जय रघुनंदन जय श्री राम। ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी पंडीत भिमसेनजींचं 'राम का गुणगान करीये' ऐका की देवकी पंडीतांचं 'जय रघुनंदन जय श्री राम' ऐका किंवा 'कौसल्येचा राम बाई' किंवा संपूर्ण गीत रामायणातील कोणतेही गीत ऐका सर्वच गीतं ज्या रामप्रेमाने ओतप्रोत भरलीयेत त्याला तोडंच नाहीये.ही गीते केवळ गीते नाही तर भक्तीप्रेम व्यक्त करणारी, रामरायाला तन्मयतेने आळवणारी स्नेह कवनेच आहेत.ऐकतांना डोळ्यासमोर नकळत तो राम उभा रहातो..कसा होता राम? श्यामल तनू असलेला, ...मोठे मोठे कमळासारखे पाणीदार नेत्र असलेला,....विशाल भालप्रदेश,..... नासिका अतिसरळ,... ओठ तर लाल फुलाच्या दोन पाकळ्या एकमेकांवर ठेवाव्यात तसे सुंदर,... लालसर, पातळ ओठ,....गाल तर लालसर निळे,... कान तर शंखाकृती,...त्यात सुंदर कुंडले,... मस्तकावर सुंदर काळे केस,.... बाकी शरीराची वर्णने ही तर शब्दातीत, ...हातात धनुष्य बाण घेऊन सदैव भक्तरक्षणासाठी सज्ज असा माझा राम,... हात आजानुभूज, ...छाती भरदार व विशाल, ...अंगावर सुंदर गुलाबी उत्तरीय,...गळ्यात सुंदर सोन्याचे अलंकार, ...बाहू पिळदार,... अंगकांती निळसर सुंदर,... कमर...
Posts
Showing posts from March, 2023
- Get link
- X
- Other Apps
सौ.स्वरूपा कुलकर्णी रंगात रंग तो श्यामरंग मी पाहण्यासी आतुरले भिजलेल्या राधेची अवस्था कुणासही ना कळे कोठूनी आला कुठे लपला झाला दृष्टीआड क्षणातही मी बावरी राधा पहाते रंग चहुकडे श्याम नाही तो दिसला परत अचानक घेऊनी हाती रंग कोरडे क्षणात आला जवळी माझ्या डोळे भिडले परस्परांचे मी पाही श्याम एकटक तोही हसरा उभा तटस्थ डोळे बोलती मन्मथ साजिरे क्षण साधाया आतुर झाले रंगात बुडवूनी मज एकलीला झाला अदृश्य अचानक गेला मी उभी रंगाने भिजली उरला मनी श्यामरंग गहिरा
- Get link
- X
- Other Apps
'तस्मैश्री गुरवे नमः। ' ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी "गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय । बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥" - संत कबीरांची ही वचने बर्याच जणांना माहीत असतील. याचा अर्थ गुरू व प्रत्यक्ष परमेश्वर अर्थात गोविंद जर एकाच वेळी समोर उभे राहिले तर प्रथम कोणाला वंदन करणार? मी तर गुरूंनाच वंदन करेन कारण तेच मला परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता दाखवतात. किती सुंदर ही वचने ज्यात गुरूभक्तीचे महत्त्व सहज शब्दात सांगितले आहे. गुरू या शब्दाचा अर्थ होतो अंधःकार दूर करणारा, जो आपल्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधःकार दूर करतो तो गुरू असतो. लौकिक व्यावहारात गुरू आपण करतो. म्हणजे शाळेत जातो मग शिक्षक असतात ते आपले व्यावहारातले गुरू, परंतु, अध्यात्माच्या प्रांतात गुरू कधी केला जात नाही. तो होतो. ही होण्याची प्रक्रिया प्रत्येक गुरू स्वतः साधकाच्या आयुष्यात येऊन करतो. म्हणजेच स्वतः शिष्याला अनुग्रहित करतो. त्यासाठी शिष्याला कुठेही भरकटत जायची गरज नसते. ही खरी गुरूपरंपरा. अध्यात्मात साधकाला मुक्तीच्या दिशेने नेणार्या गुरूला "सद्गुरू " असे संबोधन वापरले जाते.कारण...
- Get link
- X
- Other Apps
"गणपती बाप्पा मोरया" ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी वक्रतुंड महाकाय । सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरूमे देव।सर्वकार्येषु सर्वदा।। सर्व कार्यांची सुमंगल सुरूवात गणेशाच्या प्रतिष्ठापनेने होते. या मंगलमूर्तीच्या पुजनाने मन प्रसन्न होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्तांचे लाडके दैवत म्हणजे गणपती. वेदांनी या गणेशाला ओंकाररूपात पाहिले. म्हणजे या जगाची सुरूवातच गणेशापासून होते असे त्यात म्हंटले आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात करतांना ज्ञानेश्वरांनीही याच मंगलमूर्तीची विनवणी केली आहे.प्रत्येक ग्रंथाची सुरूवात ह्याच मोरयाला स्मरून होते. याचे प्रमुख कारण ही सकल सिद्धींची, कलांची देवता आहे. गजाननाला आधी वंदन म्हणजे १४ विद्या, ६४ कलांना वंदन. या कलांना विद्यांना प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास गजाननाची उपासना अत्यंत मोलाची आहे. हा सकल विद्यांचा, कलांचा स्वामी मनापासून केलेल्या उपासनेला तत्काळ फळ देतो. त्यामुळे तो भक्तप्रिय, भक्तवत्सल देव आहे. गणेश म्हणजे गणांचा स्वामी, समस्त प्राणीवर्गाचा स्वामी. त्याचेच नाव गजानन, म्हणजे हत्त...
- Get link
- X
- Other Apps
🌷नमस्तेस्तु भगवती सरस्वती🌷 ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी या कुन्देन्दुतुषार हार धवला। या शुभ्र वस्त्रान्विता। या विणावरदण्डमन्डीतकरा। या श्वेतपद्मासना। या ब्रम्हाच्युतशंकरप्रभुतिभि्र देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती। निशेष जाड्या पहा।। शुभ्र वसने धारण केलेली, चतु्रभूजा असलेली,एका हातात वेद, दुसऱ्या हातात स्फटिकांची माळ ,पुढील दोन्ही हात विणा वाजवण्यासाठी घेतलेले.. पाठीवर सुंदर मऊ केस रूळणारे, चेहर्यावर सुंदर स्मितहास्य, भाळी कुंकवाचा टिळा... अतिशय सुंदर गौर वर्ण देह, शुभ्र कमळावर बसलेली माता भगवती देवी सरस्वती ही वेदांची जननी आहे.. ही वेदमाता शब्दांना, सुरांना, वाणीला प्रसवते.. सरस्वतीचा कृपाप्रसाद असल्याशिवाय वाणी शब्दांना जन्म देऊ शकत नाही... लेखनी शब्दांना उमटवू शकत नाही.. जगाचे शाब्दिक व्यावहारही होऊ शकत नाहीत... नवनवोन्मेशषालिनी बुद्धीही आपले कार्य करू शकत नाही... अशी ही भगवती सरस्वती नित्य भक्तांना अभय देते.... दे...