ऋणानुबंध
- सौ.स्वरूपा कुलकर्णी " सरस्वती, ए सरस्वती , आज रखमा शाळेत न्हाई गेली का गं? " धुणं धुता धुता सरस्वती म्हणाली," राधाक्का, पोरगी मोट्ठी व्हाय लागली. ती जर साळा शिकत बसली तर मला मदत कोन करील?मीच म्हनलं तिला नको जाऊस साळात" राधाक्का बोलल्या, " अगं सरस्वती, पोरगी शिकली तर तिला मोठं ठिकाण मिळल तिचं कल्याण होईल..अशी तिला कामाला जुंपून का तिच्या भविष्याच्या आड येतिस..मी सांगते नं तुला मी भरीन तिची फिज..नको तिचं शिक्षण थांबवूस"... सरस्वतीचे डोळे पाण्याने डबडबले.." राधाक्का, तुमचा साऱ्यात जीव..किती करताल म्हायासाठी..माझ्या नवऱ्याला दारूतून सोडिवलं..मोठ्या पोरास नोकरी लावून दिली...येव्हडं आभाळावानी मन तुमचं आक्का..कसं पांग फेडू?" राधाक्का सरस्वतीच्या जवळ आली. तिला म्हणाली, " सरस्वती, अगं, पोटचं पोर नाही मला जीव लावायला..तुझी पोर ती माझी पोर समजते बघ मी...तुझ्या रखमात मला माझीच पोर दिसते बघ.." सरस्वतीने डोळ्याला पदर लावला.राधाक्काचे डोळे डबडबले.. सारं सावरगाव राधाक्काला तिच्या प्रेमळ...