Posts

Showing posts from September, 2022
  ‘गर्भ’ या संस्कृत शब्दावरून ‘गरबा’ हा शब्द आला आहे. गर्भदीप म्हणजेच मातीच्या भांडय़ांचा दिवा जो मध्यभागी ठेवला जातो, त्यालाच गरबो किंवा गरबा असं म्हणतात. या मातीच्या मडक्याला छिद्र असतात व हे मडके मनुष्याच्या शरीराचे प्रतीक मानले जाते तर त्यात तेवत असलेला दिवा शुद्ध आत्म्याचे प्रतीक आहे. आत्मरूपी ज्योत तशीच तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना नवरात्रीत आदिशक्ती दुर्गामातेकडे केली जाते. नवरात्रीमध्ये असुरांवर विजय मिळवणाऱ्या, शक्तीचे, तेजाचे प्रतीक असणाऱ्या दुर्गा किंवा अंबेमातेला वंदन केले जाते. आश्विन महिन्यात येणारी नवरात्र बंगालमध्येही मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते, मात्र नवरात्रीत खेळला जाणारा गरबा गुजरातमध्येच मुख्यत्वे पाहायला मिळतो. गरबा किंवा गरबोच्या पारंपरिक स्वरूपामध्ये केवळ स्त्रिया मध्यभागी गडवी (गरबा-दीप) ठेवून त्याभोवती गोलाकार आकारात फेर धरून गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत नृत्य करीत. तर ‘गरबी’ या प्रकारात केवळ पुरुष भरपूर ऊर्जा व जोशपूर्ण नृत्य करतात. तर हातात दांडिया घेऊन खेळले जाते, त्याला ‘दांडिया किंवा दांडिया रास’ असे म्हटले जाते. गरब्याची गाणी प्...
  आजच्या स्त्रीला जिजाऊ होण्याची गरज आहे का? लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवरायांच्या माता अर्थात भारताच्या राष्ट्रमाता जिजाऊ या प्रेरणेचा जिवंत आणि सार्वकालिक स्रोत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला आणि दोघांनी मिळून स्वातंत्र्याला जन्म दिला.. त्यांच्यामुळे स्वातंत्र्याची धगधगती मशाल नव्हे तर यज्ञकुंड अवघ्या हिंदुस्तानात पेटले.          राष्ट्रमाता जिजाऊंनी त्याकाळच्या शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या विरुद्ध स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटवण्यासाठी स्वतःच्या मुलाला नव्हे… नव्हे संपूर्ण हिंदुस्तानला प्रेरणा दिली. आज आपल्याला वाटते कि छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावेत. तर मला असे वाटते की यासाठी पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येणे गरजेचे आहे.      राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिवनेरीवर जन्म दिला. शिवरायांच्या कर्तृत्वाला फुलवण्यासाठी स्वातंत्र्याचे संस्कार त्यांच्यावर केले. सतराव्या शतकात सर्वत्र गुलामगिरीची अमंगळ दुर्गंधी येत असताना स्वातंत्र्याचा सुगंध निर्माण करण्यासाठी छत्रपती श...
        #_जागर_आदिशक्तीचा         विषय क्र. ४- नवरात्रीचे उपवास श्रद्धा अंधश्रद्धा          लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी      उपवास या शब्दाचा अर्थ देवाजवळ रहाणे होय.मनाने अनुसंधान करणे व शरीरही त्यालायक बनवणे हे अपेक्षित असते.नवरात्रीच्या  ९ दिवसात बऱ्याच ठिकाणी ९ दिवस उपवास केला जातो.तो कुलाचार रितीनुसार पहायला मिळतो.त्यामागे अनेक शास्त्रिय कारणे आहेत.हा उपवास शरीराला अधिक उर्जावान बनवतो.शरीराची ताकद वाढवण्यात उपवासाचा खूप मोठा वाटा असतो.हा केवळ शरीराला रोजच्या अन्नापासून दूर ठेवून वजन कमी करण्यासाठी केला जाणारा प्रकार नसून याला खूप मोठे अध्यात्मिक महत्व आहे.देवीची कृपा लाभावी असा उद्देश आहेच तसेच शरीरही उर्जावान बनवण्याचा हितसंकल्पही आहे.जर शरीर धड तर सगळं ठीक.नाहीतर आपण आजारांच्या विळख्यात सापडतो.देवीच्या आराधनेत मनाप्रमाणे शरीराचीही तयारी उत्तम हवी असा यामागचा दृष्टीकोन आहे.      नवरात्रीचा पारंपारिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो. खालील प्रमाणे बऱ्याच ठिकाणी हा उपवास केला जातो. ...
     #_जागर_आदिशक्तीचा        विषय क्र ६- नवरात्रकाळातील विशिष्ट पद्धती किंवा प्रथा        लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी        मी माहेरची दिक्षीत व सासरची कोऱ्हाळकर- कुलकर्णी.माझं माहेर संभाजीनगर व सासर राहाता तालुका,जिल्हा अहमदनगर.माझं सासरचं कुलदैवत सप्तश्रृंगी देवी.आमचं मुळ गाव कोऱ्हाळा.राहात्यापासून अगदी जवळ.तिथे पुर्वी आमची शेती व वाडा होता.आज तिथे देवीचं मंदिर आहे.मंदिर खूप जुनं व साधंच आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात महालक्ष्मी,महासरस्वती व महाकालीच्या मुर्त्या आहेत.नवरात्रीत इथे उत्सव करतात.देवीच्या मंदिराला सजवले जाते.नवरात्रीत ९ दिवस देवीची पूजा आरती यथासांग केली जाते.आम्ही सगळे एक दिवस देवीच्या दर्शनाला जातो.        आम्ही कोऱ्हाळकर ९ दिवस देवीचा उपवास करतो.९ दिवस घरात पलित्याने आरती होते.देवीसमोर अखंड दिवा ठेवला जातो.देवीची सकाळ संध्याकाळ आरती होते. रामदास स्वामी रचित "अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो" ही पारंपारीक आरती म्हंटली जाते.या ९ दिवसात कुंकूमार्चन, श्री सुक्त पठण,सप्तशती पठ...

स्त्री शक्ती व समाज

   परमेश्वराने जग निर्माण केलं ते मुळमायेपासून.म्हणजे पुरूष व प्रकृती हेच प्रथम पुरूष व स्त्री.त्यांच्या संयोगातून हे ब्रह्मांड निर्माण झालं.निसर्गत:च ते दोघेही मानव योनीतही परस्पर पुरकच राहिले.जग कितीही बदलले तरी ही परमेश्वराची जोडी अखंडपणे कार्य करते आहे.हा पुरूष प्रकृतीचा खेळच जगात अनेक घडामोडी करत असतो.मानव योनीत नर व मादी हा इतर प्राणीवर्गासारखा भेद नसून तो पुरूष व स्त्री असा  आहे.म्हणजेच मानवाला जन्मतःच मन व बुद्धी मिळालेली असल्यामुळे ते दोघेही इतर प्राण्यांपेक्षा निश्चितच वेगळे व असामान्य आहेत.      प्राचीनकाळी मानवाने निसर्गशक्तीलाच दैवत मानले. शेतीचा शोध हा मानवीजीवनातील सर्वांत क्रांतिकारक शोध. शेतीमुळे माणसाचे भटके जीवन स्थिर झाले आणि धरणीच्या ठिकाणी असलेल्या सुजलाम सुफलाम या गुणांची ओळख झाली. तेव्हापासून मातृदेवतेच्या पूजेचे महत्त्व वाढले. स्त्रीकडेही बीजधारणेचा गुण असल्यामुळे तिलाही आदिशक्ती मानून तिच्या मूर्ती बनवून तिला मखरात बसवून तिची पूजा केली जाऊ लागली. कालांतराने पुरुषसत्ताक व्यवस्था वाढत गेली आणि एकीकडे स्त्रीची पूजा, तर दुसरीकडे तिचा छ...
#_जागर_आदिशक्तिचा लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी विषय क्र.१- स्त्री जन्म एक आव्हान       ' स्त्री जन्मा तुझी कहाणी,        ह्रदयी पान्हा नयनी पाणी....'      ह्या गीतात स्त्रीची मनोव्यथाच व्यक्त झालीये..किती खरीये ती...आजच्या आधुनिक काळातही ही व्यथा लागू पडते हेच दुर्दैव..      मला असं वाटतं भारतासारख्या सुसंस्कृत विचारधारा व संस्कृती असणाऱ्या देशातही स्त्री ही कधी देवी म्हणून पुजली जाते तर कधी 'पायीची वहाण पायी बरी' म्हणून दुर्लक्षली जाते.रामायण काळ असो की आजचा पुढारलेला काळ असो स्त्रीची विटंबना ठरलेलीच..कायम पुरूषांच्या पुरूषी अहंकाराला ती बळी पडते..     रामायणात आपण पहातो देवी सीतेसारखी अत्यंत पतिव्रता स्त्री पण तिही रावणाकडे राहिली म्हणून अग्निपरिक्षा देत रहाते..त्या अग्निपरिक्षा देऊन देऊन कंटाळून गेलेली ती अखेर धरणी दुभंगून त्यात सामावून जाते..तिचा झालेला हा मानसिक छळ तसेच तिची ही घनघोर विटंबना ह्रदय कासाविस करून जाते..तिची कोणतीच चूक नसतांनाही अग्निपरिक्षा तिने दिली व स्वतः राजा रामही यात हस्तक्षेप करत नाही हे ...

खेळ मनाचा

  सौ.स्वरूपा कुलकर्णी किती छान असतो ना हा खेळ मनाचा, एकांतात मुक्ततपणे तूझ्या आठवणीत रमण्याचा, तू सोबत नसता तुला क्षणक्षण आठवण्याचा, मनातल्या घोड्यांना स्वैर उधळू देण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, राहून राहून तुझी याद करत राहण्याचा, शेवटच्या भेटीतील तूला स्ममरण्याचा, दिशाहीन मनाला मुक्त उधळू देण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, पंजाबी ड्रेसमधल्या तूला फोटोत पहाण्याचा, सोडलेल्या बटा तुझ्या मनानेच सावरण्याचा, चेहऱ्यावरील गोड हसू पुन्ह पुन्हा पहाण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, रंग बावरी स्वव्पे तारूण्नात पहाण्याचा, दुर राहाणाऱ्या तुला बसस्टॉपवर पहाण्याचा, माझ्या सिटाशेजारीच येऊन बसण्याचा किती छान असतो ना हा खेळ मनाचा, आपली कधीही न झालेली तू दूर होतांना बघण्याचा, विनाकारण तूला आत मनात साठवायचा, नको नको म्हणतांनाही परत चुका करण्याचा
विषय-पितृपक्ष समज गैरसमज ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी       आपली संस्कृती श्रद्धेला,कृतज्ञतेला खूप महत्वाचे स्थान देते.कारण, मानवाचे जगणे हे सार्थ ठरवण्यात ही श्रद्धा व कृतज्ञता खूप महत्वाचा वाटा उचलते.मनुष्य प्राणी हा नुसता प्राणी नसून मानव्य जपणारा,संस्कृती जपणारा जीव आहे,हे त्याचे वेगळेपण आहे.माणसाला जगतांना त्याच्या अनेक पिढ्या जी मोलाची भर या जगात घालत असतात ती शब्दांनी व्यक्त करता येणे केवळ अशक्य.मानवी उत्कांती म्हणजेच पिढ्यान पिढ्या घडत आलेले सकारात्मक बदल.मग ते रहाणीमान असो की जीवनशैली.बदल हे सकारात्मक घडले की समाज सुखी होण्याकडे प्रवास करतो.हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी व अभ्यासाद्वारे समजू शकतो.ही भौतिक जगण्याची लढाई सुकर होते ती पुर्वजांनी केलेल्या अनेक अभ्यासांमुळे,वैज्ञानिक शोधांमुळे त्यांच्या अध्यात्मिक संशोधनामुळे.आपण अनुभवत असलेले हे सकारात्मक बदल अनेक पुर्वजांच्या कठोर मेहनत,शिस्त,परिश्रम,त्यांच्यातिल अभ्यासू वृत्ती,गुणवत्ता याचा परिपाक आहे.हे समजून घेतांना खरंच आपण या पितृऋणातून कधीतरी मोकळे होऊ का? खचितच नाही हे उत्तर येईल.हे नैसर्गिक सत्य आहे.म्हणूनच आपला उदात्...
विषय- "काकस्पर्श" कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी "काकस्पर्श" पिंडास स्पर्श होता, आत्मा क्षणात शांत होतो, जणू मृत पुर्वजांना तूच समाधान देतो पितरांची अवगुंठलेली गती तुझ्याने मिळते जरी काळा रंग तुझा स्पर्शाने मुक्ती मिळते रे काव काव करिशी, एकाक्ष तुजं म्हणती रे तूजविण मानवाला, ना सद्गती या जगती राहती पिढ्यान पिढ्या मर्त्यलोकी या मानवाच्या, तुजविण कावळ्या रे तडफडती  पिंडात ह्या धन्य तुझी दृष्टी रे काक शोधसी योग्य पिंडास, तुझ्या स्पर्शाने केली मुक्ती सदैव मानवास
 ❤️लेखणीतून उलगडत गेलेली स्वरूपा         प्रिय स्वरूपा, तुला वाढदिवसाच्या वाचनालयातील  भरपूर अजरामर  पुस्तकांइतक्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!🌹 आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तू मला कशी उलगडत गेलीस ह्याचा सखोल विचार मनात आला.साधारण दोन वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवात माझ्या शेजारी एक उंच, गोरीपान, सडपातळ, सुंदर, हसतमुख व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते,गोऱ्यापान देहावर गडद रंगाची साडी खूप शोभून दिसत होती. चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिच्या शालिनतेची साक्ष देत होता. सगळ्यांशी गोड आणि शांतपणे बोलण्याने तिचे पावित्र्य आणि निर्मळ मन डोकावताना दिसत होते. तिथे आमची ओळख झाली. हीच ती स्वरूपा कुलकर्णी. इथूनच तुझ्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडायला सुरवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर "शब्दसोहळा" च्या स्वलिखित महिलांच्या लेख वाचनाचा कार्यक्रम गुगल मीट द्वारे घेण्यात आला,त्यात मी सहभागी होते. तिथे तुझा स्मार्ट फोनचे महत्व सांगणारा लेख ऐकला. खरं सांगायचं तर ह्या स्मार्टफोनमुळे आणि त्यावर केलेल्या लिखाणामुळे तूझी व माझी मैत्र...
 रजनी ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी पश्चिमेचा आला गार वारा, घेऊनी खगांचा थवा सावळा, रंग होती गडद खास ते, अवकाशीच्या पटावरचे संध्येच्या हाती हात देऊनी, आली रजनी सुखद शांत ती, माळूनी गजरा नक्षत्रांचा, चंद्र रेखूनी भालावरती तीने चंदेरी घालूनी पैंजण, हाती गोंदले चांदण सुंदर, स्वैर अलगद टाकूनी पाऊल, जणू मिटले स्वर्गधरेचे अंतर ती शोडष नवयुवती सुंदर, मधुचंद्रही लाजे क्षणभर, पाहूनी लावण्य तिचे अलौकीक, वायू पोहोचवी सुगंध दरवळ ती अस्मानी परी लाजरी, करूनी श्रृंगार नववधूपरी, सहज हालवी बटा हलके, डहूळले पाणी डोहावरचे सुगंधी रात्रीत त्या घडते, स्वप्न अनोखे युगुलांचे ते, प्रेम करूनी अती दंगले, रजनीच्या भव्य महाली ते कृष्ण रंगी रजनीचा पसारा, चोहिकडे दरवळ तो रातराणीचा, मुक्त केश कलापा वरती, दिसे चांदणी चमचमणारी दिशा सभोवती घालूनी पिंगा, चंद्र दुधी समुद्रास खेळवी, जमुनी सारे ग्रहगोल देखणे, करिती क्रिडा स्वैर सुखाने अलगद दस्तक प्राची देई, अरूणाचा निरोप घेऊनी, झरझर तिच्या चेहऱ्यावरती, फुले गुलाबी लाली साजिरी अशा रितीने होते पहाट, रजनी लाजूनी पळते दूर, हलकेच पाऊल पडले मग ते, उषाराणीची चाहूल लागते
 निर्माल्य ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी      आबांची पुजा केंव्हाच झाली.पहाटेच उठून सगळं उरकून आधी देवपूजा करण्याचा त्यांचा परिपाठ अनेक वर्षांचा.आनंदी या घरात सून म्हणून आली नी घरात सर्वांशी एकरूप झाली.आनंदीला सुरूवातीपासूनच आबांच्या या देवपूजेचं भारी कौतूक व कुतूहल होतं.का ते या उतारवयातही देवपूजा इतक्या आवडीने करत असतील?तिला प्रश्नच पडायचा.माधव त्यांचा मुलगा पण तो मात्र देवाधर्मापासून लांबच.म्हणजे गणपती उत्सव हा त्याचा लाडका सोहळा पण एरवी मात्र देवासमोर नमस्कार करण्या पलिकडे तो जात नसे.आबा मात्र स्वभावाने धार्मिक.रोज सत्संग ऐकणारे.नामस्मरण करणारे.सत्तरीतही तरूणाला लाजवतील अशी अनेक कामं शिताफीने करणारे.घरी गाई-गोठा..परसात अनेक जातीची फुलं त्यांनी स्वतःहून जोपासलेली.गावातली सारी लहान थोर मंडळी आबांच्या शब्दाबाहेर नसे.त्यांचा एक वेगळाच रूबाब व थाट पहाणाऱ्याला जाणवत राही.मनाने अतिशय स्वच्छ,दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध..           आज पहाटेच नित्याप्रमाणे आबांना जाग आली.झुंजूमुंजू झालं होतं.कोंबडा आरवला.बंबात पाणी टाकण्याचा आवाज त्यांना आला.ह्या...
 जीवना तव सुंदरता सुंदर होण्यात सरे... ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी      कविश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी केलेलं हे विधान किती सार्थ आहे हे रोजच्या जगण्यात आपण पावलो पावली अनुभवतो.या वाक्यात जगण्याची धडपड व त्यातून घडणारे आपण ही लढाई खऱ्या अर्थाने टिपली आहे...बरोबरच बोलले ते जगण्याशी चाललेली नित्य झकड-पकड व त्यातले डाव कधी जिंकतांना कधी हरतांना नकळत आपण स्वतःच स्वतःला घडवत जातो..एखाद्या कसलेल्या मुरब्बी कलाकाराच्या शिल्पासारखे.सहज, नैसर्गिक तरिही सुबक,वेगळेपण जपलेले...ही त्या विश्वनियंत्याची खरी ताकद आहे.आपण घडत जातो " तो" घडवत जातो...ते अनोखे शिल्प घडायला कितीतरी नाट्य,वेळ,पैसा,शक्ती,विचार अशा अनेक गोष्टी खर्ची पडत असतीलही पण मंडळी हीच तर त्या विधात्याची साधन सामग्री आहे..याच साधनांचा वापर होऊनच घडते ते एक परिपक्व सुंदर व्यक्तिमत्व..विधात्याच्या अफलातून कौशल्यानेच साकारतो तो परिपक्व मानव..ही सुंदरता मिळवायला त्या मानवाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागते.तो शिकतो, कधी पडतो धडपडतो पण पुढे चालत रहातो.मार्ग कितीही घनघोर असो, तो पुढेच जात रहातो.मानवी आयुष्याची ही खरी जमेची व तितकीच कठी...
विषय -लता मंगेशकर                 " मेरी आवाजही पहचान है।...." भारत सरकारने लतादीदींना ‘भारतरत्न’ हा किताब दिला, तेव्हा मनात आले की, या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली? लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर ‘स्वरभारती’, ‘कलाप्रवीण’, ‘सूरश्री’, ‘स्वरलता’ व ‘डी. लिट.’ असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे अथक परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते – या उक्तीनुसारच आज साऱ्या दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करतात. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे. दीदींच्या गळ्यात ‘गंधार’ आहे, याची कल्पना त्यांच्या बाबांना-दीनानाथांना होती. ते दीदींना सांगत, “लता, तुझ्यावर ईश्वराने कृपा केली आहे, गळ्यातला गंधार सांभाळ.’ लतादीदींनी आपल्या पित्याचे वचन आयुष्यभर सांभाळले. आज त्या गंधाराने आम्हा रसिकांचे जीवनही तृप्त केले आहे. अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८००...
विषय क्र.२-  जल्लोश गणेशोत्सवाचा कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी श्रावण संपला, रम्य चतुर्थीची पहाट झाली…. सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली…. गणाधिशाची स्वारी आली… गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…. हरिसी विघ्न जणांचे,  असा तू गणांचा राजा वससी प्रत्येक हृदयी, असा तू मनांचा राजा स्वीकार गणराया तुझिया चरणी, साष्टांग दंडवत माझा…
विषय क्र.३- ते दहा दिवस कसे साजरे होतात? लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पा सगळ्यांच्यां घरात विराजमान होतात. दरम्यान, १० दिवसांनी या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस तर काही  ठिकाणी पाच दिवसांनीही गणपतीचे विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये हा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.          रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची पुजा अर्चा घरोघरी चालते.पार्थिव गणेशाला रोज २१ दुर्वांची जुडी वाहिली जाते.जास्वंद,गुलाब यांसारखी लाल फुले बाप्पाला विशेष प्रिय..तीसुद्धा हार बनवून वाहिली जातात.रोज पंचखाद्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो.बाप्पाला घरातली बच्चे कंपनी तर जीवापाड प्रेम करते.शेवटच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतांना हमसून हमसून रडणारी ही निरागस बाळं बाप्पाला विसर्जित करतांना खूप हळवी होतात.किती जीव लावून जातो बाप्पा या १० दिवसांत.जणू आपल्या घरातील एक मोदकप्रिय सदस्य म्हणून त्याला मानाचे स्थान मिळते.बाप्पाच्या आवडीनिवडी जणू आपल...
विषय क्र ४- भक्ती ही श्रद्धेची असावी लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी मानवाला ज्या क्षणी तो या चैतन्यमयी विश्वात्मक परमेश्वराचा अंश आहे ह्या गोष्टीची जाणीव झाली त्या क्षणी तो त्या शक्तीपुढे नतमस्तक झाला.याचे कारण माणसाला जेंव्हा हे जग समोर दिसले तेंव्हा तो हरखून गेला.किती विविध रंग,रूप, आकार,चव, रस, गंध, भावना या सगळ्या सृष्टीच्या विविधता पाहून तो विचारात पडला.खरंच हे सुंदर विश्व बनवणारा कोण असेल?कुठे असेल कसा असेल?त्या क्षणी भगवंत समोर प्रगट झाले व त्याला आपल्या अत्यंत मधूर वाणीने म्हणाले, वत्सा मी सर्वांतरयामी परमपीता परमेश्वर आहे.माझे स्थान चराचरात आहे.त्यातही प्रामुख्याने मी सश्रद्ध भक्ताच्या ह्रदयात रहातो.ते माझे अत्यंत आवडते स्थान आहे.                 खरंच वरील गोष्ट काल्पनिक असली तरी तीला सत्याचा भरभक्कम आधार आहे.आज आपण साजरा करत असलेला गणेशोत्सव याच परमेश्वराचे स्मरण,पुजन,वंदन आहे. त्या सत-चित्-आनंदमयी परमात्म्याला शरण जाऊन भोळ्या भक्तीभावाने त्याची प्रार्थना करणे हेच या गणेशोत्सवाचे प्रयोजन.मन पुर्णपणे गणेशाला शरण गेले की तो भक्ताला मनोवांछित ...
विषय क्र.५ -गणेशाकडून काय शिकावे? लेखिका -सौ.स्वरूपा कुलकर्णी एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारीणम्। रूदं चं वरदंहस्तैर् बिभ्राणम् मुषकध्वजम्। रक्तं लंबोदरम् शुर्पकर्णकम् रक्तवाससम्। रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैःसुपूजितम्। गणपती बाप्पाकडून काय शिकावे असं विचारलंत तर गणरायाच्या सर्व अंगांचा अभ्यास करावा लागेल.गणपती बाप्पाचं डोकं हे भले मोठे आहे आणि याचा अर्थ म्हणजे मोठे डोके चारी बाजूंनी चौकटीबाहेरचे विचार करण्यासाठी आहे. गणपती बाप्पाचे डोळे देखील मोठे आहेत याचा अर्थ असा की,समोर जे दिसते त्यापलीकडे पाहण्यासाठी. गणपती बाप्पाचे कान सुपासारखे असतात या सुपासारख्या कानांचा अर्थ इतरांचे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी. एका हातात कुऱ्हाड मोहाची बंधने कापण्यासाठी, आसुरी संस्कार मुळापासून तोडण्यासाठी. महोदर तो आहे.चांगल्या वाईट गोष्टी शांततेने सामावून घेण्यासाठी. एकदंत आहे.चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याग करणेही गरजेचे. एका हातात मोदक परिश्रम तपस्या आणि बुद्धिबळाच्या आधारावर यश प्राप्त केल्याचे सूचक. मूषक वाहन मनाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची गणरायांची इच्छा. या प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखे बरेच काही आ...
 'गणेश उत्सवाची परंपरा लेखिका - सौ.स्वरूपा कुलकर्णी           राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणार्‍या मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीला ऐतिहासिक सोबतच धार्मिक, अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेला असून, या ठिकाणी सुमारे ३५०वर्षापूर्वी श्री संत गोसावीनंदन यांनी स्थापन केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे.          नेत्री दान हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजरे, माया शेंदुर पाझरे, वरोवरी दुवांकराचे तुरे          या स्तवनाचे रचयिते संत गोसावीनंदन यांच्या महतीचा अध्यात्मिक वारसा मातृतिर्थ नगरीला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असणारे येथील संतवर्य गोसावीनंदन स्वामी यांचे पूर्वज मराठवाड्यातील बिड (गंगातीर) येथील राहणार असून, गोसावीनंदन स्वामींनी श्रीक्षेत्र मोरगाव येथील तपश्‍चर्या केल्यावर त्यांना साक्षात गणपतीने दर्शन देऊन सिद्धक्षेत्र सिंदखेडराजा येथे जाण्याची आज्ञा केली, अशी अख्यायिका आहे. गोसावीनंदन यांचे चरित्र अभंगावरुन ते प्रत्यक्षात श्री गणेशाचेच अवतार होते असे म्हणतात.येथील त्यांच्या...