस्थिती आहे. वैचारिक गोंधळात सत्य काय असत्य काय किंवा चांगले काय व वाईट काय याचा बोध सामान्य माणसाला होत नाहीये.वैचारिक मतभेदांचा महापूर आलाय. माणूस पैसा ढीग कमावतोय पण मनःस्वास्थ्य हरवलंय. माणूस मनुष्यत्व हा त्याचा पहिला धर्म विसरून कमालिचा यांत्रिक आणि एक्कलकोंडा होत चाललेला आहे. आधुनिक जगाची समस्या ही आहे की सगळं असून हातात काहीच नाही. म्हणजे सर्व आधुनिक संसाधनांनी परिपूर्ण असुनही माणूस मनावर अधिराज्य मिळवू शकलेला नाही, तो मनाचा गुलामच आहे. मन विकांरांनी भरलेलं आहे, बुद्धीला ग्रहण लागलेलं आहे आणि शरिर कमजोर होत चाललेलं आहे. ही परिस्थिती सुखोपभोगाच्या नादी लागून तयार झालेली मनुष्याची स्वनिर्मित "...