Posts

Showing posts from February, 2026
 #प्रेम      - सौ. स्वरूपा कुलकर्णी    प्रेम...       म्हंटलं तर भावना...              म्हंटलं तर पवित्रता..         किंवा त्याग...        अद्वैत..        समर्पण..        आनंद..        अस्तित्व..         जीवन...    खरं तर प्रेम ही अनुभवण्याची, अनुभूतीची गोष्ट आहे..कितीही सांगून, मोठ मोठी ग्रंथसंपदा धुंडाळूनही शिल्लकच राहाते अशी गोष्टं आहे.. ज्याला प्रेम या गोष्टीची अनुभूती आली त्याचे जगणे नक्कीच वेगळे असते..चारचौघांसारखेच पण निराळे..जेंव्हा जगण्यात प्रेम येते तेंव्हा कधीकधी आकर्षणाचे रूप भासते..कधी कधी तर ओळखणेही शक्य नसते..पण आकर्षण, आभास, त्रास, दुःख, विरह, वेदना यापलिकडे जाऊन प्रेमाचं एक मोठं व वेगळं अस्तित्व आहे..जसजसे तुम्ही आत आत खोल जाता प्रेमही त्यांच्या विविध रंग- ढंगात तुम्हाला खोल नेत रहाते..जितकं समृद्धं तुमचं प्रेम तितकीच समृद्ध जगण्यातली समज..प्रेम ही भव्य ईश्वरी चेत...