🌷नमस्तेस्तु भगवती सरस्वती🌷
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
या कुन्देन्दुतुषार हार धवला।
या शुभ्र वस्त्रान्विता।
या विणावरदण्डमन्डीतकरा।
या श्वेतपद्मासना।
या ब्रम्हाच्युतशंकरप्रभुतिभि्र देवै सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती।
निशेष जाड्या पहा।।
शुभ्र वसने धारण केलेली, चतु्रभूजा असलेली,एका हातात वेद, दुसऱ्या हातात स्फटिकांची माळ ,पुढील दोन्ही हात विणा वाजवण्यासाठी घेतलेले.. पाठीवर सुंदर मऊ केस रूळणारे, चेहर्यावर सुंदर स्मितहास्य, भाळी कुंकवाचा टिळा... अतिशय सुंदर गौर वर्ण देह, शुभ्र कमळावर बसलेली माता भगवती देवी सरस्वती ही वेदांची जननी आहे.. ही वेदमाता शब्दांना, सुरांना, वाणीला प्रसवते.. सरस्वतीचा कृपाप्रसाद असल्याशिवाय वाणी शब्दांना जन्म देऊ शकत नाही... लेखनी शब्दांना उमटवू शकत नाही.. जगाचे शाब्दिक व्यावहारही होऊ शकत नाहीत... नवनवोन्मेशषालिनी बुद्धीही आपले कार्य करू शकत नाही... अशी ही भगवती सरस्वती नित्य भक्तांना अभय देते....
देवी सरस्वती ही ब्रह्मलोकात निवास करते.. जगाची मुळमाया असेही तिला म्हणतात.. स्वयंशक्तीने वेद प्रसवणारी ही वेदमाता म्हणजे सर्व ज्ञानाचे भंडार आहे.. तिच्या दिव्य तेजापुढे ब्रम्हा, विष्णू, महेश नतमस्तक होतात... ती सदा प्रसन्न, हसरी, सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणारी जगन्माता आहे...
स्वरांची निर्मितीच जिच्या विणाझंकारातुन होते ती स्वरमाता जगाची खरी स्वामिनी आहे.. कारण स्वरांशिवाय, शब्दांशिवाय जग निर्माण होऊच शकत नाही... ती नादातुन जग निर्माण करते..या विश्वाच्या कणाकणात नाद भरलेला आहे..आपल्या ह्रदयाची धडधड याचं उत्तम उदाहरण आहे... मनुष्याचे सर्व व्यवहार भगवती सरस्वतीच्या हातात स्थिरावलेले आहेत...
लक्ष्मी, सरस्वती, कालिका या तिन्ही देवता मुख्य मानल्या जातात... लक्ष्मी आयुष्यात महत्वाची आहेच, परंतू, नुसती लक्ष्मी माणसाला यशस्वीता देऊ शकत नाही... खरा लढा बुद्धीचा..कारण,माणसाची बुद्धीच त्याला योग्य अयोग्याचं ज्ञान देते.. या बुद्धीचं वैभव देते ती माता सरस्वती... ती निर्मळ ज्ञान देणारी आदिशक्ती आहे,जी मनुष्याला त्याच्या मुळाचं अर्थात त्याच्या स्वस्वरूपाचं दर्शन करून देते.. ती मुळ ज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे... तिच्याशिवाय प्रत्यक्ष परब्रह्माची ओळख होऊच शकत नाही.. कालिका हे देवीचंच एक रूप आहे जी युद्धात विजयी करते, परंतू, खरा विजय तोच जिथे बळापेक्षा बुद्धिबळाची मदत घेतली जाते... शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात...
सप्तस्वरांची निर्मिती तिच्या बोटांच्या विणेवर होणाऱ्या झंकारातुन होते... ती संगीताची प्रमुख देवता आहे... देवलोकातील अप्सरा, गंधर्व,यांचा नृत्य आविष्कार,पृथ्वीवरील सर्व नाद निर्मिती तिच्या केवळ बोटांच्या हालचालीवर अवलंबून आहे... ती खरोखर सर्व कलांची जननी आहे.. तीच्या इच्छेनेच देव, गंधर्व, ऋषी,संत देवाची आळवणी करू शकतात..मनुष्यप्राणी विविध कलांनी आपले आयुष्य तिच्यामुळेच समृद्ध करू शकतात..
ही वेदगर्भा, जगतजननी, ब्रम्हसुता, आदिमाया सरस्वती हीची वंदना प्रत्येक व्यक्तीने रोज केली पाहिजे...तीच हे विश्व आपल्या संगीताने धारण करते... तीला वारंवार नमन.. तीची प्रार्थना करतांना म्हणावेसे वाटते... हे वेदांची जननी तू माते, मला ज्ञान दे, वेदांताची आवड दे.. माते मला सुंदर गळा दे ज्यातुन परमेश्वराची नित्य स्तुती झरू शकेल...माझी प्रज्ञा जागृत कर...नित्य माझ्या ह्रदयात निवास कर.... माझी प्रतिभाशक्ती हो.. मला कृतार्थ कर... हे माते, लेकराला जवळ घे तुझ्या वात्सल्याने न्हाऊ घाल...तुझ्या कृपादृष्टीने बालकाचे कल्याण कर...
जयोस्तु जननी माता सरस्वती🙏🏻🌹
Comments
Post a Comment