सौ.स्वरूपा कुलकर्णी


रंगात रंग तो श्यामरंग

मी पाहण्यासी आतुरले
भिजलेल्या राधेची अवस्था
कुणासही ना कळे

कोठूनी आला कुठे लपला
झाला दृष्टीआड क्षणातही
मी बावरी राधा पहाते
रंग चहुकडे श्याम नाही

तो दिसला परत अचानक
घेऊनी हाती रंग कोरडे
क्षणात आला जवळी माझ्या
डोळे भिडले परस्परांचे

मी पाही श्याम एकटक
तोही हसरा उभा तटस्थ
डोळे बोलती मन्मथ साजिरे
क्षण साधाया आतुर झाले

रंगात बुडवूनी मज एकलीला
झाला अदृश्य अचानक गेला
मी उभी रंगाने भिजली
उरला मनी श्यामरंग गहिरा

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न